Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

30% भारतीयांना आपल्याला किती लाइफ इन्शुरन्सची आवश्यकता आहे, याची काहीही कल्पना नाही.

Date:

बेंगळुरू: भारतीयांच्या दृष्टीने, जीवनातील प्रमुख उद्दिष्टांचे नियोजन करण्यासाठी लाइफ इन्शुरन्स हे पसंतीचे आर्थिक साधन आहे. घर बांधणे (43%), मुलांचे शिक्षण (38%), निवृत्ती (49%) व लीगसी क्रिएशन (50%) अशा महत्त्वाच्या उद्दिष्टांच्या नियोजनाच्या बाबतीत लाइफ इन्शुरन्स या साधनाचा विचार प्रामुख्याने केला जातो. अपत्याच्या लग्नाच्या बाबतीत नियोजन करत असताना, भारतीय लाइफ इन्शुरन्सबरोबरच मुदत ठेवीलाही प्राधान्य देतात. आपल्याला किती लाइफ इन्शुरन्सची गरज आहे, हे माहीत नसल्याचे सर्वेक्षणातील 30% सहभागींनी मान्य केले. यातून, भारतातील विमा संरक्षणाच्या बाबतीतील तफावत अधोरेखित होते. एक्साइड लाइफ इन्शुरन्सने केलेल्या 2018 मनी हॅबिट्स सर्वेक्षणातील हे काही निष्कर्ष असून, त्यातून भारतीयांचा आर्थिक जबाबदारीविषयक दृष्टिकोन व सुजाणपणा स्पष्ट झाला आहे.

या डिजिटल सर्वेक्षणामध्ये महानगरे व टिअर 2 शहरे अशा एकूण 12 शहरांतील व्यक्तींनी सहभाग घेतला. लाइफ इन्शुरन्स मालक/इच्छुक त्यांचे पैसे हातळण्याकडे कसे पाहतात, हे समजून घेण्याच्या हेतूने एक्साइड लाइफ इन्शुरन्सनेहे सर्वेक्षण केले. जीवनातील महत्त्वाच्या उद्दिष्टांचे नियोजन करताना ते कोणत्या आर्थिक साधनांचा वापर करतात? ते त्यांच्या कुटुंबीयांना किती चांगल्या प्रकारे सुरक्षित करतात? त्यांच्याकडे सध्या किती लाइफ इन्शुरन्स कव्हर आहे आणि या तुलनेत, किती कव्हर असावे असे त्यांना वाटते?

आर्थिक जबाबदारीबद्दल भारतीयांचा असणारा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी हे सर्वेक्षण परिपूर्ण विचार करते. भारतीय संपूर्ण आर्थिक जबाबदारीचा समावेश क्वचितच करतात, हे सर्वेक्षणातील विविध उप-विभागांद्वारे समोर आले आहे. कुटुंबातील कमावती व्यक्ती म्हणून, भारतीयांचा कल केवळ पैसे कमावण्याकडे, बचत करण्याकडे आणि जीवनातील उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करण्याकडे असल्याचे 2018 मनी हॅबिट्स सर्व्हेमुळे अधोरेखित झाले आहे.

एक्साइड लाइफ इन्शुरन्सचे मार्केटिंग व डायरेक्ट चॅनलचे संचालक मोहित गोयल यांनी सांगितले, “आर्थिक जबाबदारी ही संकल्पना समजण्यासाठी क्लिष्ट असू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे, आर्थिक जबाबदारी म्हणजे काय, याची कल्पना सतत बदलत असते. आर्थिक जबाबदारी या संकल्पनेमध्ये, पुरेशा लाइफ इन्शुरन्स कव्हरद्वारे संरक्षणाची तरतूद करणे, याचाही समावेश होतो. आर्थिक सर्वेक्षण 2018 नुसार, अन्य विकसित देशांच्या तुलनेत, भारतात लाइफ इन्शुरन्सचे प्रमाण सध्या 3%2 पेक्षा कमी आहे. आमच्या 2018 मनी हॅबिट्स सर्व्हेमध्येही हे आढळले असून, सर्वेक्षण केलेल्या 30% भारतीयांच्या बाबतीत वैयक्तिक इन्शुरन्स कव्हर अजूनही अनिश्चित आहे1. सरकारने व विमा उद्योगाने आर्थक साक्षरता वाढवण्यावर भर दिला असूनही4, लोकांना स्वतःसाठी व कुटुंबासाठी किती विमा संरक्षण आवश्यक आहे, हे ठरवणे आव्हानात्मक वाटते. सर्वेक्षण केलेल्यांपैकी 46% भारतीयांना वाटते की, त्यांच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा किमान 10 पट अधिक कव्हर असावे, परंतु केवळ 29% व्यक्तींकडे ते आहे1.”

