मुळशी धरणातून पुण्याला ५ टीमसी पाणी मिळविण्यासाठी आबा बागुलांचे प्रयत्न सुरु

Date:

पुणे- शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेवून  मुळशी धरणातील ५ टीएमसी पाणी पुणे शहराला मिळणेची तरतूद करावी अशी मागणी काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागूल यांनी केली होती. यावर विचार विनिमय करणेसाठी संबंधित अधिका-यांची बैठक विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज दि.१७/२/२०२० रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीस विभागीय आयुक्त सौरभ राव, काँग्रेस गटनेते आबा बागूल, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.खेमनार, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख श्री.पावसकर, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.धोडपकर व पुणे मनपा कार्यकारी अभियंता श्रीमती शेकटकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त यांनी खडकवासला प्रकल्पातून पुण्यासाठी पाणी उचलले जात असून भामा आसखेड मधून देखील आता पाणी पुण्यास मिळत आहे, पुण्यास मुळशी धरणातील पाणी आपण वळवू शकलो तर पुणे शहराला दिलासा मिळू शकेल. पाणी उपलब्ध असून मिळत नाही अशी नागरिकांमध्ये भावना असते, याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. हा विषय आबा बागूल यांंच्या पुढाकाराने आज आला असून या विषयास चालना मिळाली आहे.


पुणे शहराची पाण्याची वाढती गरज लक्षात घेवून मुळशी धरणातून ५ टीएमसी पाणी पुणे शहराला पुरविणे शक्य आहे काय या संदर्भात पुणे महानगरपालिकेने राज्याच्या जलसंधारण विभागाच्या सहायाने प्रकल्प अहवाल तयार करून सविस्तर विषयपत्र तयार करून राज्य शासनास सूपूर्द करावे. त्यामध्ये प्रकल्पातील व्यवहार्यता, कायदेशीर बाबी, आर्थिक तरतूद व खर्चाचे नियोजन या सर्वांचा तपशिल असावा, अशी सूचना विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत संबंधित अधिका-यांना दिली अशी माहिती पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागूल यांनी सांगितली.
सुमारे तासभर चालू असलेल्या बैठकीमध्ये माहिती देताना आबा बागूल यांनी सांगितले की, पुण्याचा विस्तार मोठया वेगाने होत आहे. आगामी काही वर्षांमध्ये पुण्याची लोकसंख्या १ कोटीच्या आसपास जाणार अशी शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. अशा वेळी पुण्याची वाढती पिण्याची पाण्याची गरज पूर्ण करणेसाठी आत्ताच नियोजन करणे आवश्यक आहे. एक ते दोन वर्ष पाऊस नाही पडला तर भयानक परिस्थिती निर्माण होईल. मुळशी धरणाचे अतिरिक्त पाणी ओैदयोगिक क्षेत्राला दिले जाते. तसेच अंदाजे ४ टीएमसी पाणी समुद्रात जात आहे. अशा पाण्याचा वापर पिण्यासाठी आपण करू शकतो का असा विचार आल्याने मी मागणी केली आहे, असे आबा बागूल म्हणाले. हा विषय आत्ता चर्चेला आणला तर भविष्यात ४ ते ५ वर्षात मार्ग निघेल. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची गरज लक्षात घेवून मुळशी धरणाचे ५ टीएमसी पाणी पुणे शहराला मिळणे आवश्यक आहे. तसेच टाटा कंपनीशी झालेला करार हा ब्रिटिश काळातील असून सुमारे १०० वर्षापूर्वी झालेल्या कराराचे नव्याने मूल्यमापन कोणीच केले नाही, ते करण्याची आता गरज आहे असे आबा बागूल म्हणाले. जेव्हा शहराला पाण्याची गरज भासेल तेव्हा पाणी अचानक कोठून आणणार, यासाठी याविषयी नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे. खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये पाण्याची उपलब्धता नसेल तेव्हा शहराची तहान कशी भागवणार असा प्रश्न आबा बागूलांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र शासनाने या संदर्भात अहवाल करणेस सांगितले असून सुर्वे कमिटीचा अहवाल अदयाप पूर्णत्वास आला नाही अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी दिल्यावर विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, या संदर्भात पुणे महानगरपालिकेने जलसंधारण विभागाच्या मदतीने अपेक्षित खर्च तरतूद व कायदेशीर बाबी याबाबत अहवाल तयार करावा व पुणे महानगरपालिकेने तशी मागणी करावी. हे पाणी आपण ग्रॅव्हिटीने घेवू शकतो का? बंद पाईप लाईन मधून घेवू शकतो ? याबाबत \िजिबिलिटी रिपोर्ट तयार करावा. राज्य शासन व केंद्र शासन याबाबत अंतिम निर्णय घेतील. या संदर्भातील निर्णय राज्य व केंद्र पातळीवर होणार असला तरी महानगरपालिका पातळीवरूनही  प्रस्ताव तयार करून ठेवावा. त्यामध्ये सर्व बाबींचा विचार केला जावा असे ते म्हणाले. तसेच पुण्याची सध्याची पाणीपुरवठयाची उपलब्धता लक्षात घेवून पुणेकरांना हा पाणीपुरवठा कमी पडत आहे. तसे शास्त्रशुध्द विवेचन महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने तयार करावे अशी सूचना त्यांनी केली.

सदर बैठकीत आबा बागूल यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.खेमनार, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख श्री.पावसकर, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता श्री.धोडपकर यांचे आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ड्रंक &ड्राईव्ह , 3 दिवसात पोलिसांनी पकडले 201 चालक

पुणे दिनांक: 22 डिसेंबर 2025 पुणे शहर वाहतूक विभागाकडून मद्यपान...

बिबट्याला रोखण्यासाठी…..!!

पुणे जिल्ह्यातील उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर व दौंड...

जिल्ह्यातील उर्दू शाळांमध्ये अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

पुणे दि. २२ : जिल्ह्यात पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच...

डॉ. कैलास कदम यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी, पुणे (दि. २२ डिसेंबर २०२५)- पिंपरी चिंचवड शहर...