या दिवाळीत डिजिटल सोने वापरून खरेदी केलेल्या दागिन्यांवर सरळ रू. 1000 ची सूट!
नवी दिल्ली- या भारतातील सर्वांत मोठ्या फिन्टेक मंचने आज घोषित केले की त्यांचे ग्राहक आता आपल्या डिजिटल सोन्याला कॅरेटलेनमधून ऑनलाईन पद्धतीने भारतातील त्यांच्या कोणत्याही स्टोअरमधून दागिन्यांमध्ये बदलू शकतात. प्रथमच, ‘सोने’ श्रेणीतील या नवीन योजनेमध्ये ग्राहक त्यांच्या सोने शिलकीच्या बदल्यात आपल्या आवडीचे दागिने खरेदी करू शकतात. ही सुविधा सर्व अँड्रॉईड आणि आयओएस युजरसाठी उपलब्ध आहे. दिवाळीच्या विशेष ऑफरचा भाग म्हणून मोबिक्विकचे ग्राहक त्यांच्या सोने शिलकीद्वारे दागिन्यांच्या खरेदीवर थेट रु. 1000 ची अतिरिक्त सूट मिळवू शकतात.
मोबिक्विक अॅपद्वारे डिजिटल स्वरूपातून भौतिक स्वरूपात सोन्याचे रूपांतरण सोप्या 3-टप्प्यांच्या प्रक्रियेद्वारे फक्त काही सेकंदात करता येईल. मोबिक्विकचे ग्राहक कॅरेटलेन स्टोअरला किंवा कॅरेटलेन वेबसाईटला भेट देऊन आपल्या डिजिटल सोने शिलकीच्या बदल्यात दागिने खरेदी करण्याची विनंती करू शकतात. ग्राहकांना त्यांचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि किती सोने रिडीम करायचे आहे त्याचे प्रमाण (ग्रॅममध्ये) द्यावे लागेल. कॅरेटलेनने व्यवहाराची प्रक्रिया सुरू केल्यावर मोबिक्विकच्या ग्राहकाला ओटीपी व व्यवहाराच्या रकमेचा एक एसएमएस मिळेल. कॅरेटलेनच्या कॅशियरला व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी दिल्यावर ग्राहकाच्या डिजिटल सोने शिलकीमधून तेवढ्या प्रमाणात सोन्याची कपात केली जाईल आणि कॅरेटलेनला हस्तांतरण केले जाईल. ऑनलाईन खरेदीसाठी, ग्राहकाला वेबसाईटवर लॉग-इन करून कॉल बॅकची विनंती करणे आवश्यक आहे.
मोबिक्विकने मागच्या महिन्यात सेफगोल्डच्या भागीदारीने आपल्या अॅपमध्ये डिजिटल सोने श्रेणीचा शुभारंभ केला होता. सेफगोल्ड हा एक डिजिटल मंच आहे जो ग्राहकांना व्हॉल्टेड सोने खरेदी, विक्री आणि प्राप्त करण्याची सुविधा प्रदान करतो. मोबिक्विक अॅपच्या युजरना किमान रु. 1 पासून 99.5% शुद्ध, 24-कॅरेट सोने व विक्रीचा पर्याय मिळतो.
या आरंभाविषयी बोलतांना श्रीमती उपासना टाकू, सह-संस्थापक आणि संचालक, मोबिक्विक म्हणाल्या की, “या उत्सवाच्या सुरवातीला सुरू केलेल्या आमच्या डिजिटल सोने श्रेणीमध्ये आम्हाला विलक्षण प्रतिसाद मिळाला आहे. सोने खरेदीसाठी दिवाळी हा सर्वात शुभ कालावधींपैकी एक समजला जातो.या भागीदारीद्वारे आम्ही ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपांचे परिपूर्ण एकत्रीकरण सादर करीत आहोत, ज्यामध्ये मोबिक्विकचे ग्राहक त्यांच्या मोबिक्विक अॅपमधील डिजिटल सोने शिलकीच्या बदल्यात कॅरेटलेन स्टोअरमध्ये सोन्याचे दागिने खरेदी करू शकतात. आम्ही ‘सोने’ श्रेणीवर फार मोठी भिस्त ठेवली आहे आणि या नवीन सुविधेला देखील ग्राहकांकडून विलक्षण प्रतिसाद मिळेल अशी आशा करतो.”
