महाराष्ट्र सरकारच्या मदत कार्यात ‘अ‍ॅक्सिस बँक’ही सहभागी

Date:

पुणे,  : ‘कोरोना व्हायरस’मुळे सर्वाधिक बाधित झालेल्या भागांना आवश्यक वस्तू पुरवून महाराष्ट्र राज्य सरकारला मदत करण्यास देशातील खासगी क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बॅंक, अ‍ॅक्सिस बँक कटिबद्ध आहे. पुणे महानगरपालिका, पुण्यातील ससून रुग्णालय, सीपी-पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, सीपी-पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, नागपूर महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था व तेथील अधिकाऱ्यांच्या सहयोगाने नागरिकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी अ‍ॅक्सिस बँक कार्य करीत आहे.

अ‍ॅक्सिस बँकेच्या या सामाजिक उपक्रमाची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अ‍ॅक्सिस बँकेचे प्रेसिडेंट व ब्रॅंच बॅंकिंग विभागाचे प्रमुख रवी नारायणन यांचे कौतुक केले आहे.

‘कोरोना व्हायरस’च्या बाधितांची संख्या वाढत असताना, ती रोखण्यासाठी व राज्यातील कोरोनाच्या साथीला आळा घालण्यासाठी अनेक अत्यावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेची व पुरवठ्याची गरज आहे. पीपीई किट, एन-95 वॉशेबल मास्क, सॅनिटायझर, मोबाईल क्लिनिक, इन्ट्यूबेशन बॉक्स, सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशन, स्प्रे पंप, थर्मल आयआर गन, ऑक्सिमीटर आदी वस्तू व उपकरणे अ‍ॅक्सिस बँकेतर्फे कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना व नागरिकांना आतापर्यंत पुरविण्यात आल्या आहेत.

याव्यतिरिक्त, या कठीण काळातही राज्यभरातील आपल्या ४७३ इतक्या विस्तृत शाखांच्या माध्यमातून बॅंकिंग व आर्थिक सेवा सुरळीत राहतील, याची दक्षता बॅंकेने घेतलेली आहे.

अ‍ॅक्सिस बँकेविषयी:

अ‍ॅक्सिस बँक ही भारतातील खासगी क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी बँक आहे. ही बँक मोठ्या आणि मध्यम कंपन्या, एसएमई, कृषी आणि किरकोळ व्यवसाय करणाऱ्यांना अनेकविध सेवा प्रदान करते. 31 मार्च 2020 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, अ‍ॅक्सिस बँकेच्या देशभरात 4,528 शाखा व विस्तारीत कक्ष, तसेच 12,044 एटीएमही आहेत. बँकेचे नेटवर्क 2,521 केंद्रांमध्ये उपलब्ध आहे. यातून बॅंकेच्या सेवांची व उत्पादनांची मोठी व्याप्ती अनेक स्तरांतील ग्राहकांना मिळते. अ‍ॅक्सिस समुहामध्ये अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंड, अ‍ॅक्सिस सिक्युरिटीज लि., अ‍ॅक्सिस फायनान्स, अ‍ॅक्सिस ट्रस्टी, अ‍ॅक्सिस कॅपिटल, ए.ट्रेड्स लि., फ्रीचार्ज आणि अ‍ॅक्सिस बँक फाउंडेशन यांचा समावेश आहे.

अ‍ॅक्सिस बँकेच्या अधिक माहितीसाठी, कृपया https://www.axisbank.com ही वेबसाइट पाहा.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अशोक खरात याच्या अटकेनंतर रुपाली चाकणकर फरार:रुपाली पाटील-ठोंबरेंच्या आक्रमक पोस्टने खळबळ

पुणे -अशोक खरात याच्या अटकेनंतर राज्यभरात खळबळ उडाली असतानाच...

अजित पवारांच्या बंगल्याबाहेर जादूटोणा,काळी जादू ? अशोक खरातवर संशय:,देवगिरी बंगल्याबाहेर सापडल्या संशयास्पद वस्तू

मुंबई-तथाकथित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपांवरून अटक...

‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ आध्यात्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम शनिवारी पुण्यात …

पुणे-संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र...