3.5 लाख CZ हिरे असणारी मर्सिडिज बेंझ लक्ष्मी डायमंडकडून सादर

Date:

मुंबईसणासुदीपूर्वीच्या दिवसांत उत्साह अधिक वाढवण्यासाठी, लक्ष्मी डायमंड या नामवंत हिरे उत्पादक कंपनीने या कार्यक्रमाचे शिल्पकार राजेश बजाज (व्यवस्थापकीय संचालक, बजाज ओव्हरसीज लिमिटेड) यांची संकल्पना असलेली, 3.5 लाख CZ हिरे जडलेली मर्सिडिज बेंझ सादर केली आहे. येथे भारतीय मोटरसायकलची चीफ डार्कहाउस बाइकही दर्शवण्यात आली.

उद्घाटन समारंभ दणक्यात झाला. त्यामध्ये अनेक मान्यवर पाहुणे उपस्थित होते – पोर्नतिव्हा नाकासाई, अध्यक्ष – थाय जेम अँड ज्वेलरी ट्रेडर्स असोसिएशन (टीजीजेटीए), सोमचाय फोर्नचिंडारक, अध्यक्ष – जेम्स, ज्वेलरी अँडी प्रेशिअस मेटल कॉन्फेडरेशन ऑफ थायलंड (जीजेपीसीटी), वर्ल्ड फेडरेशन ऑफ डायमंड बोर्सेसचे (डब्लूएफडीबी) पदाधिकारी व सदस्य, शांघाय डायमंड एक्स्चेंज (एसडीई) शिष्टमंडळ, थाय शिष्टमंडळ, विविध व्यापारी शिष्टमंडळे – इस्रायल, दुबई, युरोपीय देश, ग्रीस, दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, बांगलादेश व भारत – जीजेईपीसी, जीजेसी, एमडीएमए व भारतातील व्यापार संघटना!

तिसऱ्या भारत डायमंड वीकची (बीडीडब्लू) दमदार सुरुवात झाली आहे. भारत डायमंड बोर्स (बीडीबी) येथे, एव्हजेनी आगुरीव्ह (उप मुख्य कार्यकारी अधिकारी, अलरोसा), नानहाय यान (उपाध्यक्ष, शांघाय डायमंड एक्स्चेंज), अशोक गजेरा (व्यवस्थापकीय संचालक, लक्ष्मी डायमंड), अनूप मेहता (अध्यक्ष-बीडीबी), मेहुल शहा (उपाध्यक्ष- बीडीबी) व राजेश बजाज (व्यवस्थापकीय संचालक, बजाज ओव्हरसीज लि.) यांच्या उपस्थितीत या वीकचे उद्घाटन झाले. बीडीडब्लूचे उद्घाटन भारत डायमंड बोर्स येथे झाले आणि 16 ऑक्टोबर 2019 रोजी सांगता होणार आहे.

भारत डायमंड बोर्सचे (बीडीबी) अध्यक्ष अनूप मेहता म्हणाले, “जगभरातील ग्राहकांच्या शिष्टमंडळांचे स्वागत करण्याची संधी बीडीबीला मिळाली आहे. तसेच, जीजेईपीसी याच कालावधीत तिसऱ्या इंडिया डायमंड वीक बायर-सेलर मीटचे आयोजन करणार आहे आणि आम्ही सर्व व्हिजिटरचे व ग्राहकांचेही स्वागत करत आहोत.”

बीडीडब्लू येथे येणाऱ्या प्रत्येकासाठी अन्य फायदा म्हणजे, जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काउन्सिलना (जीजेईपीसी) 15 ऑक्टोबरपासून 17 ऑक्टोबर, 2019 पर्यंत आयोजित केलेल्या तिसऱ्या इंडिया डायमंड वीक (आयडीडब्लू), बायर सेलर मीट (बीएसएम) यामध्ये सहभागी होण्याचा पर्याय. म्हणूनच, ग्राहकांना एकाच ठिकाणी विविध दोन ट्रेड शोमध्ये व विविध पर्यायांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

या खास उपक्रमाचे शिल्पकार बजाज ओव्हरसीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक राजेश बजाज यांनी सांगितले, “बजाज ओव्हरसीज व एचझेड इंटरनॅशनल यांनी गिनिज व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवलेल्या 7 कार्यक्रमांची संकल्पना आखली आहे. भारत डायमंड वीकच्या निमित्ताने आम्ही सणासुदीच्या पूर्वी खरेदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी CZ हिरे जडलेली मर्सिडिज कार व बाइक आखली व निर्माण केली.”

