पुणे : एखाद्या कामासाठी सर्व समाजघटक एकत्र आले तर काय होऊ शकते, ते कोंढव्यातील स्वच्छता मोहिमेच्या यशावरून दिसते़ कॉंग्रेस पक्ष नेहमीच प्रत्यक्ष कृतीवर भर देत आला आहे. त्यामुळेच पुनावाला बंधूंनी लोकसहभागाच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वी करून दाखविली़ कोंढव्यातील स्वच्छता अभियान हा क्रांतिकारी प्रयोग असून असे उपक्रम सतत व्हायला हवे, असे प्रतिपादन कॉंग्रेस नेत्या आणि अभिनेत्री नगमा यांनी व्यक्त केले.
पुना डेव्हलपमेंट कौन्सिल आणि दि मुस्लिम फाऊंडेशनच्या वतीने आयोजित स्वच्छतादुतांच्या सन्मान सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे चिटणीस शहजाद पुनावाला, युवा नेते व उद्योगपती तेहसीन पुनावाला, अॅड़ हाजी गफूर पठाण, नितीन देसाई, राहुल म्हस्के, मौलाना झाएद भाई, अल्ताफ पीरजादे, फर्ज खान आदी मान्यवर उपस्थित होते़ यावेळी नगमांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेले स्थानिक धर्मगुरू, नागरिक आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच दि मुस्लिम फाऊंडेशनच्या संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले़
तेहसीन पुनावाला म्हणाले, केंद्र सरकारची स्वच्छता मोहीम ही पंतप्रधान मोदी यांची मन की बात आहे़, पण काँग्रेस पक्ष नेहमीच काम की बात करतो़ स्वच्छतेच्या जाहिरातींवर शंभर कोटी रूपये खर्च करणाºया मोदींना आपल्या पक्षाचे शुद्धीकरण करता आलेले नाही़ आम्ही महात्मा गांधी यांचे खरे अनुयायी आहोत, त्यामुळे उक्तीपेक्षा कृतीवर आमचा अधिक भर असतो़.
देशातील कथित गोरक्षकांचा समाचार घेत ते म्हणाले, गोरक्षणाच्या नावाखाली देशभर अल्पसंख्याक आणि दलितांवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत. कथित गोरक्षकांच्याविरोधात आम्ही राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे दाद मागितली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले़
शहजाद पुनावाला यांनी देखील सरकारच्या कथित गोरक्षणाविरोधात टीकास्त्र सोडले़ ते म्हणाले, एकीकडे सरकार देशामध्ये पिंक रिव्होल्यूशन घडवून आणायचे म्हणते. दुसरीकडे मात्र गोरक्षक दलित आणि अल्पसंख्याक यांच्यावर हल्ले करतात, यामुळे विकास होत नाही, तर हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांमध्ये विनाकारण संघर्ष होतो़ भाजप आणि रा़स्व़संघाच्या गोरक्षकांनी आधी सावरकर गायीबाबत काय म्हणतात, हे वाचावे़ कंबरेला चामडीचे बेल्ट वापरणारे आणि चामडीचे बूट घालणारे आता गोरक्षणाबाबत बोलू लागले आहेत़ हेच खरेतर आपले दुर्दैव म्हणावे लागेल़
प्रास्ताविकात बोलताना अॅड़ हाजी गफूर पठाण म्हणाले, पुनावाला बंधू आणि स्थानिक धर्मगुरू यांच्या पुढाकारामुळे ही मोहीम यशस्वी होऊ शकली़ महानगरपालिकेच्या अधिकाºयांनी देखील आम्हाला मोठे सहकार्य केले़ कचरामुक्त ईदसाठी मौलानांनी फतवे काढण्याची ही पहिलीच वेळ होती़ इक्बाल अन्सारी यांनी सूत्रसंचालन केले.



