Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

२ ते ५ मार्च दरम्यान कर्नावल २०१९ साजरा करण्यासाठी गोवा सज्ज

Date:

रेप एस्केपेड फूड अँड लाइफस्टाइल फेस्टिव्हल २८ फेब्रुवारी ते ३ मार्च २०१९ दरम्यान

 पणजी– ही वेळ राम्बा साम्बाच्या तालावर डोलण्याची आणि लवकरच सुरू होत असलेल्या कर्नावलचे चार दिवस भरपूर मजामस्ती करण्याची.

 गोवा सरकारचे पर्यटन खाते २ ते ५ मार्च २०१९ दरम्यान सादर करत आहे, बहुप्रतीक्षीत गोवा कर्नावल. फ्लोट परेडला शनीवार, दोन मार्च रोजी गोव्याच्या राजधानीतून – पणजी येथून झेंडा दाखवला जाईल.

पणजीमध्ये नव्या मार्गावर परेडचा यशस्वी शो केल्यानंतर राजधानीतील फ्लोट परेड मीरामार ते डोना पावलादरम्यान सुरू राहील. शनीवारी पणजीतील या फ्लोट परेडला माननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर यांच्या हस्ते दुपारी चार वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झेंडा दाखवला जाईल.

यंदाच्या कर्नावलसाठी तुफान प्रतिसाद लाभेल अशी राज्याची अपेक्षा आहे. या महोत्सवाचे आयोजन मेसर्स विनायक डेकोरेटर्स करत आहे. माननीय पर्यटन मंत्री श्री. मनोहर आजगांवकर यांनी आज पत्रकार परिषदेत कर्नावलसाठी खास गाणे प्रदर्शित केले. या गाण्याची संगीत रचना/मिक्सिंग मुकेश अगरवाल यांनी केली आहे, तर ते रोक लाझारूझ आणि मुकेश घटवाल यांनी लिहिले आहे. क्वीनी फर्नांडीस आणि मुकेश घटवाल यांनी ते गायले आहे.

कर्नावलच्या पर्श्वभूमीवर गोव्यात सर्वत्र रंगीबेरंगी पताका, बॅनर्स, मुखवटे आणि या संकल्पनेला साजेशी सजावट करण्यात आली आहे. कर्नावलच्या या उत्साहवर्धक चार दिवसांत फ्लोट परेड गोव्यातील मुख्य शहरांत म्हणजेच पणजी (२ मार्च), मडगाव (३ मार्च), वास्को (४ मार्च) आणि म्हापसा (५ मार्च) रोजी होणार आहे. छोट्या शहरांत ही फ्लोट परेड पोंडा व कुंकोळी येथे ४ मार्च रोजी, तर मोर्जोरी व शिरोडा येथे ५ मार्च रोजी होणार आहे.

यावर्षी पणजीचे विल्यम अनीस (५३) किंग मोमो होऊन कर्नावल परेडचे नेतृत्व करतील. अनीस हे गेल्या कित्येक वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात व त्यांनी आतापर्यंतच्य काही कर्नावलमध्ये नर्तक म्हणून सादरीकरण केले आहे. किंग मोमो ही पौराणिक व्यक्तीरेखा असून ती कर्नावल साजरा करण्याशी संबंधित आहे. ते या चार दिवसांत ‘खा, प्या आणि मजा करा’ असा आदेश देणार आहेत. परेडमध्ये विविध विभागांअंतर्गत वेगवेगळे सहभागी पाहायला मिळतील व ते वैविध्यपूर्ण संकल्पना व संदेश दर्शवताना दिसतील. फ्लोट स्पर्धेसाठी बक्षिसाची एकूण रक्कम ५४.४० लाख रुपये आहे, तर सर्व केंद्रांच्या पायाभूत सुविधांचा खर्च १.०९ कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.

