पुणे : पुणे स्थित सुरक्षा उपकरणांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आरुष फायर सिस्टिम्स कंपनीला ऑल इंडिया अचिव्हर्स फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या ‘फास्टेस्ट ग्रोविंग इंडियन कंपनी एक्सलन्स अवॉर्ड’ या पुरस्काराने माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कंपनीच्या वतीने संस्थापक अर्जुन जाधव यांनी हा पुरस्कार स्विकारला. याशिवाय आरुष फायर सिस्टिम्सचे युवा संचालक राहुल जाधव यांनाही माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या हस्ते ‘इंडियन लिडरशिप अवॉर्ड फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट’ या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.
नवी दिल्लीत झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात देशातील विविध राज्यांमधून आलेले अनेकविध उद्योग क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी ‘राष्ट्रीय आर्थिक विकास आणि सामाजिक जबाबदारी’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
या पुरस्कार सोहळ्यासाठी माजी केंद्रीय मंत्री व तामिळनाडूचे माजी राज्यपाल डॉ. भीष्म नरेन सिंग, सिक्कीमचे माजी राज्यपाल बी. पी. सिंग, निवृत्त मेजर वेद प्रकाश,ऑल इंडिया अचिव्हर्स फाऊंडेशनचे महासचिव के.व्ही. सिंग यांच्यासह इतर मान्यवर उपिस्थत होते.
हा पुरस्कार मिळाल्याने औद्योगिक सुरक्षा क्षेत्रात आम्ही करीत असलेले काम योग्य पद्धतीने होत असल्याची जणू पोचपावतीच म्हणावी लागेल, असे सांगत यापुढेही अशाचप्रकारे कामाची वाटचाल आणखी वेगाने करणार असल्याचा विश्वास आरुष फायर सिस्टिम्सचे संचालक राहुल जाधव यांनी व्यक्त केला.

