सरदार मोमीन मेमोरियल 14 वर्षांखालील महाराष्ट्र राज्य टेनिस अजिंक्यपद 2022स्पर्धेत अभिराम निलाखे, विश्वजीत सणस, श्रावणी देशमुख, रितिका डावलकर यांची आगेकूच

Date:

कोल्हापूर, 4 एप्रिल:  कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन(केएसए) व कोल्हापूर जिल्हा  लॉन टेनिस संघटना(केडीएलटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सरदार मोमीन मेमोरियल 14 वर्षांखालील महाराष्ट्र राज्य टेनिस अजिंक्यपद 2022स्पर्धेत मुलांच्या गटात अभिराम निलाखे, विश्वजीत सणस यांनी तर मुलींच्या गटात श्रावणी देशमुख, रितिका डावलकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली. 
मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित पुण्याच्या अभिराम निलाखे याने मुंबईच्या आयुषमान गोयलचा 4-1,4-0असा सहज पराभव केला. चौथ्या मानांकित पुण्याच्या विश्वजीत सणस याने औरंगाबादच्या आदिब शेखला 4-1,4-0 असे नमविले. दुसऱ्या मानांकित नाशिकच्या अंशीत देशपांडे याने मुंबईच्या सौमिल चोपडेचा 4-0,5-3 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. औरंगाबादच्या तिसऱ्या मानांकित शिवतेज शिरफ़ुले याने अमरावतीच्या देवराज मांडलेला 4-0,4-2 असे पराभूत केले. 
मुलींच्या गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत पुण्याच्या श्रावणी देशमुख हिने सोलापूरच्या रिया गांधीचा 4-1, 4-0 असा तर, कोल्हापूरच्या रितिका डावलकरने सोलापूरच्या स्वरांजली नारळेचा 5-3, 4-2 असा पराभव करून आगेकूच केली. स्पर्धेचे उदघाटन एआयटीएचे सहसचिव व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, मार्व्हलस मेटल इंजिनियरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन संग्राम पाटील, केडीएलटीए उपाध्यक्ष दिनेश कित्तूर, केडीएलटीएचे संचालक महेंद्र परमार, उद्योजक दिलीप मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केडीएलटीए सचिव आशिष शहा, संस्थापक सदस्य एस.एस.मोमीन, मेघन बागवडे, मुरलीधर घाटगे, एमएसएलटीएचे विभागीय समन्वयक शितल भोसले, हिमांशू गोसावी, स्पर्धा निरीक्षक मानल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.    निकाल: उपांत्यपूर्व फेरी: 14 वर्षाखालील मुले: अभिराम निलाखे(पुणे)(1) वि.वि.आयुषमान गोयल(मुंबई)4-1,4-0अंशीत देशपांडे(नाशिक)(2) वि.वि.सौमिल चोपडे(मुंबई)4-0,5-3
शिवतेज शिरफ़ुले(औरंगाबाद)(3) वि.वि.देवराज मांडले(अमरावती)4-0,4-2
विश्वजीत सणस(पुणे)(4) वि.वि.आदिब शेख(औरंगाबाद)4-1,4-0
14 वर्षाखालील मुली: उप-उपांत्यपूर्व फेरी: शांभवी सोनावणे(नाशिक)वि.वि.ईश्वरी मार्कंडे(औरंगाबाद)4-0, 4-0 अभिलिप्सा मल्लिक(नवी मुंबई)वि.वि.ध्रुवी हलके(यवतमाळ)4-0, 4-0 रितिका डावलकर(कोल्हापूर)वि.वि.स्वरांजली नारळे(सॊलापूर)5-3, 4-2 श्रावणी देशमुख(पुणे)वि.वि.रिया गांधी(सोलापूर)4-1, 4-0 अवंती वाघ(सातारा)वि.वि.गीत चरडे(यवतमाळ)4-0, 4-2

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ओसवाल बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याने ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

पुणे: येथील बाणेर भागात विकसित करण्यासाठी दिलेल्या मिळकतीच्या व्यवहारात...

पुण्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला मनुवादी वृत्तीच्या विरोधातील पुढचा लढा लढण्यासाठी अधिक बळ मिळाले:हर्षवर्धन सपकाळ

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्यानंतर प्रथमच प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धनजी...

अजित पवार विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल २८ फेब्रुवारीपूर्वीच:केंद्रीय विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ

खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला मोठा प्रतिसाद पुणे शहराला देशातील सर्वोत्तम...

शासकीय अधिकाऱ्यांनी चांगले वाचन करणे गरजेचे : पुलकुंडवार

दुसऱ्या राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाचा समारोप पुणे (प्रतिनिधी)...