‘स्पेशल 26′ प्रमाणे सराफाकडून २० लाख रोख ,३० तोळे सोने लुटले,.. पोलिसांनी अखेर नऊही भामटे पकडले ..

Date:

पुणे –  ‘स्पेशल 26′ चित्रपटाप्रमाणे डाव रचत येथील सराफाला लूबाडण्यात आले. मात्र त्यांना लूबाडणाऱ्या नऊ जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी तीतक्‍याच थरारक फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन जेरबंद केले. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमीही झाले.

फिर्यादी नंदकिशोर वर्मा(41,रा.दत्तनगर) हे त्यांचा मित्र व मुख्य आरोपी व्यास यादव (34,रा.आंबेगाव खुर्द) याच्यासोबत गप्पा मारत असताना एका इनोव्हा कारमधून पाच व्यक्ती आल्या. त्यांनी वर्माला’ तुम्ही इन्कम टॅक्‍स भरत नाही, बेकायदेशीरपणे सोन्याचा धंदा करता, तुमच्यावर इन्कमटॅक्‍सची रेड आहे’ असे म्हणत गाडीत बसवून दरी पुलाजवळ नेले.

तेथे त्याच्याकडे 75 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. यावेळी वर्मा याने मित्र व्यासला घरी पाठवून 20 लाख रुपये रोख व 30 तोळे सोन्याचे दागिने घेऊन येण्यास सांगितले. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरुन ऐवज घेऊन पळ काढला. दरम्यान तक्रार दाखल करतानाही वर्मासोबत व्यास यादव पोलीस ठाण्यात आला होता. यावेळी पोलिसांना त्याचा संशय आला होता. त्याला पोलिसी खाक्‍या दाखवताच त्याने इतर साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली.

असा झाला थरारक पाठलाग
दरम्यान पोलिसांना आरोपींचे लोकेशन कोल्हापूर येथे असल्याचे समजले. त्यानूसार पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे यांचे पथक दुचाकी व चारचाकी गाडीवर रवाना झाले. तेथे आरोपी इनोव्हा गाडी घेऊन देवगड-निपाणी रस्त्यावर थांबल्याचे दिसले. पोलिसांची चाहूल लागताच ते इनोव्हा गाडी घेऊन पळून जाऊ लागले. ते थांबण्याचा इशारा करुनही गाडी दामटचत होते. त्यामुळे पोलीस अंमलदार हर्षल शिंदे व शिवदत्त गायकवाड इनोव्हा गाडीवर झेप घेऊन लटकले. तर पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व विक्रम सावंत यांनी इनोव्हा गाडीच्या काचेवर जोरदार प्रहार करुन काच फोडण्याचा प्रयत्न केला.

यामुळे घाबरलेल्या आरोपींनी गाडी थांबवली. यावेळी भैय्यासाहेब विठ्ठल मोरे, किरण कुमार नायर, मारुती अशोकराव सोळंके, उमेश अरुण ऊबाळे, अशोक जगन्नाथ सावंत व सुहास सुरेश थोरात अशा सहा जणांच्या मुसक्‍या अवळण्यात आल्या. त्यांनी व्याससह इतर पाच साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी लुटलेला मुद्देमाल पुण्यात रोहीत संभाजी पाटील (23,रा.चऱ्होली) याच्याकडे ठेवल्याचे सांगितले. त्यालाही अटक पोलिसांनी अखेर पकडले करुन गुन्हयातील माल हस्तगत करण्यात आला.सराफाला लुटणारे भैय्यासाहेब मोरे, रोहित पाटील, श्याम तोरमल हे संगणक अभियंता आहेत. तोरमलला एका अँप कंपनीत कामाला आहे. व्यास, यादव आणि तोरमल मुख्य सूत्रधार आहेत. 

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ.राजेंद्र डहाळे, उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, विजय पुराणीक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंकुश कर्चे, रविंद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार, निलेश खोमणे, योगेश सुळ, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, धनाजी धोत्रे, नवनाथ खताळ, सचिन गाडे, आशिष गायकवाड, विक्रम सावंत व जगदीश खेडकर यांच्या पथकाने केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याचे वैभव वाघ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रभारी राज्य निवडणूक समन्वयक पदी…

पुणे- शिवसेनेचे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार,शिवसेनेच्या ...

अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने आयोजित स्नेहमेळावा हजारो नागरीकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न

पुणे-नूतन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर अमोल बालवडकर मित्र परिवाराच्या वतीने...

कोकाटेंसाठी 6 तास, 40 आमदारांवर अजून निर्णय नाही:संजय राऊतांची सुप्रीम कोर्टावर नाराजी

मुंबई- शिवसेना नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावरून त्यांनी सर्वोच्च न्यायालयालाही...

रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठींबा.

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन...