वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत -जिल्हाधिकारी नवल किशोर राम

Date:

पुणे दि.13 : – देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचे संशंयित रुग्ण पुणे शहरातही आढळून आल्याचे निदर्शनास आलेले आहे. यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आखणे आवश्यक आहे. त्यासाठी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकारणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये कोव्हीड – 19 साथीच्या रोगाच्या नियंत्रणासाठी डॉक्टरांची सेवा अधिष्ठाता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांच्याकडे अधिग्रहीत केल्या आहेत. तथापि अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुगणालय, पुणे यांनी आवश्यकतेनुसार अधिग्रहीत केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांची सेवा उपलब्ध करुन घ्यावी, सदर नियुक्ती केलेल्या वैद्यकीय अधिकारी यांचे योग्य ते मानधन अदा करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
कोव्हीड – 19 साथीच्या रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झालेली असून ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये रुग्ण उपचारासाठी भरती होत आहेत. या रुग्णांना उत्कृष्ट उपचार होण्याच्या दृष्टीने व रुग्णसंख्या वाढल्यास अतिदक्षता कक्षामध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता भासू नये यासाठी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांनी बै.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख व प्राध्यापक डॉ.संयोगिता नाईक, व राजेंद्र गोळे यांची समन्वयक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली असल्याचे त्यांनी कळविले आहे.
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय,पुणे यांनी डॉ.भूषण किन्होलकर, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9822097687 ), डॉ.सुमित अग्रवाल ,ऑस्टर ॲन्ड पर्ल हॉस्पिटल, पुणे ( मो.क्र. 9822886661 ), डॉ.मुकेश महाजन श्री हॉस्पिटल क्रिटी केअर ॲन्ड ट्रामा सेंटर,पुणे ( मो.क्र.9823231238 ) डॉ.श्रीपाद महाडिक पुना हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र.9552664589 ), डॉ.गणेश गोंगाटे, पुना हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9823219497 ) , डॉ.रविंद्र कुटे, पुना हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9840396455), डॉ.अरुणकुमार देशमुख, नोबेल हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9423006073), डॉ.देवाशिष बॅनर्जी, नोबेल हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 8766897988) , डॉ.रणजित देशमुख जहांगीर हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9767391703 ), डॉ.सुशिल गांधी ,जहांगीर हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 9850932358 ) , डॉ.अश्पक बांगी, जीवनरेखा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, देहूरोड , पुणे ( मो.क्र. 7972700600 ) , डॉ.चेतन पाटील, एमएमएफ रत्ना हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र.9820267983), डॉ.राखी दत्ता, साधु वासवानी हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 8007200081 ),डॉ.शेफाली चव्हाण, साधु वासवानी हॉस्पीटल,पुणे ( मो.क्र. 7756093545) , डॉ.श्रीपाद कोरे, विराज हॉस्पीटल, लोणीकाळभोर, पुणे ( मो.क्र.8999076147) इत्यादी डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करुन घेण्याबाबत कार्यालयीन आदेश पारित केलेला आहे.

 

पुणे- कोरोना विषाणू आजाराच्‍या अनुषंगाने वैद्यकीय व्‍यावसायिकांच्‍या सेवा अधिग्रहीत करण्‍यात आल्‍याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली. मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्‍य सचिव अजोय मेहता यांनी घेतलेल्‍या व्‍हीडिओ कॉन्‍फरन्सिंगमध्‍ये त्‍यांनी ही माहिती दिली. यावेळी पुण्‍यातून पुणे शहर पोलीस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम, पुण्‍याचे मनपा आयुक्‍त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवडचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्‍त संदीप बिष्‍णोई, जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्‍य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. भगवान पवार, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्‍यासह इतरही अधिकारी उपस्थित होते.

डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, जिल्‍ह्यात तसेच विभागात ऊसतोड कामगार मोठ्या संख्‍येने असून त्‍यांना भोजन तसेच निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. परप्रांतीय मजुरांनाही भोजन व निवास सुविधा देण्‍यात आली आहे. अन्‍न-धान्‍याबाबत कोणतीही टंचाई नसून भारतीय अन्‍न महामंडळाकडून तांदूळ उचलण्‍याचे काम सुरु झाले आहे. केंद्र व राज्‍य शासनाच्‍या निर्णयानुसार एप्रिल महिन्‍याच्‍या अन्‍नधान्‍याचे 91 टक्‍के वाटप झाले आहेत. खरीप पूर्व हंगामाबाबत डॉ. म्‍हैसेकर यांनी खत, बी-बियाणे याबाबत माहिती दिली. खतांचा साठा पुरेसा असून बी-बियाण्‍यांबाबत नियोजन करण्‍यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी करावयाच्‍या कामांबाबतही आवश्‍यकती दक्षता घेण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

कोरोना रुग्‍णांच्‍या सेवेसाठी काही वॉर्डबॉय, परिचारिका, कार्डीओलॉजिस्‍ट स्‍वत:हून पुढे येत आहे, ही आनंदाची बाब आहे. महाराष्‍ट्र मेडीकल कॉन्सिलकडून अशा वैद्यकीय तज्ञांची माहिती मिळाल्यास त्‍यांच्‍या सेवा कोरोना रुग्‍णांच्‍या उपचारासाठी घेता येवू शकतील, असेही विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...