आझम कॅम्पस मधील योग प्रात्यक्षिकांमध्ये ५०० विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस) मध्ये २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी दिली. संस्थेच्या बॅडमीन्टन हॉलमध्ये सकाळी साडेसात वाजता योग प्रात्यक्षिके झाली. यात ५०० विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सहभाग होता. योग प्रशिक्षक राजू वाडकर आणि शबनम पिरजादे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके केली.
एम सी ई सोसायटी संस्थेचे सचिव लतीफ मगदूम, प्राचार्य शैला बुटवाला, अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापक आयेशा शेख, अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूलच्या मुख्याध्यापक परवीन शेख, प्रा.भूषण पाटील, क्रीडा प्रशिक्षक गुलझार शेख उपस्थित होते .