पुणे-अखिल भारतीय सेनेचा ” पुणे जिल्हास्तरीय महामेळावा ” तळेगाव दाभाडे येथील पुणे मुंबई महामार्गाजवळील सुशीला मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला . या मेळाव्यामध्ये अखिल भारतीय सेना पक्षाची ध्येय धोरणे ठरविणे , आगामी निवडणुकीची तयारी व अन्य कार्याबाबत कार्यकर्त्यांशी सवांद साधण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता , तसेच या मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला. या मेळाव्यामध्ये अखिल भारतीय सेना पक्षाच्या ध्वजाचे अनावरण करण्यात आले . या मेळाव्यास राज्यभरातून मुंबई , ठाणे , डोंबिवली सोलापूर , औरंगाबाद , बीड , नगर , सातारा आदी भागातून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या महामेळाव्यात अखिल भारतीय सेना पक्षाची सरचिटणीस आशाताई अरुण गवळी यांनी मार्गदर्शन केले .या मेळाव्यास अखिल भारतीय सेना पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष शनीश्वर शिनगारे , पुणे जिल्हा महिला अध्यक्षा सत्यभामा आवळे , पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे पाटील , पुणे शहर महिला अध्यक्षा यशस्विनी नवघणे , अखिल भारतीय सेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या मेळाव्याचे संयोजन अखिल भारतीय सेना पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन भांडवलकर व मावळ तालुका अध्यक्ष संतोषभाऊ जाचक यांनी केले होते . या महामेळाव्यात अखिल भारतीय सेना पक्षाचे पुणे शहर जिल्ह्यामधील सर्व सेलचे अध्यक्ष , पदाधिकारी , कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
या मेळाव्यास पुणे शहर युवक अध्यक्ष बाळासाहेब पठारे , पुणे शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रीतम कोयलॆ , शिरूर तालुका अध्यक्ष गणेशदादा सासवडे , हवेली तालुका अध्यक्ष हरिभाऊ कामठे , हवेली तालुका कार्याध्यक्ष सचिन शिंदे , युवक अध्यक्ष हिराशेठ वाघमारे ,पुणे शहर कार्याध्यक्ष महेश देवकुळे , पुणे शहर संपर्क प्रमुख सचिन पवार ,पुणे शहर उपाध्यक्ष एजाज सय्यद , पुणे शहर उपाध्यक्ष सागर मोहिते , सचिव गफूर शेख , पुणे शहर युवक संघटक अझहर पठाण ,गणेश सोनवणे , युवक उपाध्यक्ष युवराज तांबे , वडगाव शेरी युवक अध्यक्ष दीपक भंडलकर , मावळ तालुका युवक अध्यक्ष हनुमंत म्हस्के , शिवाजीनगर मतदार संघ अध्यक्ष नासीर निलगर ,पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ अध्यक्ष फिरोझ शेख , पर्वती मतदार संघ अध्यक्ष हरिष पाटील ,खडकवासला मतदार संघ उपाध्यक्ष मोहन साळुंके , विद्यार्थी आघाडी पर्वती मतदार संघ अध्यक्ष जितेंद्र पोतदार ,अमोल चाळेकर, साईल नवले , अक्षय धुमाळ , संदीप जयस्वाल , हडपसर विधानसभा संघाच्या महिला अध्यक्षा मयुरी बामणे , खडकवासला विधानसभा महिला अध्यक्षा उमा गायकवाड , पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ कार्याध्यक्ष हनीफ सय्यद , उपाध्यक्ष अली शेख , हडपसर मतदार संघाचे युवक अध्यक्ष अभिषेक भालके , खडकवासला मतदार संघाचे कार्याध्यक्ष संदीप पांचाळ पर्वती विभाग युवक कार्याध्यक्ष अंकुश कसबे आदी मान्यवर उपस्थित होते .
. या मेळाव्यास उपस्थितांचे स्वागत अखिल भारतीय सेना पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन भांडवलकर यांनी केले तर सूत्रसंचालन मावळ तालुका अध्यक्ष संतोषभाऊ जाचक यांनी केले तर आभार अखिल भारतीय सेना पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष शनीश्वर शिनगारे यांनीं मानले .
या मेळाव्यात अखिल भारतीय सेना पक्षाची सरचिटणीस आशाताई अरुण गवळी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि , अखिल भारतीय सेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कार्याची प्रेरणा घेउन काम करा तसेच महिला कार्यकर्त्यांनी झाशीचे राणीची प्रेरणा घेऊन काम करा . अखिल भारतीय सेना पक्षाचे विचार तळागाळापर्यंत व सामान्य लोकापर्यंत पोहोचवा. पैसा आणि सत्ता असणाऱ्यांची गुलामी करू नका तर गोरगरिबांना मदत करा . शेतकरी बांधवाना मदत करा . आपण सर्व एकजुटीने राहून अन्यायाविरुद्ध आवाज उठवा.