वंध्यत्वाची मूळ कारणे जीवनशैलीशी निगडित

Date:

  • नोवा आयव्हीआय फर्टिलिटी ही भारतातील एक आघाडीची फर्टिलिटी चेन पुणे येथील वंध्यत्वाच्या वाढत्या प्रकारांबाबत करतेय जागृती
  • आयव्हीएफमार्फत 25,000 यशस्वी क्लिनिकल गर्भधारणा

पुणेकोणत्याही संरक्षणाविना वर्षभर लैंगिक संबंध ठेवूनही नैसर्गिकपणे गर्भधारणा न होणे, यास वंध्यत्व असे म्हणतात. बरीच वर्षे, वंध्यत्व ही महिला-केंद्री समस्या असल्याचे मानले जात असे. परंतु, नमूद करण्यात आलेल्या वंध्यत्वाच्या प्रकरणांपैकी 37% प्रकरणे पुरुषांशी संबंधित असतात, 38% स्त्रियांशी संबंधित असतात, आणि 25% प्रकरणांच्या बाबतीत कारणे अनभिज्ञ असतात. मूल होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांच्या जीवनात वंध्यत्वामुळे अनेकदा ताण निर्माण होतो.  विविध प्रकारचे वैद्यकीय निर्णय आणि वंध्यत्वामुळे निर्माण होणारी अनिश्चितता यामुळे अनेकांना प्रचंड शारीरिक व भावनिक त्रास होतो.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत, वंध्यत्वाच्या कारणांविषयी चर्चा करताना नोवा आयव्हीआय फर्टिलिटीच्या फर्टिलिटी कन्स्ल्टंट डॉ. नमीता मोकाशी भालेराव यांनी सांगितले,व्यक्तीच्या विविध पैलूंच्या बाबतीत प्रजननविषयक आरोग्य अतिशय संवेदनशील असते – शारीरिक, जैविक, वर्तनविषयक, सांस्कृतिक व सामाजिक-आर्थिक घटक. हे आरोग्य जीवन समृद्ध करण्याइतके सक्षम असते; आणि तरी सहज परिणाम होऊ शकेल, असे नाजूकही असते. आज, रीप्रॉडक्टिव्ह टॉक्सिसिटी या सर्वसाधारण प्रजननामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या रासायनिक घटकांशी संबंधित असणाऱ्या धोक्यामुळे बहुतांश जोडप्यांच्या प्रजननविषयक आरोग्यावर सर्रास परिणाम होत आहे. सध्याच्या जीवनशैलीविषयक सवयींमुळे विषारी वातावरण निर्माण झाले असून, ते टाळणे अवघड आहे.”

अनेकदा पुढील घटकांमुळे रीप्रॉडक्टिव्ह टॉक्सिसिटी निर्माण होते:

  • प्रचंड उष्णतेशी संपर्क

पुरुषांच्या बाबतीत, घट्ट अंतर्वस्त्र अंडकोशाचे तापमान वाढते व त्यामुळे स्पर्मच्या निर्मितीमध्ये घट होऊ शकते. बराच काळ सलग बसून गाडी चालवल्यानेही, वाहनातून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त उष्णतेशी अंडकोशाचा संपर्क येऊ शकतो.

  • सेलफोनच्या वापरातून निर्माण होणारे रेडिएशन

सेलफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. फोनमधून इलेक्ट्रो-मॅग्नेटिक लहरी येतात. त्या मानवी शरीरात शोषल्या जाऊ शकतात, त्यांचा परिणाम प्रजनन व्यवस्थेवर व प्रामुख्याने पुरुषांवर होतो. यामुळे स्पर्मचे केंद्रिकरण, मोटिलिटी व प्रमाण यावर परिणाम होऊ शकतो. पँटच्या खिशात सेलफोन ठेवल्याने पुरुषांच्या टेस्टिकल्सची टेस्टोस्टेरॉन निर्माण करण्याची क्षमता बाधित होऊ शकते.

