पुणे: रिलायन्स कॅपिटल लिमिटेडची उपकंपनी रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्सने प्रमुख बँकांमधील एक, बँक ऑफ महाराष्ट्र बरोबर बँकॅश्युरंस संदर्भात व्यापक करार केला. या भागीदारीचे लक्ष सर्वाधिक लोकप्रिय वित्तीय सेवा सुपरमार्केटच्या रूपाने बँकेची स्थिती आणि बँकेच्या ग्राहकांच्या आधाराची संवृद्धी आहे. बँकेसाठी या भागीदारीचा उद्देश वितरण शुल्कामध्ये वाढ होणे हा आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे संपूर्ण देशामध्ये आणि विशेषत: महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरीय, शहरी आणि ग्रामीण भौगोलिक भागामध्ये शाखांचे व्यापक जाळे आहे. या शाखांद्वारे रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्सला अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल.
या युतीचा प्रारंभ करतेवेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आर पी मराठे म्हणाले “रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्सबरोबर भागीदार होण्यास आम्हास विशेष आनंद होत आहे कारण या भागीदारीमुळे संरक्षण, बचत आणि गुंतवणूक अशा पूरक वित्तीय सेवा आम्ही आमच्या ग्राहकांना सादर करू शकू. रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्स त्यांच्या 700 पेक्षा अधिक शाखांना वितरण कव्हरेजसह आमच्या ग्रामीण आणि शहरी बाजारपेठेमध्ये विशिष्ट सेवा पुरविण्यासाठी त्याचबरोबर वितरण परिचलीत करण्याच्या स्थितीमध्ये आहे.”
भागीदारी संदर्भात रिलायन्स निप्पॉन लाईफ इन्शुरन्सचे कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशीष व्होरा म्हणाले “बँक ऑफ महाराष्ट्रनी आम्हास मोठी संधी उपलब्ध करून दिलेली असून आम्ही या संधीचा फायदा करून घेण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रक्रियांची उपाययोजना केलेली आहे. आम्ही देऊ करत असलेले दीर्घकालीन संरक्षण आणि खात्रीच्या परताव्याची उत्पादने बँकेच्या उत्पादनाशी पूरक असतील. ही संधी वित्तीय क्षेत्रामधील बँकेचा ब्रॅंड यासह आम्हास आमची क्षमता वृद्धिंगत करण्याची सुसंधी असून आम्ही ग्राहकांना चांगला परतावा देवू शकू”