मुंबई –
प्रतिथयश कथ्थक गुरु आशा जोगळेकर यांचे आज सकाळी अंधेरी (प.) येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्या ८० वर्षांच्या होत्या. गेली पन्नास वर्षे त्या अंधेरी येथे ‘अर्चना नृत्यालय’च्या मार्फत कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण देत होत्या. सुप्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना अर्चना जोगळेकर ह्या त्यांच्या कन्या आहेत तसेच आशा जोगळेकरांच्या पश्चात १ पुत्री, २ पुत्र, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.