मुंबई : ‘महिंद्र अॅन्ड महिंद्र’च्या ‘जीतो ट्रक्स’ची विक्री 1 लाखाहून अधिक झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी कंपनीतर्फे ‘जीतो’चे ब्रॅन्ड अॅम्बेसिडर, अभिनेते मनोज वाजपेयी यांची ग्राहकांशी भेट घडवून आणण्याचा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला.
‘आपका आभार, एक लाख बार’ या योजनेमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत विजेते ठरलेले देशभरातील 12 हजार भाग्यवान ग्राहक या कार्यक्रमास उपस्थित होते. मनोज वाजपेयी यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी त्यांना मिळाली. प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना या कार्यक्रमात बक्षिसे देण्यात आली. ‘आपका आभार, एक लाख बार’ या मोहिमेचा समारोप या कार्यक्रमात करण्यात आला.
जीतो मिनि ट्रक जून 2015 मध्ये बाजारात सादर करण्यात आले होते. एक टनाहून कमी क्षमतेच्या श्रेणीमध्ये तब्बल 8 मॉडेल्स‘महिंद्र’ने आणली होती. यातील डिझेल इंजिनाच्या मॉडेलमध्ये एस, एल आणि एक्स या श्रेणी तिचाकी, मायक्रो-ट्रक आणि मिनि-ट्रक या वाहनांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.. जीतो ट्रक सीएनजी इंजिनानेदेखील युक्त आहेत.
उत्कृष्ट कार्यक्षमता आणि 33.4 किमी प्रति लिटरएवढी इंधनक्षमता यांमुळे जीतो हे वाहन त्याच्या श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट ठरले आहे. इ-कॉमर्स उद्योग, स्वच्छ भारत मोहीम आणि अन्य क्षेत्रांतही जीतो ट्रक्सना भरपूर प्रतिसाद मिळाला आहे.
या गुणवत्तेबरोबरच ग्राहकांच्या पसंतीची पावती मिळाल्याने ‘जीतो’ने ‘अपोलो सीव्ही ऑफ द यीअर’ हे पारितोषिक पटकावले आहे. ‘मेक इन तेलंगणा’च्या ध्विचित्रफीतीमध्येही ‘जीतो’चे प्रदर्शन झालेले आहे.
‘महिंद्र’विषयी ..
महिंद्र उद्योगसमुहाची एकूण उलाढाल 20.7 अब्ज डॉलर इतकी आहे. नावीन्यपूर्ण मोटारी व एसयूव्ही बनविणे, ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून ग्रामीण प्रगतीला चालना देणे, नवीन व्यवसायांची जोपासना करणे, हे या समुहाचा उद्दीष्ट आहे. तसेच युटिलिटी मोटारी, माहिती तंत्रज्ञान, अर्थसेवा आणि पर्यटनविषयक सेवा आदी उद्योगांमध्ये हा समूह कार्यरत आहे. महिंद्र समुहातर्फे जगात सर्वाधिक संख्येने ट्रॅक्टर बनविले जातात. कृषी उद्योग, हवाई उद्योग, व्यावसायिक वाहनांची निर्मिती, सुट्या भागांचे उत्पादन, संरक्षणविषयक उत्पादने, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, अपारंपारीक ऊर्जा, स्पीडबोट, पोलाद उत्पादन अशा इतरही अनेक क्षेत्रांमध्ये महिंद्र उद्योगसमूह आपले पाय रोवून आहे. शंभर देशांमध्ये या समुहाच्या विविध कंपन्या आहेत व त्यांमध्ये दोन लाख चाळीस हजारांहून अधिक अधिक कर्मचारी काम करतात.