कार्यकर्त्यांनी समाजकारणावर भर द्यावा – आ.चंद्रकांतदादा पाटील

Date:

प्रा.ना.स.फरांदे स्मृती प्रतिष्ठान ची स्थापना.

पुणे – सामान्य कार्यकर्ता ते 1991 साली भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष, तीन वेळा विधानपरिषदेचे निर्वाचित सदस्य तसेच विधानपरिषद उपसभापती व सभापती अश्या विविध जबाबदाऱ्या पार पाडलेले कै. ना. स. फरांदे यांचे कार्य भावी पिढी पुढे आदर्शवत असेच आहे, त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि स्नेहीजनांनी सार्वजनिक विश्वस्त संस्था स्थापन केली याचा आनंद वाटतो असे भाजप चे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.

प्रा. ना. स.फरांदे स्मृती प्रतिष्ठान च्या बोधचिन्हाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष अभिजित फरांदे, कार्याध्यक्ष व भाजप महिला मोर्चाच्या कोथरूड मंडल अध्यक्ष सौ. हर्षदा फरांदे, ट्रस्ट चे सचिव व भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर, विश्वस्त स्वप्नील लडकत, विश्वस्त व भाजप महिला मोर्चा च्या आय टी सेल च्या संयोजिका कल्याणी खर्डेकर, विश्वस्त प्रेरणा लडकत रासकर इ. उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांनी राजकारणासोबतच समाजकारणावर भर द्यावा, नागरिकांना निस्पृह वृत्तीने त्यांच्या साठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याबद्दल प्रेम,कौतुक आणि आदर असतोच असा सल्ला ही चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला व ट्रस्ट च्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देताना सर्वतोपरी मदत करण्याचे वचन ही दिले.

या ट्रस्टच्या माध्यमातून विविध समजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे ट्रस्टच्या कार्याध्यक्ष हर्षदा फरांदे यांनी सांगितले, तसेच माझे श्वसूर नारायणराव फरांदे यांच्या स्मृती जतन करण्यासोबतच त्यांचे संघर्षपूर्ण व प्रेरणादायी कार्य सामान्य कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरावे यासाठी ह्या ट्रस्ट च्या माध्यमातून कार्य करणार असल्याचा संकल्प ही फरांदे यांनी जाहीर केला.
प्रा. ना. स. फरांदे यांच्या त्यागमय जीवनाने प्रेरित होऊन त्यांच्या पत्नी श्रीमती मंगलाताई फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रस्ट स्थापन केला असून त्याही या प्रतिष्ठान च्या विश्वस्त असल्याचे संस्थेचे सचिव संदीप खर्डेकर म्हणाले.सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून समाजातील उपेक्षित, दुर्लक्षित घटकांसाठी कार्य करण्याचा मनोदय ही खर्डेकर यांनी व्यक्त केला. लवकरच प्रतिष्ठान च्या वतीने एका औपचारिक कार्यक्रमात वाटचालीस सुरुवात करणार असल्याचे अध्यक्ष अभिजित फरांदे यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...

पुण्यात एकाच वेळी ४२ ठिकाणी जल स्वच्छता मोहीम संपन्न

जल संवर्धनाच्या दिशेने संत निरंकारी मिशनचे पुण्यामध्ये विशाल स्वच्छता...

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा खालावली:डिहायड्रेशनमुळे अशक्तपणा, पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल

पुणे:राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून:विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार; अजित पवारांच्या अपघाताबाबत संशय

सत्ताधारी पक्ष मस्तीमध्ये असल्याची टीका,घरगुती डिजिटल मीटरचा विरोध,सोलार...