वनविभागाकडून ६८ एकरावरील अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई

Date:

पुणे, दि.२: वनजमिनीवर अवैधपणे ताबा करून शेती तसेच घरांचे बांधकाम केलेल्या सुमारे ६८ एकर वनजमिनीवरील अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही दौंड तालुक्यातील राहू येथे करण्यात आली.

राहू येथील वनजमीन सर्व्हे क्रमांक २०८, १९८, १९९,२०३,२०० यावर सर्व मिळून एकूण ६८ एकर अतिक्रमण झाल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले.  अतिक्रमणधारकांना ताबा सोडण्याबाबत कायदेशीर संबंधितांना नोटीस देण्यात आली.  त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून सर्व अतिक्रमण निर्मुलन करुन संबंधित अतिक्रमणधारकांवर भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील प्रक्रिया दौंडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत.

ही कार्यवाही प्रादेशिक मुख्यवनसंरक्षक एन. आर. प्रवीण आणि उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक दीपक पवार, सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, दौंडच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे, बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, अजित सूर्यवंशी यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही...

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026 केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक...