नवी दिल्ली, 20 जुलै 2022
गेल्या 28 वर्षांपासून सुमारे 34 टक्के किनारपट्टीची वेगवेगळ्या प्रमाणात धूप होत आहे, असे केंद्रीय (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
लोकसभेत आज एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात डॉ जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. पृथ्वी मंत्रालयाच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे संलग्न कार्यालय असलेले राष्ट्रीय तटीय संशोधन केन्द्र, (नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च, एनसीसीआर), 1990 पासून किनाऱ्याची धूप किंवा तिची होणारी झीज याचे निरीक्षण करत आहे. यासाठी रिमोट सेन्सिंग डेटा आणि जीआयएस मॅपिंग तंत्राचा वापर केला जातो.
मुख्य भूभागाच्या 6907.18 किमी लांबीच्या किनारपट्टीचे 1990 ते 2018 या कालावधीत संपूर्णपणे, विश्लेषण केले गेले आहे. यात 33.6% किनारपट्टीची गेल्या 28 वर्षांपासून वेगवेगळ्या प्रमाणात धूप होत असल्याचे आढळले असे त्यांनी सांगितले.
भारतीय राष्ट्रीय सागरी माहिती सेवा केन्द्राने विशेषतः किनारपट्टीची धूप झाल्याने जे नुकसान झाले त्याच्या टक्केवारीचा अंदाज लावला नाही, तथापि, आयएनसीओआयएसने सात किनारी मापदंड लक्षात घेत भारतीय किनारपट्टीसाठी संभाव्य नुकसानीचा अंदाज देणारा कोस्टल व्हलनरेबिलिटी इंडेक्स (सीव्हीआय) अंदाज वर्तवला आहे असे एका संबंधित प्रश्नात, डॉ जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

