मुंबई – साऱ्या रसिकांना आणि जनतेला ठाऊक आहे सरकारी पुरस्कार कसे दिले जातात ते… असे असतानाही ‘कटी पतंग ‘ मधील आणि बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री आशा पारेख हिची पतंग ‘अगदी मोजक्या वाक्यात कापून कोणता डाव भाजपचे गडकरी खेळत आहेत किंवा एकंदरीत सिनेसृष्टीलाच ते काही संदेश देवू इच्छित आहेत काय ? यावर आता सिनेसामिक्षकांमध्ये जोरदार चर्चा होवू शकणार आहे .
त्याच्ला निमित्त असे झाले आहे … पद्मभूषण पुरस्कारासाठी होणाऱ्या शिफारसी नेत्यांसाठी डोकेदुखी बनली आहे, हिंदी तील प्रख्यात अभिनेत्री आशा पारेख हिने हि आपल्याकडे पद्मभूषण मिळावे म्हणून विनंती केली होती ,अशी वादग्रस्त टिपण्णी केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केल्यानंतर आशा पारेख यांनी मात्र गडकरी खोटे बोलत असल्याचा दावा केल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे . दरम्यान गडकरी यांनी आशा पारेख यांचेच का नाव घेतले ? आणखी कोणकोणत्या लोकांनी पुरस्कारासाठी त्यांना गळ घातली होती ? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत आशा पारेख या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा ही राहिल्या आहेत . नट-नट्यांना राखीव कोट्यातून मिळणारी घरे तसेच हिंदी-मराठी सिनेसृष्टी आणि राजकारणी यांच्यातील संबध यामुळे प्रकाशात यावेत अशी अनेकंची इच्छ्या हि आहे .
पद्मभूषण पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी जोरदार लॉबिंग केले होती. या पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची मी शिफारस करावी म्हणून त्या बारा मजले चढून माझ्या घरी आल्या होत्या, असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी शनिवारी सेवासदनच्या नागपूर शाखेतर्फे आयोजित शिक्षण प्रबोधन पुरस्काराच्या वितरणप्रसंगी बोलताना केला होता
पद्मभूषण पुरस्कारासाठी जी स्पर्धा केली जाते ती योग्य नाही, पुरस्कारासाठी माझ्याकडे वशिला लावायला अनेकजण येतात. त्यामुळे मी खरोखरच त्रस्त झालो आहे. आशा पारेख जेव्हा माझ्या घराकडे आल्या होत्या, तेव्हा इमारतीची लिफ्ट बिघडली होती, त्यानंतर बारा मजले चढून त्या माझ्या घरी आल्या. आपल्याला याआधी पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे, पण आपण पद्मभूषणसाठी पात्र असून, आता तो पुरस्कार आपल्याला दिला जावा, असे त्यांनी सांगितल्याचे गडकरींनी नमूद केले. मात्र पारेख यांनी आपण कधीच गडकरींना भेटलो नव्हतो, असा दावा केला आहे.