मोग-याच्या सुवासिक फुलांचा ‘दगडूशेठ गणपतीला’ अभिषेक

Date:

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने आॅनलाईन दर्शनाचे आवाहन

पुणे : शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले दगडूशेठच्या गणपती बाप्पाचे विलोभनीय रुप…चाफा, झेंडू, गुलाबासारख्या फुलांनी सजलेला संपूर्ण गाभारा आणि मोग-याच्या सुवासिक फुलांनी दगडूशेठ गणपतीला अभिषेक करण्यात आला. वासंतिक उटी व मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने ही सजावट करण्यात आली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांनी आॅनलाईन पद्धतीने दर्शन घेतले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि सहका-यांनी ही पुष्परचना केली. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये २०० किलो मोगरा, ११०० चाफ्याची फुले, डच गुलाब, दवणा, टगर, गुलछडी, गावरान गुलाब, झेंडू, ग्रीन पासली आदी प्रकारची शेकडो फुले वापरण्यात आली. तसेच श्रीं च्या चांदीच्या मूर्तीस चंदन, कस्तुरी याच्या उटीचे लेपन करण्यात आले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...

मानवतेसाठीचे अलौकिक बलिदान – गुरू तेग बहादुरजी

अमृतसरच्या गुरू महालात शिख धर्मीयांचे सहावे गुरू हरगोबिंदजी आणि...

विविध कृषी पुरस्कारांकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध

पुणे, दि.२४: कृषी पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध,...