  • अतिरिक्त धूम्रपान, मद्यसेवन

टोबॅको स्मोकमध्ये असणाऱ्या टॉक्सिनमुळे स्पर्म व अंडी यातील डीएनएवर दुष्परिणाम होतो. पॅसिव्ह स्मोकिंगही धूम्रपान करण्याइतकेच घातक असू शकते. अशा धूम्रपानाच्या संपर्कात येणाऱ्या महिलांना अन्य महिलांच्या तुलनेत गर्भधारणेसाठी अधिक वेळ लागतो. अतिरिक्त मद्यपान केल्याने पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन पातळी घटते आणि स्पर्मची गुणवत्ता व प्रमाण कमी होते. त्यामुळे लिबिडोमध्ये घट होऊ शकते व त्यामुळे नपुंसकता निर्माण होऊ शकते.

  • वजनाशी संबंधित जीवनशैलीचे घटक

स्थूलतेमुळे ओव्ह्युलेशनवर व स्पर्मच्या निर्मितीवर नकारात्मक परिणाम होतो. महिलांच्या बाबतीत, इन्सुलिनची अति-निर्मिती होते व त्यामुळे अनियमित ओव्ह्युलेशन व पीसीओएस (पॉलि-सिस्टिक ओव्हरिअन सिंड्रोम) असे परिणाम होऊ शकतात; पुरुषांच्या बाबतीत, स्पर्मची निर्मिती करणाऱ्या टेस्टिकल्सच्या स्टिम्युलेशनवर परिणाम होतो. अतिरिक्त फॅटमुळे टेस्टोस्टिरोन या मेल हॉर्मोनचे रूपांतर इस्ट्रोजनमध्ये होते आणि या इस्ट्रोजनमुळे टेस्टिकल स्टिम्युलेशनमध्ये घट होते. तर दुसरीकडे, वजन कमी असणाऱ्या पुरुषांमध्ये सर्वसाधारण बीएमआय असणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत लोअर स्पर्म ही समस्या असते. महिलांच्या बाबतीत वजन कमी असणे आणि बॉडी फॅट अतिशय कमी असणे, हे ओव्हरिअन डिसफंक्शनशी संबंधित असते, असे डॉ. नमीता यांनी सांगितले.

  • प्रदूषण व पर्यावरणविषयक टॉक्सिन्स

पुरुषांच्या बाबतीत, वायू प्रदूषणामुळे स्पर्मच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याव्यतिरिक्त, स्पर्मची निर्मिती व केंद्रिकरण यामध्ये घट होऊ शकते. यामुळे डीएनएमध्ये बिघाड होऊ शकतो व टेस्टिक्युलर कॅन्सरचा धोका वाढू शकतो. महिलांच्या बाबतीत, हवेतील प्रदूषकांमुळे हॉर्मोनचे, विशेषतः इस्ट्रोजनचे असंतुलन होते व त्याचा परिणाम ओव्ह्युलेशनवर होऊ शकतो. यामुळे गर्भधारणेचे प्रमाण कमी होते व गर्भपात होण्याचा व परिणामी लाइव्ह बर्थ-रेट घटण्याचा धोका वाढतो.

प्लास्टिकमध्ये केमिकल फ्थॅलेट्सचा समावेश असतो व त्यामुळे प्रजनन दर कमी होतो, स्पर्म डीएनएमध्ये बदल होतात, व टेस्टोस्टेरॉन पातळी कमी होते. या टॉक्सिन्समुळे स्पर्म डीएनए खराब होतात किंवा स्पर्ममध्ये जेनेटिक बदल होतात. मासिक पाळीमध्ये अडथळे, ओव्ह्युलेशनमध्ये बिघाड आणि एंडोमेट्रिऑसिसचा व स्पर्मची गुणवत्ता घसरण्याचा धोका यांच्याशी फ्थॅलेट्सची उच्च पातळी संबंधत असते, असे डॉ. नमीता यांनी नमूद केले

रुग्णांतील वंध्यत्वाचे निदान कसे केले जाते?

