मुंबई- शंभर कोटी वसुली प्रकरणातील आरोपी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना . विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे. सुमारे 12 तासांच्या चौकशीनंतर रात्री उशिरा देशमुख यांना अटक करण्यात आली.कोठडीत घरचे जेवण देण्याची आणि चौकशीदरम्यान त्यांच्या वकिलाला सोबत ठेवण्याची देशमुख यांची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. अनेक दिवस बेपत्ता झाल्यानंतर सोमवारी सकाळी 11:55 वाजता अचानक अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात पोहोचले.
परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीसंदर्भात आरोप केल्यानंतर ईडीमार्फत चौकशी सुरू झाली. मात्र अनिल देशमुख आणि कुटुंबीय अनेक महिन्यांपासून अज्ञातवासात होते. ईडीने देशमुख यांच्या निवासस्थानी पाच वेळा धाडी टाकल्या होत्या. त्यांच्या नागपूर, मुंबई आणि वर्धा येथील घरी ईडीने छापेमारी करत कारवाई केली होती. देशमुख यांना कार्यालयात हजर राहण्याबाबत ईडीने अनेकदा समन्स बजावले, परंतु ईडीसमोर हजर न राहता देशमुखांनी वकिलांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ही याचिका शुक्रवारी फेटाळली गेली होती.
बिल्डर विमल अग्रवालकडून खंडणी वसुलीप्रकरणी चौकशी करण्यासाठी सोमवारी बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात वाझे, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीसिंगसह आणखी 4 आरोपी आहेत.