आज, आर्थिक जबाबदारी या विषयाला अनेक पैलू आहेत व त्यामध्ये कमावणे, बचत करणे, नोंदी ठेवणे व कुटुंबाला महत्त्वाची माहिती देणे, यांचा समावेश आहे. गरजेच्या वेळी तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना माहिती उपलब्ध व्हावी, या हेतूने तुमच्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी ठेवणे आवश्यक असले तरी सर्वेक्षण केलेल्यांपैकी अंदाजे 38% भारतीय ही माहिती नोंदवून ठेवत नाहीत आणि नोंदणी ठेवणे महत्त्वाचे नाही, असे 15% भारतीयांना वाटते. कुटुंबीयांना आर्थिक बाबींची माहिती असणे किती महत्त्वाचे आहे, हे भारतीयांच्या लक्षात येत नाही, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे; सर्वेक्षण केलेल्या 37% भारतीयांनी सांगितले की, त्यांनी आपल्या आर्थिक बाबींची कल्पना कुटुंबीयांना दिलेली नाही.

सर्वेक्षण केलेल्यांपैकी 55% जण त्यांच्या आर्थिक तपशिलाची नोंद प्रत्यक्ष डायरीमध्ये करून ठेवतात1 असेही सर्वेक्षणात आढळले आहे; तर 38% जण एक्सेल फाइलमध्ये माहिती ठेवतात; 15% जण ही माहिती मोबाइल अॅपमध्ये ठेवतात. सर्वेक्षण केलेल्यांपैकी 66% जण त्यांच्या लाइफ इन्शुरन्स पॉलिसी बाँडची भौतिक स्वरूपातील प्रत जपून ठेवतात, केवळ 8% जणांनी त्यांच्या योजना ई-इन्शुरन्स खात्याशी लिंक केले आहेत.

भारतीय पैसे कमावणे, बचत करणे व एक निधी तयार करणे यांचा विचार करत असताना, ते इच्छापत्र तयार करणे, या आणखी एका महत्त्वाच्या पैलूला महत्त्व देताना दिसत नाहीत. तब्बल 72% जणांनी इच्छापत्र केलेले नाही1. इच्छापत्राचे महत्त्व माहीत असूनही हे चित्र दिसून येते. आश्चर्य म्हणजे, 45 वर्षे व त्याहून अधिक या वयोगटातही इच्छापत्र तयार करण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. भारतीयांसाठी आर्थिक साक्षरतेबद्दल जागृती व अंमलबजावणी करण्याची आजही आवश्यकत आहे, हे वरील निष्कर्षांतून दिसून येते.

 एक्साइड लाइफ इन्शुरन्स आपल्या विशेष ग्राहक जागृती कार्यक्रमाद्वारे भारतीयांना दीर्घ व आनंदी आयुष्यासाठी नियोजन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

भविष्याची भक्कम पायाभरणी: १,४५० तरुण मुलींना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी एलपीएफ शिष्यवृत्ती मिळाली

पुणे, : “शिक्षणाचा उद्देश आरशांचे खिडक्यांमध्ये आणि खिडक्यांचे दरवाजांमध्ये...

भारतातील लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत..अनंत गाडगीळ

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी...