Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सायप्रसच्या भूमीवर 10 दिवस – ‘ट्रॅव्हल एक्सपी’ची पाच भागांची मालिका

Date:

मुंबई-आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यांची माहिती ट्रॅव्हल एक्सपी वाहिनीतर्फे सादर केली जाणार आहे. ‘टेन डेज सायप्रस’ असे या कार्यक्रमाचे नाव आहे. या सफरीचे चित्रिकरण‘ट्रॅव्हल एक्सपी’ने अत्याधुनिक ‘फोर-के’ तंत्रज्ञानाने केले असून ‘एचडी’ स्वरुपात त्याचे प्रक्षेपण होईल. ट्रॅव्हल एक्सपी हे जगातील सर्वात आघाडीचे आणि 9 कोटी घरांमध्ये आवडीने पाहिले जाणारे प्रवासवर्णन क्षेत्रातील टीव्ही चॅनेल आहे.

‘ट्रॅव्हल एक्सपी’च्या अॅंकर सब्रिना चॅकिसी या ‘टेन डेज सायप्रस’ सादर करणार आहेत. त्या मुळात ब्रिटीश टेलिव्हिजनवरील सुप्रसिध्द सादरकर्त्या आणि पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. ‘द ब्रिटीश फॅशन अॅवॉर्ड्स’ या कार्यक्रमाचे थेट सादरीकरण त्यांनी नुकतेच केले. तसेच’ द गोल्डन ग्लोब’मध्ये लेडी गागा आणि ख्रिस्तोफर हेली यांच्या सब्रिना यांनी घेतलेल्या मुलाखतीही गाजल्या. सब्रिना या नेहमीच विविध वाहिन्यांवर कार्यक्रम सादर करीत असतात, त्याचप्रमाणे बूट्स, ग्लॉसी बॉक्स,लेगो यासारख्या ब्रॅन्ड्सच्या जाहिरांतींना आपला आवाज पुरवीत असतात. ‘व्हाईब 197.6 एफएम’ या रेडिओवर ब्रेकफास्ट शो सादर करण्याबद्दल त्या सर्वांना परिचित आहेत.

प्रवासाची आवड असणाऱ्यांना आणि खाद्यप्रेमींना सायप्रसमधील विविध ठिकाणांची व खाद्यपदार्थांच्या चवींची सफर सब्रिना घडवून आणणार आहेत. ग्रीक पुराणकथांमध्ये उल्लेख असलेल्या आणि संस्कृतीचा समृध्द वारसा लाभलेल्या अनेक जुन्या शहरांमध्ये फेरफटका मारण्याचा अनुभव दर्शकांना सब्रिना देणार आहेत.

या कार्यक्रमाबाबत ट्रॅव्हल एक्सपीच्या संचालिका निशा छोतानी म्हणाल्या, ‘टेन डेज सायप्रस’ हा एकमेवाद्वितीय व अनोखा कार्यक्रम सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या कार्यक्रमात शंभर टक्के खरे अनुभव मांडण्यात आले आहेत आणि ‘फोर-के’ व ‘एचडी’ या तंत्रज्ञानामुळे या अनुभवांचा आनंद द्विगुणित होणार आहे. भारतात हा कार्यक्रम दि. 12 ऑगस्ट रोजी ट्रॅव्हल एक्सपी वाहिनीवर प्रक्षेपित होईल. ग्रीक पुराणकथांमध्ये उल्लेखलेल्या सायप्रसमधील शहरांचा इतिहास व संस्कृती, तसेच तेथील सुंदर समुद्रकिनारे यांचा अविस्मरणीय अनुभव दर्शकांना यातून मिळेल.

सायप्रसचे उच्चायुक्त एजिस लॉयझू म्हणाले, ‘ट्रॅव्हल एक्सपी’ने एक संपूर्ण कार्यक्रम आमच्या सुंदर भूमीत चित्रित केला, याचा आम्हाला आनंद आहे. या कार्यक्रमातून पर्यटकांना आमच्या देशातील अदभूत ठिकाणांची माहिती मिळेल व ती प्रत्यक्ष पाहण्याची आणि सायप्रसमधील जीवनशैली अनुभवण्याची संधी ते अनुभवतील, असा मला विश्वास वाटतो. ‘टेन डेज सायप्रस’ हा कार्यक्रम सर्वांनी पाहावा आणि सायप्रसच्या प्रेमात पडावे, असा आमचा आग्रह आहे.

‘टेन डेज सायप्रस’ हा कार्यक्रम पाच भागांमध्ये सादर होईल. लारनाका या शहराचा यात समावेश असेल. लाझारुस या संताचे वास्तव्य असणारे व दहा हजार वर्षांचा इतिहास असणारे हे शहर जगातील सर्वात जुन्या अशा वीस शहरांमध्ये मोडते.

दुसऱ्या भागात निकोशिया या सायप्रसच्या सर्वात मोठ्या शहराची वैशिष्ट्ये दाखवण्यात येतील. निकोशिया ही गेली 1100 वर्षे.सायप्रसची राजधानी आहे. मध्ययुगीन घरे व अवशेष जतन केलेले फिकार्दू हे गाव आणि ट्रूडूज डोंगररांगा यांचे विलोभनीय दर्शनही यामध्ये होईल.

खिरोकितिया या तिसऱ्या भागात ट्रूडूज डोंगरांकडे जाणारा मार्ग अणि त्यावरील ‘युनेस्को’ने जतन करून ठेवलेली चर्चेस पाहायला मिळतील. यातून ग्रीक संस्कृती व इतिहास यांची काही माहिती दर्शकांना होईल, तसेच पॅफोज येथील सुंदर समुद्रकिनारेही बघता येतील.

कार्यक्रमाच्या पुढील भागात ग्रीक पुराणकथा आणि रोमन तत्वज्ञान यांची अधिक माहिती देताना पॅफोज पुरातत्व पार्कच्या कहाण्या सादर करण्यात येतील. यावेळी लिमासोल या एेतिहासिक शहराचा फेरफटका आणि भूमध्य सागरातील ‘काईट सर्फिंग’ची मजा दर्शकांना अनुभवता येणार आहे.

कार्यक्रमाच्या अंतिम भागात अकामाज नॅशनल पार्क आणि तेथील जैववैविध्य सादर करण्यात येईल. सायप्रसमधील प्रसिध्द असलेल्या गाढवांच्या अभयारण्यात फेरफटका आणि या देशातील लज्जतदार खाद्यपदार्थांची रेसिपी या गोष्टीही दर्शकांना आकर्षित करतील.

ट्रॅव्हलएक्सपी’विषयी:

ट्रॅव्हलएक्सपी हा ‘सेलिब्रेटीज मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ब्रिटनमधील ‘मिडिया वर्ल्डवाइड लिमिटेड’ यांचा संयुक्त उपक्रम आहे. प्रक्षेपण, जाहिरात, मीडिया कन्सल्टिंग आणि इतर संबंधित सेवा या कंपन्या देतात. ही कंपनी 10 (दहा) उपग्रह वाहिन्या चालवते. ट्रॅव्हलएक्सपी ही जगातील आघाडीचा प्रवासी वाहिनी आहे. उत्तर अमेरिका व युरोपमध्ये या वाहिनीने ट्रॅव्हलएक्सपी 4-के हे जगातील पहिले ‘4-के एचडीआर चॅनेल’ एसईएस व इयूटेलसॅट यांच्या सहकार्याने सुरू केले आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजित पवारांबरोबर नाहीच , महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, खुद्द शरद पवारांची मान्यता – प्रशांत जगताप

पुणे- गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस...

कोर्टाच्या आवारातच महिलेवर कारमध्ये सामूहिक अत्याचार

ठाणे- आर्थिक विषमता , सामाजिक विषमता या बरोबर ...