श्रीमती टाकू म्हणाल्या की, “या धनत्रयोदशीला, मी माझ्या आई आणि सासूबाईसाठी मोबिक्विक अॅपवरून डिजिटल सोने खरेदी करणार आहे आणि माझ्या डिजिटल सोने शिलकीचा वापर करून खरेदी केलेल्या कॅरेटलेन दागिन्यांनी या दिवाळीला त्यांना आश्चर्याचा धक्का देणार आहे.”
सेफगोल्डचे श्री. गौरव माथूर त्याविषय़ी अधिक बोलताना म्हणाले की, “आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांची सेफगोल्ड शिल्लक रिडीम करण्याचा पर्याय प्रदान करून आनंदित आहोत, जी त्यांनी कॅरेटलेन वेबसाईट आणि स्टोअर्समध्ये मोबिक्विक अॅपद्वारे खरेदी करून जमा केली आहे. या प्रदात्यामुळे आमच्या ग्राहकांच्या सेफगोल्ड होल्डिंग्जला अधिक कार्यक्षमता लाभली आहे आणि यामुळे सेफगोल्ड हे भारतातील एकमेव डिजिटल गोल्ड मंच व मोबिक्विक एकमेव फिन्टेक मंच बनले आहे जे दागिन्यांच्या स्वरूपात सतत विनिमय प्रदान करतात.”हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की मोबिक्विक अॅपद्वारे कॅरेटलेनकडून ग्राहकांनी सोने खरेदीकेल्यानंतर ते परत करता येणार नाही. तसेच, दागिन्यांचे घडणावळ शुल्क अतिरिक्त असेल. कोणत्याही स्टडेड दागिन्यांचा खर्च अतिरिक्त असेल (इतर घटकांसोबतच त्यामध्ये वापरलेल्या खड्याच्या दर्जानुसार).
मोबिक्विकविषयीः
मोबिक्विक हे भारतातील सर्वात मोठे संपूर्ण स्टॅक फिन्टेक मंच आहे. मोबिक्विक हे भारतातील क्रमांक दोनचे ग्राहक पेमेंट वॉलेट आहे. त्याचे जाळे विस्तृत आहे ज्यात 3 दशलक्ष थेट व्यापारी, 140+ बिलर्स आणि 107 दशलक्षहून अधिक युजरचा समावेश होतो. त्यांनी अलीकडेच क्रेडिटमध्ये स्वारस्य दाखवले आहे आणि ज्यातून ‘बूस्ट’ नावाच्या त्वरित क्रेडिट उत्पादनाची निर्मिती केली आहे. तसेच मोबिक्विकने भारतात संपत्ती व्यवस्थापनामध्ये अग्रणी असलेल्यांपैकी एक असलेल्या क्लिअरफंडच्या 100% अधिग्रहणासह संपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात नवीन प्रवेशाची घोषणा केली आहे.
बिपिन प्रीत सिंह आणि उपासना टाकू यांनी सन 2009 मध्ये कंपनीची स्थापना केली असून कंपनीने सेक्वाया कॅपिटल, अमेरिकन एक्स्प्रेस, ट्री लाईन एशिया, मीडिया टेक, जीएमओ पेमेंट गेटवे, सिस्को इन्व्हेस्टमेंट्स नेट1 आणि बजाज फायनान्स यांकडून चार फेरींचा निधी उभारला आहे. कंपनीची नवी दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पुणे आणि कोलकाता या प्रमुख ठिकाणांसह सबंध भारतभर कार्यालये आहेत. मोबिक्विक भारतातल्या डिजिटल व्यवहाराचा सर्वात मोठा स्त्रोत बनण्याचे आणि सन 2022 पर्यंत अब्जावधी भारतीयांना डिजिटल पेमेंट, कर्ज, विमा आणि गुंतवणूकीसाठी एकच मंच उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे.
सेफगोल्डविषयीः
सेफगोल्ड हे डिजिटल गोल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा एक ब्रँड आहे जे ग्राहक, उत्पादक, ज्वेलर्स आणि वित्तीय मंच यांचा समावेश असलेल्या सोन्याच्या उद्योगांतील एकाधिक भागीदारांसह कनेक्ट करण्यासाठी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचे आघाडीचे प्रदाता आहेत.
सेफगोल्डकडून खरेदी केलेले सोने हे ब्रिंक्स इंडियासह संपूर्णपणे विमाकृत आणि सुरक्षितपणे साठवले आहे आणि ग्राहकांचे इंटरेस्ट आयडीबीआय ट्रस्टीशीप सर्व्हिसेसद्वारे संरक्षित आहेत. सेफगोल्डद्वारे ग्राहकांना 24/7 म्हणजेच नेहमीच सोन्याची नाणी आणि बार वितरित करण्याची सेवा दिली जाते.