ॲक्युपंक्चर ही वेदना कमी करणारी प्राचीन भारतीय उपचार प्रणाली 

Date:

पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित ओम ॲक्युपंक्चर ॲन्ड हीलींग सेंटर प्रस्तुत “रंध्रात पेरिली मी” कार्यक्रमाचे आयोजन
पुणेः बदलत्या जीवनशैलीमुळे पाठ, मान, कंबरदुखीचे वाढणारे आजार आणि कमी वयात त्यावर केल्या जाणाऱ्या ऑपरेशनची संख्या वाढत आहे. त्यामुळे नैसर्गिकरीत्या आजार कसे बरे करता येतील याकडे सर्वांचा कल असतो. ॲक्युपंक्चर ही वेदना देणारी नाही तर वेदना कमी करणारी प्राचीन भारतीय उपचार पद्धती आहे.

पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित ओम ॲक्युपंक्चर ॲन्ड हीलींग सेंटर यांच्यावतीने
ॲक्युपंक्चर उपचार प्रणालीची माहिती देण्यासाठी “रंध्रात पेरिली मी” या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे करण्यात आले होते. कार्यक्रमात ॲक्युपंक्चर या उपचारपद्धती विषयी तज्ज्ञ विजया नकाते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ वैद्यकिय तज्ज्ञ डॉ. अविनाश भोंडवे,  गायक विजय केळकर, पं विनोदभूषण आल्पे,  हर्षा शाह, पप्पिश कुमार ललगूनकर, राजेश दातार, स्वाती शहा, अविनाश निमसे, विवेक जडे, सतिश मराठे, श्याम भोरे व मोना भोरे आदी उपस्थित होते.
विजया नकाते म्हणाल्या, ॲक्युपंक्चर ही  प्राचीन भारतीय  उपचार प्रणाली असून निरामय आणि निरोगी आयुष्य देणारी आहे. यामध्ये कोणत्याही औषधाचा वापर केला जात नाही. तर नैसर्गिकरीत्या शरीरातील शक्ती वाढवून आजार बरे करण्यावर भर दिला जातो. रुग्ण कसे आणि कधी बरे होणार हे त्यांच्या आजारावर अवलंबून असते. त्याचबरोबर या उपचार प्रणालीवर तुमचा विश्वास असणे देखील गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी योगिता बडवे, गौरी पुंडलिक, कल्पना नारायण, विदुला पंडित आणि मयुर पांडे यांनी हिंदी मराठी चित्रपटातील विविध गीतांचे सादरीकरण केले. माधुरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले, किशोर सरपोतदार यांनी प्रास्ताविक केले. अजित कुमठेकर यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लोहगाव पाणीप्रश्नावर ठोस पावले; आमदार बापूसाहेब पठारे यांची बैठक व पाहणी

पुणे: लोहगाव परिसरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार बापूसाहेब पठारे यांनी...

पाषाण तलाव प्रदूषित: महापालिका आयुक्तांची धडक: चार अधिकारी सस्पेंड

पुणे दि. १०.०४.२०२६ : मैलापाणी थेट पाषाण तलावात मिसळून...

आयुक्तसाहेब,’त्या सर्व’ पत्रकारांवर कारवाई कराच..

एकीकडे पोलिसांनीच खोटा पोक्सो दाखल करण्याची धमकी देऊन...