गोवा सरकारचे पर्यटन खाते सादर करत आहे, गोव्याचा उच्चभ्रू खाद्यपदार्थ आणि जीवनशैली महोत्सव – द ग्रेप एस्केपेड. बहुप्रतीक्षीत ग्रेप एस्केपेड खाद्यपदार्थ, फॅशन आणि मनोरंजनाच्या दुनियेतील सर्वोत्तमाचा आनंद घेण्यासाठी आयोजित केला जातो. या चार दिवसीय महोत्सवात पर्यटन, हॉस्पिटॅलिटी क्षेत्र, हॉटेल चालक, रेस्टॉरंट मालक, वायनरीज आणि उत्पादक एकत्र येत त्यांची सर्वोत्तम उत्पादने उपलब्ध करतात. हा ग्रेप एस्केपेड २८ फेब्रुवारी ते ३ मार्च २०१९ दरम्यान डी. बी. बांदोडकर मैदान, कंपाळ, पणजी येथे आयोजित करण्यात आला असून त्याचे व्यवस्थापन विनसन वर्ल्ड यांनी करत आहेत.

द ग्रेप एस्केपेड २०१९ मध्ये ४० पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी होणार असून त्यात स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वाइन उत्पादकांचा समावेश असेल. वाइनसोबत मजा घेण्यासाठी विविध खाद्यपदार्थ उपलब्ध करणारे स्टॉल्स प्रेक्षकांना खाद्ययात्रेचा वेगळाच अनुभव देतील. सहभागी वायनरीजमध्ये सुला विनयार्ड्स, ग्रोवर झांपा विनयार्ड्स, बिग बन्यान वाइन्स, ओशन किंग डिस्टीलर्स, टोनिया वाइन्स, गुड ड्रॉप वाइन्स, सँटीज वाइन्स, पोमार दे फअरुटाज, फ्रॅटेली वाइन्स, इंडस वाइन्स आणि इतरांचा समावेश आहे. गोयची चुल, बे १५, यलो चिली, आनंदाश्रम, टेम्पटेशन्स, सुआ कासा रेस्टॉरंट्स, हंग्री हॅट्स ग्रिल, ओ कॉकेरिओ अँड टिंज, टोरो टोरो हे ग्रेप एस्केपेडच्या खाद्यअनुभूतीमध्ये सहभागी होतील.

महोत्सवात येणाऱ्यांसाठी लक्षवेधी मनोरंजनाची सोय करण्यात आली असून त्यामुळे या महोत्सवाची रंगत आणि खुमारी आणखी वाढण्यास मदत होणार आहे. अनुषा शेख यांच्यातर्फे फॅशन शो, मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, डान्स- ओ- फिलिआ आणि गोवा इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे (जीआयपीए) नृत्य सादरीकरण, शाइन ऑन ड्युओ – सिडनी अँड सिल्विहना, राऊल विथ रॅग्ज टु रिचेस, बँडवॅगन, प्युअर मॅजिक, कार्लोस अँड फ्रेंड्स, अल्काट्राझ क्रिमसन टाइड आणि कॉफी कॅट्स यांचे संगीत सादरीकरण ग्रेप एस्केपेडची मजा आणखी वाढवतील.

महोत्सवाच्या वैशिष्ट्यांमध्ये ग्रेप स्टॉम्पिंग, ग्रेप एस्केपेड क्वीनची निवड असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, ज्यामध्ये विजेत्यांना खास गिफ्ट व्हाउचर्स, हॅम्पर्स व आणखी बरंच काही जिंकता येईल. वाइन्स अँड स्पिरीट्स एज्युकेशन ट्रस्ट लंडन, इंग्लंडशी संलग्न असणारे प्रमाणित सोमेलियर आणि कॉनेसेएर जॉन डिसूझा १ मार्च २०१९ रोजी टेस्टिंग सत्राचे खास आयोजन करणार आहेत.

ग्रेप एस्केपेडला हजारो प्रेक्षक विशेषतः स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक भेट देण्याची शक्यता आहे. हा महोत्सव गोव्याची समृद्ध संस्कृती, वारसा, खाद्यपदार्थ आणि मनोरंजन साजरे करणारा आहे व यंदाच्या भव्य कार्यक्रमासाठी तो सज्ज होत आहे. ग्रेप एस्केपेड सर्वांसाठी खुला असून संध्याकाळी सहा वाजता मौजमजेची सुरुवात होणार आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या -देवेन्द्रजी तुम्ही करत काय आहात ?

पुणे-महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या प्रचंड...

11 सरकारी रुग्णालयातून ‘बोगस’ औषधींचे वितरण:मंत्र्यांची कबुली

नागपूर:राज्यातील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये बोगस औषधांचा पुरवठा आणि वापर...

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...