गोदरेज अप्लायन्सेसतर्फे नावीन्यपूर्ण, भविष्यात्मक कूलिंग तंत्रज्ञान दाखल

Date:

नवा क्युब हा आधुनिक सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचे पाठबळ असलेले, विविध पर्याय असणारा स्टायलिश व आटोपशीर फूड व बेव्हरेज कूलर दाखल

 मुंबई: गोदरेज अप्लायन्सेस या भारतातील होम अप्लायन्सेस श्रेणीतील आघाडीच्या कंपनीने व रेफ्रिजरेशनमधील कौशल्यासाठी नावाजलेल्या ब्रँडने क्युब हे वैशिष्ट्यपूर्ण लाइफस्टाइल उत्पादन दाखल केल्याचे जाहीर केले आहे. या उत्पादनामध्ये आधुनिक सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग ग्रीन तंत्रज्ञानाचा समावेश असून हे तंत्रज्ञान कूलिंग करते, फ्रीझ करत नाही. भारतामध्ये हे प्रगत तंत्रज्ञान दाखल करणारा गोदरेज हा पहिला ब्रँड आहे.

सर्व पारंपरिक कूलिंग उपकरणे रेफ्रिजरंटवर आधारित कूलिंगवर अवलंबून असतात, तर गोदरेज क्युबमध्ये रेफ्रिजरंट, कॉम्प्रेसर यांचा वापर केला जात नाही. गोदरेज क्युब थर्मो-इलेक्ट्रिक चिपवर चालते. बहुतेकशी रेफ्रिजरंट निरनिराळ्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरतात. त्यामुळेच, नॉन-रेफ्रिजरंट प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञान सर्वात पर्यावरणपूरक कूलिंग सोल्यूशन ठरते.

काही महिन्यांपूर्वी, देशातील विविध राज्यांमध्ये हॉस्पिटॅलिटी श्रेणीसाठी क्युब प्रायोगिक तत्त्वावर दाखल करण्यात आले. भरभरून प्रतिसाद मिळाल्याने आता या ब्रँडने आपल्या ट्रेड चॅनलद्वारे बी2सी श्रेणीमध्ये प्रवेश केला आहे. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असणारे गोदरेज क्युब हे कूलिंग उपकरण प्रामुख्याने लहान प्रमाणातील कूलिंगची गरज असणाऱ्या लोकांसाठी तयार केले आहे. सर्वात मोठ्या फायद्यांपैकी एक फायदा म्हणजे, हे उत्पादन या श्रेणीतील अन्य उत्पादनांपेक्षा वेगळे असून ते 0 फ्रॉस्ट उत्पादन आहे, म्हणजेच डिफ्रॉस्ट करण्याची आवश्यकता भासत नाही. डिफ्रॉस्टिंग करावे लागत नाही, या वैशिष्ट्याबरोबरच आटोपशीर आकार व तुलनेने अधिक स्टोअरेज क्षमता, शांतपणे चालणे व आकर्षक डिझाइन अशा वैशिष्ट्यांमुळे गोदरेज क्युब हे कामाच्या व राहण्याच्या ठिकाणी, किचनच्याही पलीकडे जाऊन एक वैयक्तिक फूड व बेव्हरेज कूलिंग उपकरण म्हणून आदर्श ठरते – किचनव्यतिरिक्तचे हे ठिकाण बेडरूम असेल किंवा कार्यालये असतील, दुकाने असतील किंवा हॉटेल, होस्टेल व गेस्ट हाउस.

यामध्ये अन्यही काही वैशिष्ट्ये आहेत, जशी एलईडी फिट इंटिरिअर, स्टॅबिलायझरमुक्त कार्य, घरातील इन्व्हर्टरशी कम्पॅटिबिलिटी, मॅग्नेटिक ऑटो डोअर यंत्रणा, सहज देखभाल व सेवा आणि ग्राहकासाठी श्रेणीतील सर्वोत्तम सोय व कामगिरी, तसेच हे उत्पादन 100% हरित व पर्यावरणपूरक असणे.

