व्होडाफोन एम-पेसाचा व्हीएलसीसीशी करार, सौंदर्य सेवा मिळवणं आता सोपं होणार
सौंदर्य आणि स्वास्थ्य सेवांचे तत्काळ शुल्क भरण्यासाठी व्होडाफोनची एम- पेसाशी भागिदारी
एम-पेसाने पैसे भरा आणि मिळवा अतिरिक्त पाच टक्के कॅशबॅक पन्नास रुपयांपर्यंत
व्होडाफोन एम- पेसाने आज सौंदर्य आणि स्वास्थ्य सेवा विभागात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले असून त्यासाठी वंदना लुथ्रा कर्ल्स अँड कर्व्ह या प्रसिद्ध साखळीशी धोरणात्मक भागिदारी केली आहे. देशभरातील सर्व व्हीएलसीसी केंद्रामध्ये व्होडाफोन एम- पेसाद्वारे तत्काळ शुल्क भरत येणार आहे आणि ग्राहकांना आकर्षक सवलतींचा लाभही घेता येणार आहे.
व्होडाफोन एम- पेसा युजर्सना व्हीएलसीसीमध्ये वजन व्यवस्थापन उपक्रम, त्वचा आणि केसांवरील उपचार, सौंदर्य किंवा वैयक्तिक काळजी सेवा यांचा लाभ घेऊन ६० टक्के सवलत मिळवता येणार आहे. त्याशिवाय ग्राहकांना पन्नास रुपयांपर्यंतचा अतिरिक्त पाच टक्के कॅशबॅकही मिळवता येणार आहे. त्यासाठी त्यांना केवळ एम-पेसाच्या सहाय्याने या ऑफरचे पैसे भरावे लागतील.
या सहकार्याबाबत सुरेश कुमार, ऑपरेशन्स संचालक, व्होडाफोन इंडिया म्हणाले, ‘व्हीएलसीसीबरोबर भागिदारी केल्याबदद्ल आम्ही आनंदात आहोत. या भागिदारीद्वारे आम्ही ग्राहाकंना व्हीएलसीसी येथील आरोग्य आणि सौंदर्य सेवांचे पैसे भरण्यासाठी सुरक्षित, सोयीस्कर आणि वेगवान मार्ग पुरवणार आहोत.’
भागिदारीबद्दल संदीप आहुजा, समूह संचालक, व्हीएलसीसी हेल्थकेअर लि. म्हणाले, ‘ग्राहकांचा एकंदर अनुभव उंचावण्यासाठी व्हीएलसीसीमध्ये आम्ही सातत्याने सोप्या सोयीसुविधा देण्याचा प् रयत्न करत असतो. व्होडाफोनशी त्यांचे डिजिटल वॉलेट- एम-पेसा वापरण्यासाठी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे आमच्या ग्राहकांना त्यांच्या सौंदर्य आणि स्वास्थ्य गरजांसाठी जागतिक दर्जाची उत्पादने व सेवा सोप्या आणि कॅशलेस पद्धतीने उपलब्ध होतील’
बँक सेवा न वापरणाऱ्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे व्होडाफोन एम- पेसा हे बँक मोबाइलवर आणण्याचा सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर मार्ग आहे. शिवाय, पॅन भारतात असलेले १,४०,००० प्रतिनिधी आणि १६.४० दशलक्ष ग्राहकक यांसह व्होडाफोन एम- पेसा ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक प्रतिनिधी आहे. आज एम- पेसा आर्थिक सर्वसमावेशकता आणि एम- कॉमर्स शक्य करण्यासाठी मोठी भूमिका बजावत आहे. एम- पेसामध्ये मोबाइल पेमेंट क्षेत्रातील व्होडाफोनचे जागतिक कौशल्य तसेच भारतातील लक्षणीय नेटवर्क आणि आयसीआयसीआयद्वारे पुरवली जाणारी आर्थिक व्यवहारांची सुरक्षा यांचा योग्य मेळ घालण्यात आला आहे.