· क्रिप्टोकरिअर्स जॉब पोस्टिंग्समध्ये मुंबईची दुसऱ्या क्रमांकावरून सातव्या स्थानावर घसरण
· महानगरांव्यतिरिक्त अहमदाबाद व थिरुअनंतपूरम या दोन शहरांचाही यादीत समावेश
बंगलोर: जगातील पहिल्या क्रमांकाची जॉब साईट म्हणून नावाजल्या जाणाऱ्या इन्डीडकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार जे याआधी क्रिप्टोकरन्सी संबंधित नोकऱ्यांच्या उप्लब्धतेमध्ये सर्वाधिक आघाडीवर असणाऱ्या शहरांच्या यादीत मुंबई शहर पहिल्या क्रमांकावर होते परंतु मार्च २०१८ मधील उपलब्ध नोकऱ्यांच्या तुलनेत आता मात्र मुंबईत बरीच घसरण झालेली दिसून आली आहे. क्रिप्टोकरिअर्समध्ये नोकऱ्यांच्या संधी बंगलोरमध्ये सर्वात जास्त आहेत, संपूर्ण देशभरात उपलब्ध असलेल्या क्रिप्टोकरन्सी नोकऱ्यांपैकी ३४ टक्के नोकऱ्या या एकट्या बंगलोर शहरात आहेत. त्यापाठोपाठ दुसरा क्रमांक पुणे शहराने पटकावला असून ८ टक्के नोकऱ्या पुण्यात आहेत. त्यानंतर हैदराबाद, नोएडा व गुरगाव ही शहरे आहेत.
एकीकडे मुंबईत मागणीमध्ये घट होत असताना दुसरीकडे अहमदाबाद व थिरुअनंतपूरम ही शहरे जी याआधी या यादीत नव्हती त्यांनी चक्क पहिल्या दहांमध्ये मुसंडी मारली आहे. उत्तरेकडील शहरांमध्ये मागणीत सातत्य दिसून येत असले तरी दक्षिणेकडील शहरांच्या तुलनेत ती मागेच आहेत.
क्रिप्टोकरिअर्ससाठी भारतातील आघाडीची शहरे:
२०१९ रँक (जानेवारी १८ ते डिसेंबर १८) |
२०१८ रँक (मार्च १७ ते मार्च १८) |
शहर |
भारतातील क्रिप्टोकरन्सी जॉब पोस्टिंग्सची टक्केवारी |
1 |
1 |
बंगलोर |
34% |
2 |
4 |
पुणे |
8% |
3 |
3 |
हैदराबाद |
8% |
4 |
7 |
नोएडा |
7% |
5 |
5 |
गुरुग्राम |
6% |
6 |
6 |
चेन्नई |
5% |
7 |
2 |
मुंबई |
4% |
8 |
– |
अहमदाबाद |
3% |
9 |
8 |
नवी दिल्ली |
3% |
10 |
– |
थिरुअनंतपूरम |
2% |
पहिल्या पाच शहरांमध्ये क्रिप्टोकरन्सी जॉब पोस्टिंग्सची टक्केवारी दर्शवणारी आकडेवारी:
इन्डीड इंडियाचे हेड ऑफ इंजिनिअरिंग, इंडिया व साईट डायरेक्टर श्री. वेंकट मचावरपू यांनी सांगितले, “ब्लॉकचेन तंत्रज्ञानात भरपूर वाव असल्यामुळे जर तुमच्याकडे आवश्यक ती कौशल्ये असतील तर क्रिप्टोकरिअर्समध्ये तुमच्यासाठी नव्या वाटा खुल्या झाल्या आहेत. २०१८ मध्ये दिसून आले की, अशा कुशल व्यावसायिकांसाठी मागणी मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. बंगलोर व हैदराबाद यासारख्या तंत्रज्ञानाचे मुख्य केंद्र असलेल्या शहरांमध्ये सर्वत जास्त संख्येने नोकरीच्या संधी निर्माण होत आहेत. त्याचबरोबरीने पुणे व हैदराबाद यासारखी शहरेदेखील या क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधी निर्माण करण्यामध्ये पुढे येत आहेत. क्रिप्टोचे एकूण बाजार भांडवलीकरण अंदाजे २११ बिलियन यूएस डॉलर्स इतके प्रचंड असल्यामुळे या क्षेत्रात नोकऱ्यांच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्यास सकारात्मक वातावरण आहे.”
ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला संस्थात्मक वातावरणात पारंपरिक पद्धतीने स्वीकारले न गेल्यामुळे आता हे क्षेत्र नवीन, आधुनिक संधी घेऊन उदयास येत आहे. भारतात सरकारी यंत्रणा क्रिप्टोकरन्सीला वैध करण्यासाठी कार्यरत असून भारतात भविष्यकाळात या क्षेत्रात विकासाच्या नवीन संधी नक्की निर्माण होतील.
इन्डीड
इन्डीड या जॉब साईटवर नोकऱ्या मिळवणाऱ्या लोकांची संख्या इतर कोणत्याही साईटपेक्षा जास्त आहे. इन्डीड ही जगातील पहिल्या क्रमांकाची जॉब साईट असून याठिकाणी वेब किंवा मोबाईलवर कोट्यवधी नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध आहेत. ६० देशांमधील २८ भाषांमध्ये ही साईट उपलब्ध आहे. इन्डीडवर दर महिन्याला २५० मिलियनपेक्षा जास्त लोक नोकऱ्या शोधतात, आपले रिज्युमे पोस्ट करतात व कंपन्यांबद्दल माहिती मिळवतात.