Ø बिलाबाँग हाय इंटरनॅशनल स्कूल या भारतातील अग्रणी शाळेचे बांधकाम करणार
Ø पुण्यातील हडपसरमध्ये 2 एकरांवर विस्तार
पुणे : व्हॅस्कॉन इंजिनिअर्स लिमिटेड (बीएसई स्क्रिप आयडी VASCONEQ), या सर्वात विश्वासार्ह आणि पुण्यात मुख्य कार्यालय असलेल्या ख्यातनाम विकासकांनी लिना अशर फाउंडेशन, या शिक्षणक्षेत्रातील प्रमुख संस्थेबरोबर करारावर सह्या केल्या आहेत, या कराराअंतर्गत पुण्यातील हडपसरमधील मोक्याच्या जागेवर पहिल्या बिलाबाँग हाय स्कूलचे बांधकाम कऱण्यात येणार आहे.
तब्बल 2 एकरांवर विस्तारणाऱ्या या शाळेच्या इमारतीचा एकूण बिल्ट अप एरिया साधारणपणे 135,000 स्क्वेअर फुट आहे. करारानुसार व्हॅस्कॉन एक सुयोग्य इमारतीची उभारणी करेल आणि लिना अशर फाउंडेशनला टप्प्याटप्प्यात ती जागा दीर्घकाळासाठी भाडेतत्त्वावर देईल. नियोजित बिलाबाँग हाय इंटरनॅशनल स्कूलद्वारे सर्वोत्तम पायाभूत सुविधांची रचना केली जाईल आणि याद्वारे अनोख्या अध्ययन अनुभवाची निर्मिती केली जाईल, अशा प्रकारची ही शहरातील पहिलीच शाळा असेल. शाळेतर्फे साधारणपणे 2,200 विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल आणि त्यांना एकीकृत आणि समग्र अध्ययनासाठी सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जातील.
शाळेचे ठिकाण पुण्यातील एका सर्वात व्हायब्रंट मायक्रो-मार्केटमध्ये असून मगरपट्टा सिटी, अमानोरा टाउनशीप आणि खराडी येथील अधिवासी प्रकल्पांच्या सान्निध्यात असेल.
व्हॅस्कॉन इंजिनिअर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्री. वासुदेवन् म्हणाले की, “व्हॅस्कॉनचा इंजिनिअरिंग, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी)मधील तीन दशकांचा वारसा आहे, तसेच दर्जा आणि विश्वासार्हता असे समीकरणही जुळलेले आहे. लिना अशर फाउंडेशन हे शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध नाव आहे आणि त्यांच्याबरोबर संलग्नितपणे पुणे शहरात सर्वोत्तम सुविधा उभारत असल्याचा आम्हाला आनंदच आहे.”
व्हॅस्कॉन इंजिनिअर्स लिमिटेडबद्दल
व्हॅस्कॉन इंजिनिअर्स ही सर्वात महत्त्वाची नोंदणीकृत रियल इस्टेट कंपन्यांपैकी एक कंपनी आहे, तिचे मुख्य कार्यालय पुण्यात असून, कंपनीने 30 वर्षांच्या अनुभवासह 200 पेक्षा जास्त प्रकल्प राबवले आहेत. 500 दशलक्ष स्क्वेअर फुटांवर अनेक अधिवासी, औद्योगिक, हॉस्पिटॅलिटी आणि कम्युनिटी वेल्फेअर केंद्रांचे भारतभरातील 30 पेक्षा जास्त शहरांमध्ये इपीसीसह उभारणी करण्यात आलेली आहे आणि कंपनीचे हे स्वतःते रियल इस्टेट प्रकल्प आहेत. याहीपलिकडे जाता, इपीसीवर व्यावसायिक दृष्टीकोनावर आणि परवडणाऱ्या घरांच्या प्रकारावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.