पुणे- भाजपने केवळ मोठमोठी आश्वासने दिली , आणि आता केंद्रात आणि राज्यात सत्ता मिळवूनही ती पाळली मात्र नाही, उलट भाजपमध्ये आता गटबाजी सुरु झाली , आणि सत्तेतील त्यांचा सहकारी घटक पक्ष असलेला शिवसेनेशी त्यांचे स्पष्ट वादंग होत आहेत . या सर्व गोष्टी पाहून आज पुन्हा राज ठाकरे यांच्याकडेच तरुणाई आशेने पाहत आहे , नव्हे , तर राज ठाकरेच परिवर्तन घडवू शकतात असा तरुणाईचा ठाम विश्वास आहे , या विश्वासाच्या बळावरच आम्ही पुणे महापालिकेचा गड सर करू.. असे प्रतिपादन मनसे चे युवा नेते आशिष साबळे यांनी मायमराठी शी बोलताना व्यक्त केले आहे .. पहा आणि ऐका .. नेमके आशिष साबळे काय म्हणतात ते …