पंजाबमध्ये आम आदमीचा बोलबाला, सर्वच पक्षांवर फिरला झाडू- उत्तर प्रदेशात भाजपा अडीचशे पार , कॉंग्रेस सर्वत्र पिछाडीवर

Date:

पंजाब आप ला तर अन्य चारही राज्ये भाजपा कडे …

नवी दिल्ली- पंजाबच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरूवातीच्या मतमोजणीमध्ये आम आदमी पक्षाने बहुमताचा आकडा पार केला असून येथे दिल्ली विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची सध्या तरी दाट शक्यता दिसत आहे. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असून अकाली दल पिछाडीवर आहे. माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत निवडणूक लढवत असलेला भाजपला या युतीचा काहीच फायदा झालेला दिसत नाही.आप ने पंजाब मध्ये ९० जागांवर आघाडी मिळविली असून कॉंग्रेसने १३ तर अकाली ने ८ जागांवर आणि भाजपने अवघ्या ५ जागांवर आघाडी मिळविल्याचे वृत्त आहे .36 जागांचे बहुमत असलेल्या उत्तराखंडमध्येदेखील भाजप आणि काँग्रेसमध्ये कडवी झुंज सुरू असून दोन्ही पक्ष सध्या भाजपा ४२ तर कॉंग्रेस २४ जागांवर पुढे आहे. येथे सत्तेत असलेल्या भाजपने गेल्या निवडणुकीत 57 जागांवर विजय मिळवला होता. दुसरीकडे, मणिपूरमध्येही भाजप सध्या 25 जागांवर पुढे असून येथे बहुमतासाठी 31 जागांची आवश्यकता आहे.गोव्यामध्ये मात्र आपला काहीही मिळाल्याचे चित्र नाही येथे भाजपा १९ तर कॉंग्रेस १४ जागांवर आघाडीवर असल्याचे वृत्त आहे उत्तर प्रदेशात भाजपने २६४ जागांवर मुसंडी मारून सपा ला ११२ जागांवर रोखले आहे तर बसपा आणि कॉंग्रेस प्रत्येकी ४/४ जागांवर अडकले आहेत . मणिपूर मध्ये भाजपने २८ जागांवर आघाडी घेतली असून कॉंग्रेस ने कॉंग्रेसने १८ जागांवर आघाडी घेतली आहे .

1. पंजाब विधानसभेची स्थिती

एकूण जागा – 117 बहुमत- 59

एकूण जागाकाँग्रेसआपअकालीभाजप+इतर
1171388853

2. उत्तराखंड विधानसभेची स्थिती

एकूण जागा – 70

बहुमत – 36

उत्तराखंडमध्ये जनतेचा रोष कमी करण्यासाठी सत्ताधारी भाजपने चार महिन्यांतच तीन वेळा मुख्यमंत्री बदलले. आता भाजप चौथ्यांदा राज्याला मुख्यमंत्री देणार की काँग्रेस बाजी मारणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.

पक्षपुढेविजयीएकूण
भाजप42042
काँग्रेस24024
आप101
इतर202

3. मणिपूर विधानसभेची स्थिती

एकूण जागा – 60

बहुमत – 31

मणिपुरमध्येदेखील सत्तेत असलेल्या भाजपने यंदा सर्वच्या सर्व 60 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. यात भाजपला कितपत यश मिळेल, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

पक्षआघाडीविजयीएकूण
भाजप28026
काँग्रेस1809
एनपीएफ000
एनपीपी17017
इतर202

गोवा एकूण जागा ४० –

आघाडीवर

भाजपा १७

कॉंग्रेस १३

आप 1

तृनुमल मगोपा-५

सेना राष्ट्रवादी -0

इतर -3

उत्तर प्रदेश एकूण जागा ४०३

आघाडीवर

भाजपा २५४

सपा ११८

बसपा ५

कॉंग्रेस ६

पंजाबमध्ये या जागांकडे सर्वांचे लक्ष

अमृतसर पूर्व – येथून पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिद्धू आणि दिग्गज अकाली नेते बिक्रम मजिठिया यांच्यात लढत आहे. 2017 मध्ये नवज्योत सिद्धू येथून निवडणूक जिंकले होते. यावेळी सिद्धूंना आव्हान देण्यासाठी बिक्रम मजिठिया त्यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. सिद्धू आणि मजिठिया आजपर्यंत एकही निवडणूक हरलेले नाहीत. त्यामुळे दोघांमध्ये या जागेसाठी चुरशीचा सामना होणार आहे व या जागेसाठी प्रथमच कोणालातरी पराभवाचा सामना करावा लागणार आहे.

भदौर – या जागेवर मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांना आम आदमी पक्षाचे लाभ सिंह उगोके यांच्याकडून कडवी टक्कर मिळत आहे. चन्नी हे काँग्रेसचा मुख्यमंत्री चेहरा असल्याने त्यांना याचा फायदा मिळत आहे; मात्र चन्नी मुळचे येथील नसल्याने आम आदमी पक्षाला येथे लोकांकडून समर्थन मिळत आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही चन्नी यांचा या जागेवर पराभव होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या जागेच्या निकालाकडे लागले आहे.

धुरी – आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले भगवंत मान येथून निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत काँग्रेसचे युवा नेते दलवीर सिंग गोल्डी यांच्याशी आहे. मान हे सलग दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. धुरी ही जागा त्यांच्या लोकसभा मतदारसंघात येते. मात्र, यापूर्वी ते जलालाबाद आणि लेहरामधून विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. अशातच त्यांना गोल्डीकडून तगडे आव्हान मिळत आहे.

पतियाळा – माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग येथून निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या सुमारे साडेतीन महिने आधी काँग्रेसने त्यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली. नंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला आणि भाजपसोबत युती केली. पतियाळा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे उमेदवार अजित पाल कोहली कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.

मोगा – बॉलिवूड स्टार सोनू सूदची बहीण मालविका सूद येथून निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने त्यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे काँग्रेसचे मोगा येथील विद्यमान आमदार हरजोत कमल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मतदानाच्या दिवशीही मोगा येथील मतदान केंद्रावर फिरणाऱ्या सोनू सूदला पोलिसांनी अडवले होते आणि त्याचे वाहनही जप्त केले होते.

पंजाब निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे

  • भ्रष्टाचार, अंमली पदार्थांचे व्यसन, बेरोजगारी, पाकिस्तानसोबतची सीमा सुरक्षा, पंजाबमधील शांतता आणि कायदा सुव्यवस्था
  • मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीतील लोकांना ‘भैय्या’ संबोधले. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काँग्रेसला घेरले.- दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपी प्रोफेसर दविंदरपाल भुल्लरच्या सुटकेसाठी अकाली दलाने आम आदमी पक्षावर टीकेची झोड उठवली. अकाली दलाने म्हटले की, दिल्लीच्या केजरीवाल सरकारने प्रा. भुल्लरची सुटका केली नाही.
  • पंजाबमधील हिंदुंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सत्ताधारी काँग्रेससह भाजपलाही शह देण्याचा प्रयत्न केला आहे. फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत राहिलेल्या त्रुटींचा दाखला देत केजरीवाल यांनी व्यापाऱ्यांना सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले आहे.

उत्तराखंडमध्ये भाजप परंपरा खंडीत करणार का?

गंगा-यमुनेच्या पवित्र लाटांनी सजलेल्या देवभूमी उत्तराखंडमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसचा पराभव करून सत्ता हिसकावून घेतली; पण आजपर्यंत राज्यात एकाही सत्ताधारी पक्षाला सलग दोन टर्म आपले सरकार टिकवता आलेले नाही. 2002 मध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आणि 2007 मध्ये भाजपने सत्ता मिळवली. यानंतर 2012 मध्ये काँग्रेसने पुन्हा पुनरागमन केले, मात्र 2017 मध्ये मोदी लाटेवर स्वार होऊन भाजपने विक्रमी 57 जागांसह सरकार स्थापन केले. आता ही परंपरा मोडीत काढून भाजप पुन्हा सत्ता मिळवणार की, परंपरेनुसार काँग्रेस सत्तारूढ होणार, हे लवकरच समजेल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...