स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देखील लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असे गणेश मंडळांचे कार्य-महापौर मुरलीधर मोहोळ

Date:

हुतात्मा ॠषिकेश जोंधळे आणि हुतात्मा संभाजी राळे यांना मरणोत्तर प्रभात शौर्य पुरस्कार प्रदान ; गुरुवार पेठेतील प्रभात मित्र मंडळतर्फे पुरस्कार वितरण सोहळा

पुणे : स्वातंत्र्यपूर्व काळात उत्सव सार्वजनिक स्वरुपात व्हावे, याकरीता लोकमान्य टिळकांनी चळवळ उभी केली. त्याचा परिणाम स्वातंत्र्याच्या योगदानामध्ये दिसून आला. आज स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर देखील लोकमान्यांना अभिप्रेत असे कार्य गणेश मंडळांकडून सुरु आहे. सामाजिक भान जपत अविरतपणे कर्तव्याच्या भूमिकेतून हे कार्य सुरु असून उत्सव साजरा करण्यासोबत समाज अडचणीत असताना मदत देखील मंडळे करीत आहेत, असे गौरवोद्गार पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काढले.

प्रभात मित्र मंडळतर्फे गुरुवार पेठेतील कृष्णहट्टी चौकातील नाकोडा भवन येथे झालेल्या कार्यक्रमात प्रभात शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री संजय मुरदाळे, मेजर बजरंग निंबाळकर (निवृत्त), मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर, खजिनदार सचिन भोसले, उत्सवप्रमुख अविनाश निरगुडे, ओंकार नाईक आदी उपस्थित होते. हुतात्मा ॠषिकेश जोंधळे यांच्या मातोश्री कविता जोंधळे आणि हुतात्मा संभाजी राळे यांचे वडिल ज्ञानेश्वर राळे यांनी पुरस्कार स्विकारला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि प्रत्येकी २१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष सुरु होत आहे. भारतीयांच्या मनात देशाच्या सिमेवर लढणा-या सैनिकांसाठी संवेदना आहे. देशाचे रक्षण करणा-यांच्या प्रती मनात अभिमानाची भावना आहे. सैनिकांच्या कार्याचा आदर्श आपण नव्या पिढीसमोर ठेवायला हवा.

संजय मुरदाळे म्हणाले, आपल्याला सहजासहजी स्वातंत्र्य मिळालेले नाही. भारताचा इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. मात्र, आपल्याला शाळेमध्ये गुलामगिरीचा इतिहास मोठया प्रमाणात सांगितला जातो. त्यामुळे नव्या पिढीला आपला पराक्रमाचा, शौर्याचा इतिहास सांगायला हवा, असेही त्यांनी सांगितले. बजरंग निंबाळकर म्हणाले, सैनिक खूप कठिण परिस्थितीमध्ये काम करतात. त्यामुळे सामान्यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी असायाला हवे.

किशोर चव्हाण म्हणाले, सैनिकांमुळे आपले अस्तित्व टिकून आहे. त्यामुळे सैनिकांसोबत त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानणे, हे आपले कर्तव्य आहे. तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रभावना निर्माण व्हावी, या मूळहेतूने मंडळ कार्यरत असून विविध उपक्रम राबविले जातात. प्रभात शौर्य पुरस्काराच्या माध्यमातून सैनिकांच्या शौर्याची आणि कुटुंबाची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा हेतू आहे, असेही त्यांनी सांगितले. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार नाईक यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बदलत्या काळानुसार पत्रकारांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे – प्रा. सुशोभन पाटणकर

ए आय तंत्रज्ञानाद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी शहानिशा आवश्यक पिंपरी,...

मुंबई प्रमाणे पुण्यातही 500 चौ. फूट घराला मिळकत कर शून्य करा- स्थायी च्या पहिल्या बैठकीत कॉँग्रेस चा प्रस्ताव

ऐतिहासिक निर्णयाबाबतचा चेंडू आता अध्यक्ष श्रीनाथ भिमालेंच्या मैदानात.. प्रशासनाचा...

सोलर एनर्जी प्रकल्प वापरणाऱ्यांना मिळकत करात 10 टक्के सवलत द्या – दुधाने आणि मानकर यांचा प्रस्ताव

पुणे-सोलर एनर्जी प्रकल्प, म्हणजेच सूर्यप्रकाशाद्वारे वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प...

प्रदूषणाने कॅन्सर; महाराष्ट्र सरकारची कबुली, 57% रुग्णांचे फुफ्फुस ‘आजारी’, राज्य सरकारच्या अभ्यासात मोठा खुलासा

बांधकामांच्या ठिकाणचे धुळीचे लोट रोखण्यासाठी मोहीम ही देवेंद्र फडणविसांची...