गोवा टुरिझमचे व्हिंटेज कार अँड बाइक फेस्टिव्हल प्रचंड यशस्वी

Date:

पणजी- गोवा टुरिझमने १४ एप्रिल २०१९ रोजी आयनॉक्स कोर्टयार्ड, पणजी येथे गोवा व्हिंटेज कार अँड बाइकफेस्टिव्हल आयोजित केला होता. व्हिटेंज कार आणि बाइक्स जमवण्याची व त्यांचे जतन करण्याचा ध्यास साजरा करण्याच्याहेतूने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

यादरम्यान आयनॉक्स कोर्टयार्डमध्ये १८ व्या शतकातील काही सर्वोत्तम कार आणि बाइक्स पाहायला मिळाल्या. गोव्याच्याविविध भागांतून तसेच त्याजवळच्या राज्यांतूनही कित्येक व्हिंटेज कार्स आणि मोटरसायकल्स यामध्ये सहभागी झाल्याहोत्या. कार्यक्रमस्थळ ४५ कार्स आणि ७० बाइक्स प्रदर्शनार्थ मांडण्यात आल्या होता. गोव्याच्या राज भवनाने जतन केलेलीकॅडलॅक लिमोझिनचे १९५९ मधील मॉडेल प्रेक्षकांचे सर्वात आवडते बनले.

व्हिंटेज अँड क्लासिक कार फेडरेशन ऑफ इंडिया (व्हीसीसीएफआय) यांच्या सहकार्याने आयनॉक्स कोर्टयार्ड येथे आयोजितकरण्यात आलेल्या २०१९ गोवा व्हिंटेज कार अँड बाइक फेस्टिव्हलचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्य निवडणूकअधिकारी, श्री. कुणाल यांनी गोवा टुरिझमचे सचिव श्री. जे. अशोक कुमार यांच्यासह, उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी श्रीमतीआर. मनेका, टुरिझमचे संचालक श्री. संजीव गडकर, इंडियन एक्सप्रेस समूहाचे अध्यक्ष श्री. विवेक गोएंका, ऑटोकार मासिकाचेसल्लागार श्री. बर्सिस बांद्रावाला आणि कार्यक्रमाचे आयोजक, अशोक व्हिंटेज वर्ल्डचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रदीप नाईकयांच्या हस्ते करण्यात आले.

या व्हिंटेज कार्स आणि बाइक्सनी कंपाळ आणि मीरामार बीच सर्कलवरून मांडवी नदीच्या काठाने रॅली काढली आणि परतपणजीमध्ये आले व पुढे अब्बे फॅरिया पुतळ्यावरून (जुने सचिवालय) यू- टर्न घेत परत आयनॉक्स कोर्टयार्डमध्ये डिस्प्लेसाठीपरतले.

आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर आणि गोव्याच्या निवडणूक आयोगाचे आयकॉन वर्मा डिमिलो यांनी गायिका मेरी जो यांच्यासहप्रेक्षकांसाठी खास फॅशन शोचे आयोजन केले होते. त्यात कुणबी हे गोव्याचे पारंपरिक वस्त्र प्रामुख्याने समाविष्ट करण्यात आलेहोते. गोव्याचा लोकप्रिय बँड क्रिमसन टाइडने धमाकेदार नृत्य सादरीकरण केले. यावेळेस खाद्यपदार्थ आणि पेयांचे स्टॉल्सहीउपलब्ध होते.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आगामी लोकसभा निवडणुकांबाबत मतदार जागृती, न्याय्य मतदानाबद्दल प्रचारकरण्यासाठी #सेव्हदडेट आणि #गोव्होट या खास अभियानांचा प्रचार करण्यासाठी गोवा टुरिझमसह सहकार्य केले. २३ एप्रिल२०१९ रोजी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे यासाठी त्यांनी कार्यक्रमस्थळी सेल्फी पॉइंट्स आणि बॅनर्सच्या मदतीनेजनजागृती केली.

या कार्यक्रमाचे आयोजन अडव्हर्टायझिंग असोसिएट्स आणि क्युरेटेड बाय अशोक व्हिंटेज वर्ल्ड, सपोर्टेड बाय व्हिंटेज अँडक्लासिक कार फेडरेशन ऑफ इंडिया (व्हीसीसीएफआय) यांनी देशातील आघाडीचे वाहनउत्पादन मासिक- ऑटोकार हे मीडियाभागीदार या नात्याने विवा गोवा लाइफस्टाइल मासिक भागीदार म्हणून केले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...