मुंबई, 27 एप्रिल 2022
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या वतीने मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आयोजित 40 व्या हुनर हाटचा यशस्वी प्रवास बुधवारी एका रंगतदार कार्यक्रमात संपन्न झाला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नाव यांच्या प्रमुख उपस्थितीत 17 एप्रिल रोजी या प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन झाले. गेले 12 दिवस सुरू असलेल्या या हुनर हाटला सुमारे 25 लाख लोकांनी भेट दिली. या 40 व्या हुनर हाटमध्ये 31 राज्यांतील सुमारे एक हजार कारागीरांनी आपले कौशल्य सादर केले.
मुंबईकरांसोबतच परदेशी नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात खरेदी करून कलाकार, कारागीर यांच्या कलेला दाद दिली. हुनर हाटमध्ये, लोकांना सर्कस आणि लेझर शोच्या अप्रतिम पराक्रमातून ‘आझादी का अमृत महोत्सव’ ची झलक तर पाहायला मिळालीच, पण दररोज संध्याकाळी देशातील नामवंत कलाकारांच्या गाण्यांचा आणि संगीताचा आनंदही प्रेक्षकांनी घेतला. हुनर हाटला यशाच्या शिखरावर नेल्याबद्दल केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाकडून या कलाकारांचा गौरवही करण्यात आला. हुनर हाटचे अभ्यागत “मेरा गाव, मेरा देश” (फूड कोर्ट) येथे देशाच्या विविध भागातील पारंपारिक स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेता आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या “वोकल फॉर लोकल” आणि “आत्मनिर्भर भारत” च्या आवाहनाला बळकटी देत, ‘हुनर हाट’चे कारागीरांना मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन ऑर्डर मिळत आहेत.


हुनर हाटमधून नऊ लाख पन्नास हजारांहून अधिक कारागीरांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. आणि त्यात 50 टक्क्यांहून अधिक महिला कारागीर आहेत जे महिला सक्षमीकरणाचे उदाहरण आहे. या हुनर हाटमध्ये “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत दररोज 10,000 किलो कचऱ्याचे कंपोस्ट खत तयार करून लोकांना भेटवस्तू म्हणून देण्यात आल्या. हुनर हाटने आतापर्यंत देशातील 40 लहान-मोठ्या ठिकाणी आपल्या कलाकुसर, पाककृती आणि संस्कृतीची अमिट छाप उमटवली आहे.


