अभिमान गीताचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

Date:

पुणे – कोरोनाच्या काळात पुणेकरांनी केलेला मदतीप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी वतीने ‘अभिमान पुण्याचा ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेत तयार आलेल्या ‘पुन्हा एकदा साथ आले…’ या अभिमान गीताचे अनावरण विधानसभेतील विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हस्ते पुण्यात करण्यात आले.
याप्रसंगी पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर, स्थायी समितीचे हेमंत रासने उपस्थित होते. पुण्यातील सेवाव्रतीचा या गीतातून केला गेलेला गौरव औचित्यपूर्ण असल्याचे उद्गगार देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी काढले. या मोहिमेद्वारे शहर भाजपाने आपली पालकत्वाची भूमिका निभावली असल्याचे सांगून श्री. फडणवीस यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. वरुण नार्वेकर यांनी दिग्दर्शित केलेले हे गीत क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले असून, जसराज जोशी यांनी गायले आहे. जसराज जोशी व सौरभ भालेराव यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताची मध्यवर्ती संकल्पना सेतू अॅडव्हर्टायझिंग संचालक ऋग्वेद देशपांडे यांची आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आजपासून ट्रम्प यांच्या इमर्जन्सी टॅरिफची वसुली बंद:₹16 लाख कोटी परत करावे लागू शकतात; कोर्टाने 3 दिवसांपूर्वी बंदी घातली

अमेरिकन सरकार आजपासून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लादलेल्या आपत्कालीन शुल्काची...

कॉम्रेड अंजलीताई महाबळेश्वरकर यांचे निधन:’लाल सलाम’च्या घोषणेत अखेरचा निरोप; मरणोत्तर नेत्रदानाचा आदर्श

सातारा -सातारा नगरपालिकेच्या माजी नगरसेविका व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या...

शिक्षणाचा वारसा जपत माजी विद्यार्थ्यांची आजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

कर्मवीर भाऊसाहेब हिरे हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळा उत्साहात पुणे...