खाजगी लॅबधारकांशी संगनमत करून राज्याच्या आरोग्य खात्याने केली सुमारे २७० कोटींची लूट…

Date:

निवृत्त न्यायाधीशांमार्फत या गंभीर प्रकरणाची चौकशी करा…
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी

मुंबई-: कोरोनाच्या काळात जनतेच्या पैशाची कोटयावधी रुपयांची लूट केल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे. खाजगी लॅबशी संगनमत करुन राज्याच्या आरोग्य खात्याने जनतेच्या खिशातून सुमारे २७० कोटी रुपयांची लूट केली आहे. या गंभीर प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी आज केली.
कोरोनाच्या काळामध्ये जनतेला मोफत चाचण्या करून दिलासा देणे आवश्यक होते. किमान वाजवी दरामध्ये उपचार व चाचणी करण्याऐवजी, सरकारने खाजगी लॅबशीच संगनमत केले. त्यामुळे जनतेच्या पैशाची लूट केल्याचा गंभीर आरोप दरेकर यांनी केला आहे.
या प्रकरणाची माहिती देताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ७ सप्टेंबर रोजी, आरोग्य विभागाने RT-PCR चाचणीचे दर कमी करून १२०० रु. पर्यंत खाली आणल्याबाबत स्वतःचे अभिनंदन करून घेतले. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. हिंदुस्तान लेटेक्स लि. अर्थातच एच.एल.एल. लाइफकेअर ही भारत सरकारची कंपनी आहे. या कंपनीने राज्य शासनाला १९ ऑगस्ट रोजी एक पत्र दिले. सदर पत्रामध्ये RT-PCR चाचणी ७९६ रुपयांत करण्याबाबत अवगत करून, त्यांना सेवेची संधी देण्याबाबत विनंती केली. शासनाने जनतेच्या हिताचा विचार करून तात्काळ त्यांना RT-PCR चाचणी ७९६ रु. मध्ये करण्याबाबत पावले उचलायला हवी होती. परंतु, राज्य शासनाने या प्रस्तावावर कोणताही विचार न करता, हा प्रस्ताव थंड बस्त्यात टाकला, असा आरोप दरेकर यांनी यावेळी केला.
जनतेच्या पैशाची झालेली लूट कशी झाली हे प्रविण दरेकर यांनी निर्दशनास आणून देताना स्पष्ट केले की, १९ ऑगस्टला शासनाने खासगी लॅबधारकांना मान्य केलेले दर १९०० रुपये ते २२०० रुपये एवढे जास्त होते. थोडक्यात, खाजगी लॅब धारकांनी RT-PCR चाचणीसाठी २०५० रुपये सरासरी आकारले. याचाच अर्थ १९ ऑगस्ट २०२० ते ७ सप्टेंबर २०२० या २० दिवसांमध्ये प्रती ग्राहक १२५६ रुपये RT-PCR चाचणीकरिता अधिक मोजावे लागले. सद्यस्थितीत महाराष्ट्र शासनाने ५० लाखापर्यंत चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी १९,३४,०९६ चाचण्या खाजगी लॅबव्दारे झाल्या आहेत. या खाजगी लॅब प्रामुख्याने Thyrocare, Metropolis, Infexn Laboratories, SRL Labs आणि Suburban laboratories आहेत. याचाच अर्थ या खाजगी लॅबनी शासनाशी संगनमत करुन १९,३४,०९६ X १२५६ = २४२ कोटी ९२ लक्ष रुपये गोरगरीब जनतेकडून वसूल केले. यापुढेही ही लूट अशीच सुरू राहणार आहे,’ असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
ॲण्टीबॉडी टेस्टमध्येही लूट
७ जुलै २०२० ला देखील एच.एल.एल. लाईफकेअर या कंपनीने खाजगी लॅबधारकांच्या दरापेक्षा १००० रु. कमी दराने, तर ॲण्टीबॉडी टेस्ट २९१ रुपयांना करण्याबाबत सरकारी कंपनीने सम्मती दर्शविलेली असताना, राज्य सरकारने खाजगी लॅब धारकांना ५९९ रुपये घेण्याची परवानगी दिली. म्हणजेच ॲण्टीबॉडी टेस्टमध्येही ३०० रुपये प्रति टेस्ट अधिक दराने लूट सुरु आहे. आतापर्यंत चाचण्या विचार करता जनतेची २७ कोटी रुपयांनी लूट झाली आहे असा गंभीर आरोपही दरेकर यांनी केला.
झारीतील शुक्राचार्य
एच.एल.एल. कंपनीचा असाच प्रस्ताव केरळ सरकारने स्वीकारून जनतेच्या पैशाची बचत केली. येथे मात्र सरकारी कंपनीला डावलून खाजगी लॅबधारकांना चढ्या दराने काम देणारे या झारीतील शुक्राचार्यावर शासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
ही पार्श्वभूमी लक्षात घेता जनतेचे कोटयावधी रुपये तात्काळ जनतेला परत करावेत. तसेच आरोग्य विभागाच्या संगनमताने झालेल्या या लूटीची चौकशी करावी आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ही आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडेही या गंभीर प्रकरणाची तक्रार करण्यात आली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देणार’:केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

⁠खासदार क्रीडा महोत्सवाचा पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाने समारोप पुणे (प्रतिनिधी) :...

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू:ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

मुंबई -महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘स्टार प्रचारकां’ची फौज मैदानात

महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेनेच्या वक्त्यांची यादी जाहीर मुंबई | दि. २५...