दिवाळी हा खरेदीचा हंगाम सध्या सुरू आहे आणि यंदा पीक चांगले येण्याचा अंदाज असल्याने भारतातील लग्नसराईच्या निमित्ताने मार्च 2020 पर्यंत चालणार आहे. चीनही जानेवारी 25, 2020 रोजी नवीन वर्ष साजरे करणार आहे, तर अमेरिका व युरोप येथेही सुट्यांची धमाल असणार आहे. त्यामध्ये अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत अंदाजे 4% वाढ होण्याची शक्यता आहे. एकंदर, युरोप व अमेरिका यांना सणांच्या पार्श्वभूमीवर सोर्सिंग करावे लागणार असल्याने आशियायी देश, चीन व संपूर्ण भारत यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.

भारतातील अंदाजे 100+ डायमंड एमएसएमई बीडीबीमधील बीडीडब्लू येथे निरनिराळे आकार, प्रमाण व रंग यांचे पॉलिश्ड हिरे प्रदर्शित करणार आहेत. बीडीबीमध्ये समाविष्ट असणाऱ्या 3 हजार सदस्य कंपन्या प्रत्येक ग्राहकाला सेवा देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सज्ज आहेत. भारत हे सर्वात मोठे जागतिक हिरे उत्पादक केंद्र आहे आणि जगातील 94% भारतीय कलाकारांच्या पाठबळाने भारताचा जागतिक हिस्सा 92% आहे.

बीडीडब्लू स्पर्धात्मक दराने पुरेशी उत्पादने उपलब्ध करण्याची दक्षता घेते आणि हिऱ्यांचे संपादन खाणींतून झाल्याची अधिकाधिक शाश्वती देते. आता, बीडीबीच्या कार्यक्षेत्रामध्ये सीव्हीडीना परवानगी नाही, हे सर्वांना माहीत आहे आणि त्याचे पालन कठोरपणे केले जाते. सीव्हीडींविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, कोणताही हिरा तपासून घेण्यासाठी बीडीडब्लूमध्ये सुविधा उपलब्ध असणार आहेत. याच कारणाने हा शो ग्राहकांचा विश्वास जिंकत आहे. बीडीबीने हा विश्वास अनेक वर्षांपासून मिळवला आहे!

बीडीडब्लू ग्राहक मेहुल शहा यांनी सांगितले, “जवळ येणारा हंगाम आणि सोर्सिंग ठिकाणाबद्दल अनिश्चितता यामुळे बीडीडब्लू अधिक बळकटी आली आहे – पसंतीच्या उत्पादनांच्या सोर्सिंगची निश्चित जागा, 100% खाणीतील हिरे खरेदी करत असल्याचा विश्वास ग्राहकांना देणारे, कोणत्याही एलजीडीची छुपी भीती नाही.”

वेळ व पैसे यांची बचत व्हावी, या दृष्टीने आरामदायी व निवांत वातावरणात प्रत्येक ग्राहकाला खरेदीचा अविस्मरणीय व उत्तम अनुभव मिळावा, यासाठी ग्राहकांना सोयीचे ठरले, याची काळजी बीडीबी या बीडीडब्लूच्या आयोजकाने घेतली आहे. येथे प्रदर्शित केल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी प्रत्येक ग्राहक जोडला जायला हवा. बीडीबी संकुलामध्ये सहज प्रवेश उपलब्ध करून, बीडीबीने ग्राहकांना सुरळीतपणे खरेदी करता येईल, याची पूर्ण काळजी घेतली आहे आणि याची सुरुवात प्रवासासाठी सहकार्य, पहिल्यांदा भेट देणाऱ्यांना उत्तेजन, शोच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था यापासून होते.

याचप्रमाणे, आंतरराष्ट्रीय मापदंड व सुविधा यांनी सज्ज असणारे बीडीडब्लू हे बीडीबीतील पहिले आहे. हे संकुल 0.87 दशलक्ष चौरस फूट क्षेत्रात विस्तारले आहे. बांधकामाचे एकूण क्षेत्र 2 दशलक्ष चौरस फूट असून त्यामध्ये आणखी 1 दशलक्ष चौरस फुटाच्या दोन बेसमेंटचा समावेश आहे. बीडीबीने अधिकाधिक सोयीच्या व सुरक्षित ठिकाणी व्यवहार करण्यासाठी व्यवसायासाठी सुविधांची निर्मिती केली आहे.

महत्त्वाच्या प्रतिक्रिया

एर्नी ब्लोम, अध्यक्ष वर्ल्ड फेडरेशन ऑफ डायमंड बोर्सेस, यांची प्रतिक्रिया:

वर्ल्ड फेडरेशन ऑफ डायमंड बोर्सेसचा (डब्लूएफडीबी) अध्यक्ष या नात्याने भारत डायमंड वीकच्या निमित्ताने भारत डायमंड बोर्सचे अभिनंदन आहे. 2018 मध्ये पहिल्या दोन कार्यक्रमांना उत्तम यश मिळाल्यानंतर, हा पॉलिश्ड हिऱ्यांचा तिसरा उपक्रम आहे. गेल्या वर्षीच्या उपक्रमांना मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर भारत डायमंड बोर्सने यंदा शोचे आयोजन केले आहे आणि ऑक्टोबर 14-16 या कालावधीतील फेअर गेल्या वर्षीपेक्षाही मोठे असेल, यात शंका नाही. जगभरातील विविध बोर्सेसच्या सदस्यांना आणि डायमंड व ज्वेलरी ट्रेडमधील अन्य सदस्यांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने हे आंतर-बोर्स उपक्रम अतिशय उपयुक्त आहेत, असे मला वाटते.  प्रामुख्याने, सध्या आपण ज्या आव्हानात्मक कालखंडातून जात आहोत, त्यामध्ये ते अधिक महत्त्वाचे आहेत.या उद्योगातील एक महत्त्वाचा भाग असणाऱ्या लहान व मध्यम आकाराच्या फर्मना पाठिंबा देण्याच्या दृष्टीने, हे पॉलिश्ड डायमंड उपक्रम बोर्सेससाठी एक उत्तम पर्याय आहेत. हिऱ्यांच्या वापारामध्ये या कंपन्यांचे योगदान सर्वाधिक आहे आणि त्यांना जास्तीत जास्त सहकार्याची आवश्यकता आहे.

भारत डायमंड वीक आयोजित करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याबद्दल आणि झोकून देऊन काम केल्याबद्दल, तसेच डब्लूएफडीबी सदस्यांना नोंदणीच् बाबतीत प्राधान्य दिल्याबद्दल भारत डायमंड बोर्सचे अध्यक्ष अनूप मेहता आणि उपाध्यक्ष मेहुल शहा यांचे व त्यांच्या टीमचे आभार मानायला हवेत. ग्राहक व प्रदर्शक या दोन्हींना आणि या शोशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकाला भरभरून यश मिळो, ही सदीच्छा.

स्टीफन फिश्लर, अध्यक्ष डब्लूडीसी, यांची प्रतिक्रिया:

लहान व मध्यम आकाराच्या कंपन्यांना हिरे पुरवठा साखळीमध्ये त्यांचे विशेष महत्त्व, कौशल्य व स्थान दर्शवण्यासाठी त्यांना गरजेची असलेली संधी दिल्याबद्दल भारत डायमंड बोर्सचे अभिनंदन. आता आपल्या या उद्योगासमोर झटपट कृती करण्याचे, नवे मूल्यवर्धित उपक्रम विकसित करण्याचे आव्हान आहे.तंत्रज्ञानाचा समावेश प्रत्येकाने करणे आवश्यक आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. या उद्योगातील एसएमई सदस्यांनी त्यांचे महत्त्वाचे स्थान कायम ठेवणे व अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. सर्वांना या उपक्रमासाठी शुभेच्छा!

इरान झिनी, व्यवस्थापकीय संचालक इस्रायल डायमंड एक्स्चेंज लि., यांची प्रतिक्रिया:

आणखी एका डायमंड वीकचे आयोजन करण्याच्या भारत डायमंड एक्स्चेंजच्या उपक्रमाचे इस्रायल डायमंड एक्स्चेंज स्वागत करत आहे. विविध प्रकारच्या उत्पादनांचे एक्स्पोजर देण्यासाठी लहान व मध्यम आकाराच्या कंपन्यांवर भर देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे.