उत्पादन दाखल केल्याविषयी, गोदरेज अप्लायन्सेसचे बिझनेस हेड व कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी यांनी नमूद केले, “आम्ही 61 वर्षांपूर्वी, आम्ही उत्पादन केलेले पहिला भारतीय रेफ्रिजरेटर दाखल केल्यापासून, भारतातील घराघरातील फ्रॉस्ट फ्री व डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटरसाठी लोकप्रिय पर्याय ठरण्याच्या हेतूने, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने विकसित होत आहोत. गेल्या काही वर्षांत, आम्ही रेफ्रिजरेशन / कूलिंग व त्यासंबंधीच्या क्षेत्रामध्ये मोठे कौशल्य विकसित केले आहे. गोदरेजमध्ये, पृथ्वी व भविष्यातील पिढ्या यांच्याविषयीच्या जबाबदारीचे पालन करत, आमच्या संबंधित घटकांना आनंद देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. क्युबच्या निमित्ताने आम्ही ग्राहकांच्या कमी प्रमाणातील कूलिंगच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांच्यासाठी आणखी एक विशेष लाइफस्टाइल उत्पादन दाखल केले आहे व या उत्पादनामध्ये प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग ग्रीन तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे. त्यामुळे हे उत्पादन शाश्वतही ठरले आहे. ब्रँडच्या ‘सोच के बनाया है’ या विचारसरणीला अनुसरून, ग्राहकांना नव्या नावीन्यपूर्ण, महत्त्वाच्या व हरित तंत्रज्ञानाचा अनुभव देण्यासाठी आम्ही सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांचे क्युब हे प्रतिक आहे.”

तंत्रज्ञानाविषयी बोलताना, गोदरेज अप्लायन्सेसचे थर्मोइलेक्ट्रिक अॅप्लिकेशन डेव्हलपमेंटचे असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट संजय लोनिअल यांनी सांगितले, “हवामानातील बदल ही एक जटिल समस्या असताना, सध्या वापरल्या जाणाऱ्या व्हेपर कॉम्प्रेशन सिस्टीमच्या ऐवजी पर्यायी तंत्रज्ञानाचा शोध सुरू आहे. बहुतेकशा व्हेपर कॉम्प्रेशन सिस्टीममध्ये रेफ्रिजरंटचा वापर केला जातो व त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आणखी वाढते. पर्यायी तंत्रज्ञान म्हणजे, रेफ्रिजरंट-मुक्त प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाचा कूलिंग, हीटिंग, वीजनिर्मिती व वेस्ट हीट रिकव्हरी या बाबतीत स्वच्छ वापर केला जातो. या प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर करून गोदरेज विशेष अॅप्लिकेशन विकिसत करण्याचा प्रयत्न करत आहे. शाश्वतता, कार्यक्षमता, पोर्टेबिलिटी, स्मॉलर फॉर्म फॅक्टर अशा विविध पैलूंच्या बाबतीत हे तंत्रज्ञान सरस असल्याने आम्ही या क्रांतिकारी प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञानाचा वापर क्युब या आमच्या नव्या उत्पादनामध्ये केला आहे. हे उत्पादन घरातील इन्व्हर्टरच्या बाबतीत कम्पॅटिबल असून ते 24/7 काम करते. स्टाइल व आरामदायीपणा असणारे गोदरेज क्युब हे आदर्श लहान कूलिंग उपकरण आहे.”

गोदरेज अप्लायन्सेसचे प्रॉडक्ट ग्रुप हेड अनुप भार्गव यांनी सांगितले, “प्रगत सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक कूलिंग तंत्रज्ञान समाविष्ट असणारे नवे मल्टि-अॅप्लिकेशन गोदरेज क्युब उत्पादन सादर करताना आम्हा अतिशय अभिमान वाटतो आहे. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये या उत्पादनाला मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर, आम्ही हे उत्पादन एंड युजर्ससाठी घरे व कार्यालये यांसाठी दाखल करत आहोत. आम्ही आमच्या आघाडीच्या ट्रेड पार्टनरकडे नमुना म्हणून हे उत्पादन दिले आहे आणि ते ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे. आमच्या सक्षम ट्रेड नेटवर्कचा लाभ घेण्याव्यतिरिक्त, आम्ही संभाव्यग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल सुविधांचाही वापर करणार आहोत. आटोपशीर आकार, डिफ्रॉस्टिंगची चिंता नाही व शांतपणे कार्य, या वैशिष्ट्यांमुळे अनेक प्रकारे वापरता येऊ शकते: आवाज करणाऱ्या बेडरूम रेफ्रिजरेटरऐवजी वापरणे किंवा विशेष पदार्थांसाठी स्वतंत्र जागा देणे किंवा कार्यालये, दुकाने, हॉटेल, होस्टेल, गेस्ट हाउस आदी ठिकाणी वापरणे. शिजवलेले पदार्थ, पेये, दूध व दुग्ध उत्पादने, फळे व चॉकलेट, औषधे अशा विविध प्रकारच्या घटकांच्या साठवणुकीसाठी क्युब हे उत्पादन आदर्श ठरेल.”

नवे क्युब दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे – मेटॅलिक ग्रे व ब्लॅक, तसेच त्यांची किंमत 6999 रुपये आहे, आणि हे उत्पादन भारतभर सर्वत्र उपलब्ध केले जाईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...