Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गोदरेजच्या ‘यू अॅन्ड अस होम डिझाईन स्टुडिओ’चा पुण्यात विस्तार

Date:

फर्निचरची सहनिर्मिती करण्याच्या ग्राहकांच्या मागणीनुसार कंपनीकडून पुण्यात दुसऱ्या स्टुडिओची उभारणी

 पुणे ऑफिस आणि घरातील फर्निचर क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी आणि आघाडीची कंपनी असलेल्या गोदरेज कंपनीने औंध भागात आपला दुसरा यू अॅन्ड अस होम डिझाईन स्टुडिओ उभारला आहे. सुमारे चौदाशे चौरस फूट जागेवर उभ्या राहिलेल्या या शोरूममध्ये अंतर्गत सजावटीतील तज्ञांनी उत्तम घरांचे नमुने सादर केले आहेत. यू अॅन्ड अस होम डिझाईन स्टुडिओचे प्रमुख व कंपनीचे उपाध्यक्ष मनोज राठी यांनी या स्टुडिओचे उद्घाटन केले.

 व्यक्तिगत आवडीनिवडीस महत्त्व असलेल्या सध्याच्या युगात, ग्राहक स्वतःसाठी खास बनविण्यात आलेले फर्निचर घेण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यांच्यासाठी होम डिझाईन स्टुडिओतर्फे डिझायनर तंत्रज्ञ व स्थानिक सुतार यांचे एक पथक तयार करण्यात येते व ग्राहकाच्या आवडीनुसार, त्याच्या जागेला अनुरुप असे नवीन स्टाईलप्रमाणे फर्निचर बनवून देण्यात येते. यामध्ये अत्याधुनिक व अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे ग्राहकाच्या घराची व त्याला हव्या असलेल्या फर्निचरची आभासी प्रतिकृती बनविण्यात येते. त्याच्या आधारे अंतिम निर्णय घेऊन फर्निचर प्रत्यक्षात तयार करण्यात येते.

 या प्रसंगी गोदरेज इंटिरिओ विभागाचे सीओओ अनिल माथूर म्हणाले, की यू अॅण्ड अस ही एक अशी नावीन्यपूर्ण संकल्पना आहे, जिच्यामध्ये फर्निचरच्या डिझाईन टीममध्ये ग्राहक थेट सहभागी होतो आणि स्वतःच्या विशेष गरजांनुसार फर्निचर बनवून घेतो. ग्राहकांची क्रयशक्ती वाढत असताना जागतिक स्तरावरील वैविध्यपू्र्ण डिझाईन्सची माहिती मिळाल्यामुळे ग्राहकाचा चोखंदळपणा वाढत आहे. अशावेळी त्याला स्वतःच्या मतानुसार फर्निचर बनवून घेण्याची संधी मिळत आहे. यू अॅन्ड असचा पहिला स्टुडिओ पुण्यात सुरू झाल्यानंतर हा औंधमधील दुसरा स्टुडिओ थोड्याच अवधीत सुरू झाला, यावरून या संकल्पनेला देशभरात किती चांगला प्रतिसाद मिळतो, हे दिसून येते.

 यू अॅन्ड अस होम डिझाईन स्टुडिओचे प्रमुख व कंपनीचे उपाध्यक्ष मनोज राठी म्हणाले, की पुण्यात आमचा ब्रॅन्ड मजबूत होत असल्याबद्दल आम्हाला समाधान वाटते. यापुढील काळात, मॉल्समध्ये मोठ्या स्वरुपात आणि शहराच्या उपनगरांमध्ये लहान स्वरुपात स्टुडिओ उभे करण्याचे आमचे धोरण राहील. तसेच, ग्राहकांशी भागीदारी करणे आणि सहयोगी पध्दतीने, विश्वासाने त्यांच्या घरच्या अंतर्गत आणि फर्निचरच्या गरजा भागविण्यासाठी अंदाज व अद्वितीय उपाय देणे आहे, यावर आमचा भर राहणार आहे.

 यू अॅन्ड असने अलीकडेच नवीन ओळख आणि सुधारीत ब्रँड लोगोचे अनावरण केले आहे.  या नव्या लोगोमधून घरगुतीपणा व घरातील उबदारपणा सूचित करण्यात येतो. ग्राहकांना जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्यासाठी हा नवा लोगो त्यांना उद्युक्त करतो. लोगोमधील ‘&’ (अॅन्ड) या अक्षरातून ग्राहकाचा फर्निचर निर्मितीमध्ये असणारा सहभाग दर्शविण्यात आला आहे.

 यू अॅन्ड अस हा एक गोदरेज समुहाचा उपक्रम असल्याने, गुणवत्ता, योग्य वेळेत वितरण आणि टिकाऊपणा या गोष्टी यामध्ये अंगभूतच आहेत. ग्राहकाने स्वतः सर्व फर्निचरचे नियोजन करणे आणि बनवून घेण्याचा खटाटोप करणे या गोष्टींची गरज यू अॅन्ड असमुळे राहात नाही. आम्ही ती जबाबदारी पूर्ण करतो. शिवाय, एकदा काम हाती घेतल्यानंतर पुन्हा खर्च वाढवून सांगण्याची कंपनीची पध्दत नसल्यामुळे ग्राहकाला तो मोठा आधार मिळतो. एकदा चर्चा होऊन योजना तयार झाल्यावर, चार ते सहा आठवड्यांत ग्राहकाच्या घरात फर्निचर बसवून झालेले असते.

 यू अॅन्ड अस डिझाइन स्टुडिओबद्दल

गोदरेज इंटरियोने आपल्या यू अॅन्ड अस डिज़ाइन स्टुडिओच्या माध्यमातून फर्निचर डिझाईनची नावीन्यपूर्ण संकल्पना आणली आहे. आमच्या उत्पादनांचे नवनवीन प्रकार, त्यातील आमचे कौशल्य आणि ग्राहकाच्या नेमक्या गरजा ओळखण्याचे आमचे धोरण यातून फर्निचरची सह-निर्मितीकरण्याची ही आमची संकल्पना आहे. यू अॅन्ड असमध्ये, आम्ही आमच्या ग्राहकांना त्यांच्या आधुनिक फर्निचरचे डिझाईन स्वतःच तयार करण्याची संधी देतो आणि त्यांच्या कल्पनांना एकत्र करून अत्याधुनिक डिझाईन स्टुडिओमध्ये आमच्या कौशल्याने ते बनवून घेतो.  यातून आम्ही एक अभिनव आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार असे व्यवसाय मॉडेल निर्माण करीत आहोत. यू अॅन्ड अस डिझाइन स्टुडिओमध्ये ग्राहकाला चिरंतन गुणवत्तेचा अनुभव मिळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युवक काँग्रेसचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर

मुंबई, दि. ७ डिसेंबर २०२५ आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांना अटक:30 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

मुंबई-चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांना मुंबई आणि राजस्थान पोलिसांनी...

धार्मिक ध्रुवीकरण आणि मतचोरी करणे हा भाजपाचा मुख्य फंडा – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

लोकशाही वाचवण्यासाठी पुणेकरांनी पुढे यावे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे...