पुणे–सॅमसंग इंडिया आपल्या संशोधन आणि विकास केंद्रांसाठी 2018 साली आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी सारख्या सर्वोत्तम महाविद्यालयातून 1,000 अभियंता निवडणार आहे. निवडलेल्या अभियंतांपैकी बहुतांश उमेदवार आधुनिक अद्ययावत तंत्रज्ञानावर काम करतील, जसे आर्टिफिश्यल इंटेलिजेंस, इंटरनेट ऑफ थिंग्झ (आयओटी), मशीन लर्निंग, बायोमेट्रिक, नॅच्युरल लॅंगवेज प्रोसेसिंग, ऑग्मेन्टेड रियालिटी आणि 5जी सारखे नेटवर्क इत्यादी.आयआयटी आणि एनआयटी व्यतिरिक्त दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनीरिंग, बिट्स पिलानी, मनिपाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी आणि आयआयआयटी सारख्या इतर प्रमुख महाविद्यालयातून सुद्धा सॅमसंग गुणवंत आणि प्रतिभावंत उमेदवार निवडणार आहे.
मागच्या वर्षी सॅमसंगने आपल्या संशोधन आणि विकास केंद्रासाठी 800 अभियंता निवडले होते, आणि त्यापैकी 300 उमेदवार आयआयटी मधील विद्यार्थी होते.
ह्या वर्षीसुद्धा सॅमसंग आयआयटी मधून 300 अभियंता निवडून त्यांना विविध क्षेत्रात काम देणार आहे, जसे आर्टिफिश्यल इंटेलिजेंस, इंटरनेट ऑफ थिंग्झ (आयओटी), मशीन लर्निंग, बायोमेट्रिक, नॅच्युरल लॅंगवेज प्रोसेसिंग, ऑग्मेन्टेड रियालिटी आणि 5जी सारखे नेटवर्क इत्यादी.जगभरात सॅमसंगची 32 संशोधन आणि विकास केंद्रे आहेत.भारतात सॅमसंगची 3 संशोधन आणि विकास केंद्रे आणि 2 निर्मिती केंद्रे आहेत.संशोधन आणि विकास केंद्रे बेंगळुरू, नोयडा आणि दिल्ली इथे आहेत.दक्षिण कोरिया वगळता सॅमसंगचे सगळ्यात मोठे संशोधन आणि विकास केंद्र बेंगळुरुमध्ये आहे.संगणक विज्ञान सारख्या पारंपारिक शाखेव्यतिरिक्त इतर शाखांमधून पण विद्यार्थी निवडले गेले आहेत, जसे इलेक्ट्रिकल इंजीनीरिंग, गणित आणि संगणकशास्त्र, अप्लाइड मेकॅनिक्स, संख्याशास्त्र इत्यादी.
दक्षिण कोरिया वगळता सॅमसंगच्या बेंगळुरूमधील सगळ्यात मोठ्या संशोधन आणि विकास केंद्रात आर्टिफिश्यल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, नॅच्युरल लॅंगवेज प्रोसेसिंग, इंटरनेट ऑफ थिंग्झ (आयओटी), ऑग्मेन्टेड रियालिटी आणि ५जी नेटवर्क इत्यादी विषयात कौशल्य उपलब्ध आहे.नोयडा केंद्राची बायोमेट्रिक्स, मोबाइल सॉफ्टवेअर, मल्टीमीडिया, डेटा संरक्षण इत्यादी क्षेत्रात प्रमुख भूमिका आहे.उच्च दर्जाचे टीव्ही, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि टायझेन ऑपरेटिंग सिस्टम ह्यासंबंधी संशोधन प्रामुख्याने दिल्लीत केले जाते.सन 1996 पासून सॅमसंग भारतात निर्मिती व संशोधन आणि विकास कार्य करीत आहे.बेंगळुरूमधील संशोधन आणि विकास केंद्र आणि नोयडामधील निर्मिती केंद्र हे 1996 साली स्थापित केले गेले.
भारतातील संशोधन आणि विकास केंद्रात जगभरातील उत्पादनांसाठी संशोधन केले जाते आणि त्याच बरोबर भारतातील स्थानिक बाजारासाठी पण विशिष्ट संशोधन केले जाते.
कंपनीच्या संशोधन केंद्रांमध्ये विकसित झालेल्या अनेक “मेड इन इंडिया” कल्पना, जसे एस-बाइक मोड, अल्ट्रा डेटा सेव्हिंग मोड, वॉशिंग मशीनसाठी अॅक्टिववॉश+ इत्यादी, आज भारतात आणि इतर काही विकसनशील देशात विकल्या जाणार्या सॅमसंग उत्पादनांचा एक भाग आहेत. ह्यापैकी काही नवीन शोध सॅमसंगच्या जागतिक उत्पादनांचा पण भाग झाले आहेत.
– सॅमसंगने अनेक कल्पक उत्पादने, आणि अद्ययावत तंत्रज्ञान असलेली विशेष वैशिष्ठ्ये भारतात निर्माण केली आहेत आणि भारतासाठी निर्माण केली आहेत.- आमच्या कामाचे नवीनतम उदाहरण म्हणजे भारतासाठी निर्माण केलेली बिक्स्बी वॉइस क्षमता जी गॅलक्सी नोट 8 स्मार्टफोन बरोबर लॉन्च केली गेली. भारतातील ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून नवीन कल्पना आणण्याच्या सॅमसंगच्या इतिहासाला अनुसरून बिक्स्बी हे इंटेलिजेंट इंटरफेस आता भारतीय उच्चारण पद्धतीतील इंग्रजी समजू शकते.
– भारतात सॅमसंग पे लॉन्च करताना अॅपमध्ये डेबिट कार्ड, मोबाइल वॉलेट पेटीएम, आणि सरकारचे युनिफाईड पेमेंट इंटरफेस पण समाविष्ट केले आहे.
– गॅलक्सी एस8 मधील कॅमेराची नवीन वैशिष्ठ्ये जसे हळू/जलद मोशन, पॅनोरामा इत्यादी आणि गॅलक्सी नोट8 मधील सेल्फी घेताना असलेला बोकेह मोड हे पण एसआरआय-बी मध्ये विकसित झाले आहेत.
– एसआरआय ने नुकताच सोशल कॅमेरा विकसित केला आहे. हा कॅमेरा गॅलक्सी जे7 मॅक्स आणि जे7 प्रो मध्ये समाविष्ट केला गेला आहे. सॅमसंगच्या सोशल कॅमेरामुळे वापरणार्या व्यक्तिला फोटो आणि व्हिडिओ त्वरित शेअर करता येतात, संपादित करता येतात आणि शोधता येतात. सोशल कॅमेरा विकसित करण्यासाठी भारतातील विविध टीम्सना मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे लागले. एसआरआय-बेंगळुरूने स्मार्टफोनमधील कॅमेरासाठी सोशल शेअर, लाइव्ह फिल्टर, लाइव्ह स्टिकर विकसित केले, आणि एसआरआय-नोयडाने जियो-लाइक आणि ऑग्मेन्टेड रियालिटी डिफरेन्सिएशन विकसित केले.
नवीनतम तंत्रज्ञानाची माहिती असावी म्हणून सॅमसंगमधील अभियंतांची सतत शिकण्याची प्रक्रिया सुरू असते. आयआयआयटी-बेंगळुरू बरोबर आम्ही एम-टेक अभ्यासक्रम सुरू केला आहे ज्याचा एक भाग म्हणून शनिवारी आणि रविवारी महाविद्यालयातील प्राध्यापक सॅमसंगच्या संशोधन आणि विकास केंद्रात येऊन कठीण निवड प्रक्रियेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना शिकवतात.
आयआयटी बरोबरचा आमचा संबंध फक्त उमेदवार निवडणे एवढाच नाही, तर वर्षभरात आम्ही आयआयटी आणि इतर संस्थांबरोबर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो.
उदाहरण:
सॅमसंग डिजिटल अकॅडेमी उपक्रमांतर्गत सॅमसंगने इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी, दिल्ली मध्ये सॅमसंग आयओटी इनोवेशन लॅब सुरू केले आहे.
2017 साल हे पुरस्कार देण्याचे सातवे वर्ष असेल. उद्योजकता सेलच्या मदतीने हे पुरस्कार प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या आयआयटी मध्ये आयोजित केले जातात. ज्या विद्यार्थ्यांनी/ गुणवंत व्यवसायिकांनी कल्पक दृष्टीकोन वापरुन विविध प्रणाली आणि प्रक्रिया सुधारण्याचा प्रयत्न केला आहे व स्थानिक उत्पादने आणि सेवा विकसित केल्या आहेत त्यांना हे पुरस्कार आधार देण्याचे काम करतात आणि प्रोत्साहित करतात.
दर वर्षी इंडियन रिसर्च नेटवर्क नावाचा 1 दिवसाचा परिसंवाद आयोजित केला जातो. ह्यामध्ये एक विषय निवडून त्या विषयातील संशोधक आणि एसआरआय-बी मधील वरिष्ठ व्यवस्थापक ह्यांच्या बरोबर सत्र आयोजित केले जाते. असे केल्याने सर्वोत्तम प्रशिक्षकांशी संबंध येतो आणि भविष्यात सहकार्य करण्याची संधी निर्माण होऊ शकते.
एसआरआय-बी आणि आयआयआयटी-बेंगळुरू ह्यांच्यामधील करारानुसार सॅमसंगच्या कर्मचार्यांना संगणक विज्ञानात एम-टेक पदवी दिली जाते. कर्मचारयांना कठीण प्रवेश परीक्षा द्यावी लागते आणि त्यानंतर एक आंतरिक निवड प्रक्रियेतून जावे लागते आणि मगच त्यांना एमटेक अभ्यासक्रमात प्रवेश मिळतो. आयआयआयटीबी मधील प्राध्यापक शनिवारी आणि रविवारी बेंगळुरूमधील सॅमसंग कंपनीत येऊन शिकवतात.
एसआरआय-बी मध्ये संशोधन कौशल्य वाढवण्यासाठी आम्ही आयआयटी सारख्या सर्वोत्तम महाविद्यालयांबरोबर सहकार्य करून आमच्या कर्मचार्यांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रायोजित करतो. आमच्या गुणवंत कर्मचार्यांना नवीन कौशल्य/ संशोधन विषय शिकायची संधी मिळावी म्हणून हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे.
हा कार्यक्रम 2014 साली सुरू झाला. आज पर्यन्त आम्ही आयआयटी/आयआयएससी मध्ये बाह्य संशोधन प्रायोजक कार्यक्रमांतर्गत 5 कर्मचार्यांना प्रायोजित केले आहे. सॅमसंगमधील वरिष्ठ सल्लागार/ संशोधक अशा कर्मचार्यांना सतत मदत करतात, आधार देतात आणि प्रोत्साहित करतात.
सॅमसंगच्या वरिष्ठ अधिकार्यांचे मत
श्री दिपेश शाह, व्यवस्थापकीय संचालक, सॅमसंग भारतीय आर&डी संस्था, बेंगळुरू आणि जागतिक वरिष्ठ उपाध्यक्ष, सॅमसंग म्हणतात, “भारतात होणार्या संशोधन आणि विकासाकडून सॅमसंगच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे. आम्ही 22 वर्षांपासून भारतात आहोत. भारतातील तीन संशोधन आणि विकास केंद्रात अद्ययावत संशोधन केले जाते. “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत, भारतातील संशोधन आणि विकास केंद्रात भारतीय ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून नवीन कल्पनांचा विचार केला जात आहे आणि त्याचा उपयोग जगभरातील सॅमसंग उत्पादनात पण केला जातो”.
ते पुढे म्हणाले, “ह्या वर्षी सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयातून आमच्या 3 संशोधन आणि विकास केंद्रांसाठी आम्ही 1,000 अभियंता निवडणार आहोत, ज्या पैकी 300 आयआयटी मधील असतील. बहुतांश अभियंता आर्टिफिश्यल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, सिग्नल प्रोसेसिंग, कम्प्युटर विझन, मोबाइल सुरक्षा, बायोमेट्रिक्स इत्यादी सारख्या क्षेत्रात काम करतील. तिथे प्रतिभा आणि कौशल्याची खूप आवश्यकता आहे.”