जगातील प्रमुख बोर्सेसपैकी असणाऱ्या इंडियन एक्स्चेंजला अशा प्रकारे इंटर-बोर्सेस उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या अन्य महत्त्वाच्या केंद्रांमध्ये स्थान मिळणे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. अन्य केंद्रांमध्ये, इस्रायल डायमंड एक्स्चेंजचाही समावेश असून, त्याद्वारे पुढील आंतरराष्ट्रीय डायमंड वीक 10.2.20 रोजी इस्रायलमध्ये आयोजित केला जाणार आहे; हा ट्रेंड अतिशय लोकप्रिय झाला आहे आणि भारत डायमंड एक्स्चेंजमधील आमच्या मित्रमंडळींना भरपूर शुभेच्छा.

डीएमसीसीचे कार्यकारी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अहमद बिन सुलायम यांची प्रतिक्रिया:

हिरे उद्योगातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटकांना एका व्यासपीठावर आणल्याबद्दल मला भारत डायमंड वीक 2019च्या आयोजकांचे कौतुक करावेसे वाटते. हा उपक्रम एसएमईंना मदत करणार आहे आणि या मदतीमुळे हिऱ्यांच्या व्यापाराला चालना मिळणार आहे. दुबई हे जगातील आघाडीचे हिरे व्यापार केंद्र म्हणून वेगाने उदयास येत आहे, आणि या शहराचे मुंबईशी असणारे व्यावसायिक नाते खूप जुनेही आहे आणि दुबईच्या हिरे क्षेत्राच्या भरभराटीसाठी महत्त्वाचेही आहे.

आयोजक, बीडीबीविषयी:

भारत डायमंड बोर्स (बीडीबी) ही जगातील सर्वात मोठी हिऱ्यांची बाजारपेठ आहे. प्रत्येक ग्रेडच्या व प्रत्येक शेडमधील नैसर्गिक रंगांच्या हिऱ्यांच्या प्रत्येक आकाराच्या, प्रमाणाच्या व गुणवत्तेच्या हिऱ्यांची खरेदी व विक्री करण्यासाठी दररोज बोर्समध्ये शेकडो देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापारी आकृष्ट होतात. कोणत्याही प्रकारच्या उत्पादनाचा पुरवठा करण्याच्या क्षमतेमुळे जगभरातील हिरे व्यापाऱ्यांसाठी व ग्राहकांसाठी भारत हे पसंतीचे डायमंड पॉलिशिंग सेंटर ठरते.

बीडीबीच्या वाटचालीस सुरुवात 2010 पासून, मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथे झाली. आता बीडीबीचे 4,000 हून अधिक सदस्य आहेत आणि ते रफ व पॉलिश्ड डायमंड यांची आयात व निर्यात, उत्पादन व मार्केटिंग करतात. बीडीबीने व्यवहार जास्तीत जास्त सोयीच्या व सुरक्षित ठिकाणी व्हावेत, यासाठी व्यवसायासाठी सुविधा निर्माण केल्या आहेत.

हिऱ्यांचे उत्पादक, ब्रोकर व कमिशन एजंट म्हणून कार्यरत असणाऱ्या सर्वांसाठी भारत हे आंतरराष्ट्रीय ट्रेडिंग सेंटर म्हणून प्रस्थापित करून व हे स्थान कायम राखून, भारताला जगातील आधुनिक व सोफिस्टिकेटेड हिरे बाजार म्हणून विकसित व प्रस्थापित करण्यासाठीहिरे उद्योगाला उत्तेजन देणे, सुविधा देणे व प्रसिद्धी देणे, यावर बीडीबीचा प्रामुख्याने भर आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुन्हा एकदा पुण्यात भाजपाला क्रमांक एकचा पक्ष म्हणून स्थान मिळवून देऊ : मुरलीधर मोहोळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘कॅन्टोन्मेंट’मधील भाजपा पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा ! कोरेगाव...

खंडोबाच्या जेजुरीत घडलं अघटीत..

मिरवणुकीत आगीचा भडका– २ नगरसेविका गंभीर भाजल्या, १८ जण...

सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर राज्यातील जनता समाधानी असल्याचे या निकालांवरून स्पष्ट… अजितदादा

महायुतीमधील मित्रपक्षांनी एकमेकांच्या इच्छुक उमेदवारांना पक्षप्रवेश द्यायचे नाहीत, असे...

वसुंधरा संरक्षणासाठी हजारो नागरिकांनी घेतलेली शपथ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये

पुणे पुस्तक महोत्सवाच्या समारोपाला विश्वविक्रम पुणे: पुणे पुस्तक महोत्सवाच्या...