कर बुडव्यांना अभय व प्रामाणिक करदात्यांना मिळकतकर वाढीचा भुर्दंड,भाजपा अजब तुझा कारभार – आबा बागुल

Date:

  • दरमहाच्या भाडे रक्कमेपेक्षा मिळकत कर जास्त,

पुणे – कोरोना धर्तीवर विविध प्रकारचे खर्च तसेच महापालिकेचे येणारे कमी उत्पन्न याचे कारण दाखवत येणाऱ्या आर्थिक वर्षात ११ टक्के करवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने केला असून पुणे महानगरपालिका कर बुडव्यांना अभय योजना व प्रामाणिक पुणेकरांना भुर्दंड अशी भूमिका घेत असून कॉंग्रेस पक्षाचा यास तीव्र विरोध आहेच. याविषयी महापौर,मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष, हेमंत रासने,सभागृह नेते,गणेश बिडकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना आबा बागुल यांनी लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.

यामध्ये प्रामुख्याने पुणे महापालिकेचे उत्पन्न वाढीसाठी आम्ही ज्या मिळकतींवर कर आकारणी करण्यात आली नाही अशा लाखो मिळकती शोधून त्यावर आकारणी करा अशी वारंवार मागणी करत असून याविषयी प्रशासनाने १५ लाख फॉर्म आरोग्य खात्यामार्फत वितरीत केले आहेत असे सांगण्यात येते. परंतु अशा मिळकती शोधून त्यावर मिळकत कर आकारणी याकडे लक्ष देण्याऐवजी सत्ताधारी व प्रशासन ११ टक्के करवाढीचा संकेत देत आहेत, म्हणून भाजप अजब तुझा कारभार व हेच का अच्छे दिन असा पुणेकरांना प्रश्न पडला आहे. पुणे महापालिकेची वाढती हद्द व जुनी हद्द यामधील ज्या मिळकतींवर कर आकारणी करण्यात आली नाही अशा लाखो मिळकती शोधून त्यावर कर आकारणी केल्यास महापालिकेचे सुमारे १००० कोटी इतक्या रकमेने प्रतिवर्षी उत्पन्न वाढणार आहे. हा पर्याय सुलभ असताना कोरोना काळात नागरिकांचे उत्पन्न कमी झाले असताना प्रामाणिक मिळकत कर भरणारे यांना नवीन वर्षात मिळकत करात ११ टक्के वाढ करणेचा प्रस्ताव सादर करणे हे कितपत योग्य आहे असा सवाल बागुल यांनी विचारला आहे.तसेच मिळकतकरात 11 टक्क्यांनी वाढ करणे हे योग्य आहे का हे आता पुणेकरांनी ठरवावे.

आम्ही मिळकत कर आकारणी विषयी माहिती घेतली असता दरमहाच्या भाड्याच्या रकमेपेक्षा मिळकत कराची रक्कम जास्त असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. निवासी मिळकतीवर ६८ ते ८७ % व बिगर निवासी मिळकतीवर ८२ ते ११५ % इतकी (निवासी ५०० ते ६०० स्क्वेअरफुट मिळकतीस अंदाजे वार्षिक १५ ते १७ हजार व १०० ते १२० स्क्वेअरफुट बिगर निवासी भोगवटा नसलेल्या मिळकतीस अंदाजे वार्षिक ६० ते ७५ हजार) इतकी आकारणी करण्यात येते. एवढा कर असताना पुणेकर प्रामाणिकपणे कर भरतात, परंतु कर न भरणाऱ्यांची वसुली न करता त्यांच्यासाठी अभय योजना जाहीर करून करोडो रुपयांची सूट दिली जाते असा भाजपचा कारभार आहे. प्रशासनाला जाब विचारणे ऐवजी मिळकत करात ११ टक्के वाढ करणेचा प्रस्ताव सादर करण्यास सहमती दर्शविणे हि एक प्रकारे पुणेकरांची फसवणूक आहे. पुणेकरांनी सत्ताधारी भाजपवर प्रामाणिकपणे विश्वास दाखवून एकहाती सत्ता दिली असून त्यास तडा गेला असे आबा बागुल म्हणाले. काही नागरिक प्रामाणिकपणे पुणे महानगरपालिकेकडे कर आकारणी ची मागणी करतात. अशा नागरिकांना प्रतिसाद दिला जात नाही, याकडे देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.
पुणे महापालिकेकडून होणारी कर आकारणीची रक्कम पाहता पुणे शहरात मालमत्ता करण्यापेक्षा भाड्याने राहण्यास अथवा भाड्याने दुकान घेऊन व्यवसाय करण्यास नागरिक प्राधान्य देतील अशी परिस्थिती आली आहे असे म्हंटले तरी वावगे होणार नाही. गेल्या ४ वर्षांपासून नव्याने होणारी कर आकारणी याची Annual Retebal Value (ARV) यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
नवीन दर वाढ रद्द करा थकबाकी वसूल करा अन्यथा कॉंग्रेस पक्षास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही अशी लेखी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या कडे बागुल यांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्व धर्मीय ख्रिसमस स्नेह मेळावा संपन्न

पुणे; पुण्यातील येरवडा – शास्त्रीनगर भागातील सेक्रेड हार्ट चर्च येथे...

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी जास्तीत जास्त दर देण्याचा विचार•...

राज बब्बर,रमेश बागवे, मोहन जोशी,वसंत पुरकेंसह काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर.

मुंबई, दि. २३ डिसेंबर २०२५ राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस...

सत्तेच्या लोभी राजकारणाला आम आदमी पार्टी शह देईल..अरविंद केजरीवाल,भगवंत मान पुण्यात प्रचाराला येणार

पुणे- ' महाराष्ट्रात प्रस्थापित राजकीय पक्षांनी विचारधारा सोडून सामान्य...