मुंबई– टाटा कन्सलटन्सी सर्विसेस (BSE: 532540, NSE: TCS), या आघाडीच्या जागतिक आयटी सेवा, कन्सल्टिंग आणि बिझनेस सोल्युशन पुरवठादार कंपनीने त्यांच्या ‘बिलियन स्टेप्स चॅलेंज’ या उपक्रमाला विक्रमी प्रतिसाद लाभल्याची घोषणा केली आहे. या उपक्रमात जगभरातील २००,००० सहभागींची नोंद झाली आणि त्यात एकूण ३ बिलियन पावलांची नोंद करण्यात आली. २.४ दशलक्ष किमी. हून अधिक अंतर यात एकत्रितरित्या कापले गेले. म्हणजेच, चंद्रावर जाऊन परत येता येईल अशा तीन फे-या किंवा सहा वेळा पृथ्वीप्रदक्षिणा किंवा गुरूभोवती साडेपाच फे-या.
टीसीएसचा ‘बिलियन स्टेप्स चॅलेंज’ म्हणजे कंपनीने कर्मचा-यांना सहभागी करून घेण्यासाठी आखलेला सर्वात मोठा उपक्रम आहे. टीसीएसची पन्नास वर्षे साजरी करण्यासाठी संपूर्ण संस्थेत राबवण्यात आलेल्या टीसीएस५० या कार्यक्रमाचा हा भाग आहे. अधिक व्यापक प्रमाणात बोलायचे झाल्यास, ‘बिलियन स्टेप्स’ म्हणजे उत्साहची अभिव्यक्ती आणि #OneTCSचा भाग म्हणून सर्व टीसीएस कर्मचा-यांनी एकत्र येणे. एका खास अॅपमध्ये लाखो पावलांची नोंद करण्यासाठी टीसीएसचे कर्मचारी वैयक्तिक स्वरुपावर आणि ग्रुपसोबत चालण्यासाठी, धावण्यासाठी बाहेर पडले. या कंपनीतच बनवण्यात आलेल्या अॅपमुळे कर्मचा-यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला होता. कारण ‘बिलियन स्टेप्स’ उपक्रमातील त्यांच्या सहभागाची अगदी मिनिटाला मिनिटाला त्यांना माहिती मिळत होती. अवघ्या काही दिवसांतच कंपनीने लाखोंचा टप्पा गाठला आणि शेवटच्या दिवशी ३ बिलियनवर आपण पोहोचलो, याची रीअल टाइम माहिती अॅपमधून मिळत असल्याने कर्मचा-यांना फारच आनंद होत होता. २८ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या काळात राबवण्यात आलेल्या या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद लाभला. ४८ देशांमधील २००,००० हून अधिक टीसीएस कर्मचा-यांनी यात सहभागी होत ठरवलेल्या लक्ष्याच्या ३०० टक्के अधिकचा टप्पा गाठला.
टीसीएसच्या ग्लोबल ह्युमन रीसोर्सेसचे ईव्हीपी आणि प्रमुख अजोय मुखर्जी म्हणाले, ”जगभरात विविध ठिकाणी असलेले आमचे कर्मचारी या एका ध्येयाच्या पूर्ततेसाठी एकत्र आले ही बाब म्हणजे #OneTCSच्या उत्साहाचे, त्यातील तत्वांचे प्रतिक आहे. या प्रकारच्या कर्मचा-यांना सहभागी करून घेणा-या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे टीसीएस ही एक प्रगतीशील व काम करण्याचा आनंद देणारी कंपनी ठरते आणि त्यामुळेच जगभरातील उत्कृष्ट प्रतिभेला ही कंपनी आकर्षून घेते आणि आपल्यासोबत जोडूनही घेते. जगभरातून टीसीएसमधील एकवाक्यतेचा हा स्वर म्हणजे टीसीएसच्या ५० वर्षांच्या प्रवासातील एक मैलाचा टप्पा आहे.”
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडविषयी (टीसीएस)
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही एक आयटी सेवा, कन्सल्टिंग आणि व्यवसाय सोल्युशन्स कंपनी असून गेल्या पन्नास वर्षांत कंपनीने जगातील अनेक मोठ्या व्यवसायांशी त्यांच्या रूपांतरणाच्या प्रवासात भागीदारी केली आहे. टीसीएस एक कन्सल्टिंगवर आधारित, आकलनाचा आधार असलेल्या आयटी, व्यवसाय व तंत्रज्ञानात्मक सेवांची एकात्मिक श्रेणी तसेच इंजिनीअरिंग सेवा देऊ करते. या सेवा दिल्या जातात कंपनीच्या अनोख्या स्थान स्वतंत्र वेगवान डिलीव्हरी प्रारूपाच्या माध्यमातून. सॉफ्टवेअर विकासातील सर्वोत्कृष्टतेचा मापदंड म्हणून या प्रारूपाला मान्यता आहे.
भारतातील सर्वांत मोठ्या बहुराष्ट्रीय व्यवसाय समूहाचा, टाटा समूहाचा भाग असलेल्या टीसीएसकडे ४६ देशातील सर्वोत्तम प्रशिक्षण लाभलेले ४००,०००हून अधिक कन्सल्टण्ट्स आहेत. कंपनीचा ३१ मार्च २०१८ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षातील एकत्रित महसूल १९.०९ बिलियन डॉलर्स होता. कंपनी भारतातील बीएसई (पूर्वीचा बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजः आणि एनएसई (नॅशनल स्टॉक्स एक्स्चेंज) यांच्या सूचीत समाविष्ट आहे. टीसीएसने हवामान बदलाविषयी घेतलेली सक्रिय भूमिका आणि जगभरातील समुदायांसोबत केलेल्या पुरस्कारप्राप्त कामामुळे कंपनीला जगातील अग्रगण्य शाश्वतता सूचींमध्ये स्थान मिळाले आहे. डॉ जोन्स सस्टेनिबिलिटी इंडेक्स (डीजेएसआय), एमएससीआय ग्लोबल सस्टेनिबिलिटी इंडेक्स आणि एफटीएसईफॉर गुड इमर्जिंग इंडेक्स या सूचींमध्ये कंपनीला स्थान मिळाले आहे.