डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या तैलचित्राचे डॉ राम ताकवले यांच्या हस्ते अनावरण
पुणे :
प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र कोस्मोपोलीटन एज्युकेशन सोसायटी च्या ३१ शैक्षणिक संस्थांच्या २५ हजार विद्यार्थ्यांनी आझम कॅम्पस मैदान येथे क्रीडा ,सांस्कृतिक प्रात्यक्षिकातून ‘ विविधतेतून एकता ‘ चा संदेश दिला . माजी कुलगुरू डॉ राम ताकवले यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले . अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष पी ए इनामदार होते . डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या तैलचित्राचे अनावरण डॉ राम ताकवले यांच्या हस्ते झाले
यावेळी डॉ एन वाय काझी ,अबेदा इनामदार,लतीफ मगदूम ,मुनवर पिरभोय ,एस बी एच इनामदार ,मुमताज सय्यद ,सर्व प्राध्यापक ,अध्यापक ,विध्यार्थी ,पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन रोशन आरा ,दिलशाद सय्यद ,मजीद सय्यद यांनी केले


