पुणे- राज्यात महायुतीतील आपला सहकारी पक्ष असलेला आरपीआय ला सुरुवाती पासून दिलेले उपमहापौर पद यावेळी मात्र भाजपने काढून घेतले आहे. नेमके ते काढताना त्यांना पुढील काय आश्वासन देण्यात आले. याची जाहीर वाच्यता मात्र करण्यात आलेली नाही .आज महापौर आणि उपमहापौर पदाचे भाजपने उमेदवार घोषित करून उमेदवारी अर्ज दाखल केले .तेव्हा साधारणतः काही मिनिटे अगोदर आरपीआय ला डावलल्याचे स्पष्ट झाले.
महापालिका निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर लढलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने पुन्हा उपमहापौर पदावर दावा केला होता. त्यासाठी पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांनी शनिवारी रात्री भाजपच्या शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह कोअर कमिटीच्या सदस्यांची भेट घेऊन हे पद रिपाइंकडेच ठेवण्याची मागणी केली. होती मात्र, रिपाइंला कोणतेही उत्तर भाजपने दिले नव्हते. 2014 च्या लोकसभेपासून रिपाइं भाजपसोबत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीतही रिपाइं भाजपसोबत राहिली. पुण्यात भाजपने रिपाइंला उपमहापौरपद, स्थायी समिती सदस्यपद, तसेच पालिकेत गटनेतेपदही दिले आहे. तर रिपाइंचे पाच नगरसेवक आहेत. त्यामुळे पक्षाकडे असलेले पद कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली होती.
दरम्यान आज महापौर आणि उपमहापौर पदाच्या भाजपच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना मावळते उपमहापौर आरपीआय चे नेते डॉ. सिद्धार्थ धेंडे उपस्थित होते यावेळी ते पहा नेमके काय म्हणाले….