मुंबई-बिग बॉस सीझन -13 चे विजेते सिद्धार्थ शुक्ला याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो 40 वर्षांचा होता. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला मुंबईच्या कूपर रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अहवालांनुसार, त्याच्या शरीरावर कोणत्याही बाह्य जखमेच्या खुणा आढळल्या नाहीत.
सांगितले जात आहे की, त्याने बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी काही औषधे घेतली होती. यानंतरच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो पुन्हा उठू शकला नाही.
मॉडेलिंगपासून करिअरला सुरुवात केली, टीव्ही सिरीयल्स केल्या आणि एक रिअॅलिटी शो विजेता ठरला
सिद्धार्थचा जन्म 1980 मध्ये मुंबईत झाला. त्याने त्याच्या कारकीर्दीची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली. 2005 मध्ये त्याने वर्ल्ड बेस्ट मॉडेलचा खिताबही जिंकला. नंतर तो दूरचित्रवाणी मालिकांमध्ये दिसू लागला. सिद्धार्थ ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल -3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’ सारख्या मालिकांमुळे प्रसिद्ध झाला. त्याने फियर फॅक्टर सीझन 7 देखील जिंकला. सिद्धार्थने सावधान इंडिया आणि इंडिया गॉट टॅलेंट सारखे शो होस्ट केले आहेत.