जननक्षमतेच्या कोणत्याही चाचणीदरम्यान, जोडप्यातील दोघांचीही तपासणी करणे बंधनकारक असते. पुरुषांच्या जननक्षमता मूल्यमापनाची सुरुवात साधारणतः तपशीलवार वैद्यकीय पार्श्वभूमीने आणि वीर्य विश्लेषणाने होते. त्यामध्ये, स्पर्म काउंट, मोटिलिटी व मॉरफॉलॉजी यांचे परीक्षण केले जाते.  या विश्लेषणाच्या निकालांनुसार पुढील चाचण्या केल्या जातात. उदाहरणार्थ, लो स्पर्म काउंट असणाऱ्या पुरुषांना कदाचित हॉर्मोनल किंवा जेनेटिक टेस्टिंग करावे लागू शकते. स्पर्म अजिबात  न आढळल्यास टेस्टिक्युलर बायॉप्सी करावी लागू शकते. असाधारण बाबी आढळल्यास हॉर्मोन प्रोफाइल, डीएनए फ्रॅग्मेंटेशन व डॉपलरसह स्कॉटल स्कॅन केले जाते. रुग्णावर उपचार सुरू असतील तर तीन महिन्यांनी पुन्हा वीर्य विश्लेषण केले जाते.

महिलांसाठी प्रजननविषयक चाचण्यांची सुरुवात अनेकदा ओव्ह्युलेशन व मासिक पाळीबाबत समस्या जाणून घेण्यासाठी रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी विचारण्यापासून होते. त्यानंतर, हॉर्मोन पातळी व ओव्हरिअन रिझर्व्ह तपासण्यासाठी रक्त तपासणी केली जाते. या अनुषंगाने, फायब्रॉइट किंवा एंडोमेट्रोसिस अशा असाधारण बाबी तपासण्यासाठी पेल्व्हिक परीक्षण केले जाऊ शकते. वंध्यत्वाची रचनात्मक कारणे शोधण्यासाठी अल्ट्रासाउंड इमेजिंग (सोनोग्राम) अशा मिनिमली इन्व्हेजिव्ह प्रक्रिया व सर्जरी केली जाऊ शकते.

नोवा आयव्हीआय फर्टिलिटी (एनआयएफ) ही वंध्यत्व क्षेत्रामध्ये सेवा देणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे आणि तिने आतापर्यंत आयव्हीएफमार्फत 25,000 यशस्वी क्लिनिकल गर्भधारणा केल्या आहेत.

नोव्हा आयव्हीआय फर्टिलिटीविषयी

नोवा आयव्हीआय फर्टिलिटी (एनआयएफ) ही फर्टिलिटी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. स्पेनमधील आयव्हीआयच्या भागीदारीने अॅडव्हान्स्ड असिस्टेड रीप्रॉडक्टिव्ह टेक्नालॉजी (एआरटी) भारतात आणणे, हे एनआयएफचे उद्दिष्ट आहे. या भागीदारीमुळे नोवाच्या आयव्हीएफ सेवा व तंत्रज्ञान यामध्ये लक्षणीय वाढ झाली असून त्यामध्ये प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर, प्रशिक्षण व गुणवत्ता व्यवस्थापन यांचा समावेश आहे. आयव्हीआयकडील ज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदीर्घ अनुभव यांच्या मदतीने एनआयएफने तेथील उत्कृष्ट दर्जाच्या प्रक्रिया, प्रोटोकॉल व धोरणे भारतात आणली आहेत.

आययूआय, आयव्हीएफ व अँड्रॉलॉजी सर्व्हिसेस असा मूलभूत उपचारपद्धतींबरोबरच, एनआयएफमध्ये अनेक अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध आहे, जसे एम्ब्रियोज व अंडी टिकवून ठेवण्यासाठी व्हिट्रिफिकेशन, एम्ब्रियो स्वीकारण्याची गर्भाशयाची वेळ ओळखण्यासाठी ईआरए, जेनेटिकली नॉर्मल एम्ब्रियो हस्तांतर करण्यासाठी पीजीएस व पीजीडी – आयव्हीएफ-आयसीएसआयनंतर गर्भधारणा होण्याची शक्यता लक्षणीय प्रमाणात वाढवणारे सगळे उपचार, यामध्ये अगोदर अनेकदा अपयश आलेल्या रुग्णांचाही समावेश होतो. एनआयएफ सध्या भारतात 20 फर्टिलिटी सेंटर चालवते (अहमदाबाद (2), बेंगळुरू (3), चेन्नई, कोइम्बतूर, हिसार, हैदराबाद, इंदोर, जालंधर, कोलकाता, लखनऊ, मुंबई (2), नवी दिल्ली (2), पुणे, सूरत व विजयवाडा).

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...