Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आली ,आली बॅटरी वरील रिक्षा आली…(व्हिडीओ )

Date:

पियाजिओकडून कार्गो व पॅसेंजर विभागातील इलेक्ट्रिक वाहनांची आपे इलेक्ट्रिक एफएक्‍स श्रेणी सादर

·         प्रगत लिथियम-आयन स्‍मार्ट-बॅट-यांची शक्‍ती असलेल्‍या फिक्‍स्‍ड बॅटरी इलेक्ट्रिक तीनचाकीची श्रेणी भारतातील शेवटच्‍या अंतरापर्यंतच्‍या गतीशीलतेमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणण्‍यास सज्‍ज·         नवीन आपे ई-एक्‍स्‍ट्रा एफएक्‍स या सर्वात शक्तिशाली तीनचाकी कार्गोमध्‍ये ९.५ किलोवॅट शक्‍ती, सर्वोत्तम लोड क्षमता, उद्योगक्षेत्रातील सर्वोत्तम ६ फूट लांब डेकसह इलेक्ट्रिक पॉवरट्रेन·         नवीन आपे ई-सिटी एफएक्‍स या सर्वात लाभदायी तीनचाकीमध्‍ये उच्‍च दर्जाची श्रेणी आणि सर्वोत्तम राइड कम्‍फर्ट

पुणे, २३ फेब्रुवारी २०२१: पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि. (पीव्‍हीपीएल) ही दुचाकी विभागातील युरोपियन प्रमुख कंपनी इटायलियन पियाजिओ ग्रुपची १०० टक्‍के उपकंनी आणि भारताच्‍या आघाडीच्‍या लघु व्‍यावसायिक वाहनांच्‍या उत्‍पादक कंपनीने आज कार्गो व पॅसेंजर विभागांमध्‍ये इलेक्ट्रिक वाहनांची एफएक्‍स श्रेणी (फिक्‍स्‍ड बॅटरी) सादर केली.नवीन आपे ई-एक्‍स्‍ट्रा एफएक्स ही ९.५ किलोवॅट पॉवर आऊटपुट असलेली विभागातील सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक कार्गो आहे. ही वेईकल उपयुक्‍त ६ फूट लांब कार्गो डेकसह प्रमाणित पूर्णत: मेटल बॉडी रचनेसह येते. तसेच ही वेईकल डिलिव्‍हरी व्‍हॅन, कचरा गोळा करणे इत्‍यादी सारख्‍या उपयोजनांसाठी सानुकूल देखील आहे.पॅसेंजर वेईकल आपे ई-सिटी एफएक्‍स ही सर्वात लाभदायी तीनचाकी आहे. या वेईकलची उच्‍च दर्जात्मक वैशिष्‍ट्ये व आरामदायी राइड अधिक ट्रिप्‍स व उत्तम उत्‍पन्‍नाची खात्री देतात.दोन्‍ही उत्‍पादनांमध्‍ये अव्‍वल दर्जाच्‍या श्रेणीची वैशिष्‍ट्ये आहेत- जसे ब्‍ल्‍यू व्हिजन हेडलॅम्‍प्‍स, ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन, हिल होल्‍ड असिस्‍ट, रिजनरेटिव्‍ह ब्रेकिंग, ड्युअल टोन सीट्स, आकर्षक रंग व ग्राफिक्‍स, मल्‍टी-इन्‍फॉर्मेशन इन्‍स्‍ट्रूमेंट क्‍लस्‍टर, बूस्‍ट मोड इत्यादी. एफएक्‍स फिक्‍स्‍ड बॅटरी श्रेणीमध्‍ये घरी व कार्यालयामध्‍ये सोईस्‍करपणे चार्जिंग करता येईल अशी वैशिष्‍ट्ये आहेत.याप्रसंगी बोलताना पियाजिओ वेईकल्‍स प्रा. लि.चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. डायगो ग्रॅफी म्‍हणाले, ”आपे हा ३० लाखांहून अधिक आनंदी ग्राहकांचा विश्‍वास असलेला ब्रॅण्‍ड इलेक्ट्रिक वाहनांच्‍या एफएक्‍स श्रेणीसह भारतीय इलेक्ट्रिक क्रांतीच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. पियाजिओ ग्रुपचा मागील 4 दशकांपासून इलेक्ट्रिक तंत्रज्ञान विकसित करण्‍याचा संपन्‍न वारसा आहे, ज्‍याचा आम्‍ही लाभ घेत भारतासाठी दर्जात्‍मक उत्‍पादने विकसित करतो. २०१९ मध्‍ये स्‍वॅपेबल तंत्रज्ञान असलेल्‍या आपे ई-सिटीच्‍या सादरीकरणानंतर आम्‍ही आता ग्राहकांच्‍या वैविध्‍यपूर्ण गरजांची पूर्तता करण्‍यासाठी फिक्‍स्‍ड बॅटरी तंत्रज्ञान सादर करत आहोत. ही नवीन एफएक्‍स श्रेणी भारतामध्‍ये ईव्‍हींच्‍या मोठ्या प्रमाणात अवलंबेप्रती असलेल्‍या सरकारच्‍या उपक्रमांशी संलग्‍न पियाजिओच्‍या दृष्टिकोनाच्‍या दिशेने उचलण्‍यात आलेले एक पाऊल आहे.”पियाजिओ इंडिया प्रा. लि.चे कार्यकारी उपाध्‍यक्ष व व्‍यावसायिक वाहन व्‍यवसायाचे प्रमुख श्री. साजू नायर म्‍हणाले, ”आम्‍ही उद्योगक्षेत्रातील ट्रेण्‍ड्स, ग्राहक महत्त्वाकांक्षा व विभागातील गरजांचा सखोल अभ्‍यास केल्‍यानंतर एफएक्‍स श्रेणी सादर करत आहोत. एफएक्‍स श्रेणी आमच्‍या ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करेल, वातावरणाचे संरक्षण करेल आणि ”आपेने अवलंबलेल्‍या इलेक्ट्रिकसह भारताने देखील अवलंबले इलेक्ट्रिक” या संकल्‍पनेसह उद्योगक्षेत्रामध्‍ये खरा क्रांतिकारी बदल घडवून आणेल.”

आपे ई-एक्‍स्‍ट्रा एफएक्‍स ही आज भारतामध्‍ये उपलब्‍ध असलेली सर्वात शक्तिशाली व वैविध्‍यपूर्ण कार्गो वेईकल आहे. ही वेईकल ई-कॉमर्स, गॅस सिलिंडर्स, मिनरल वॉटर बॉटल्‍स, एफएमसीजी, पालेभाज्‍या, कचरा गोळा करणे अशा अनेक विभागांच्‍या गरजांची पूर्तता करेल. कार्यसंचालन खर्च ५० पैशांपेक्षाही कमी असलेली ही शेवटच्‍या अंतरापर्यंत सामान परिवहनाची खात्री देणारी सर्वात किफायतशीर वेईकल आहे.आपे ई-सिटी पॅसेंजर कॅरियर अत्‍यंत कमी एनव्‍हीएच पातळ्यांसह प्रवाशांच्या शेवटच्‍या अंतरापर्यंत आरामदायी प्रवासाची खात्री देते. ही वेईकल तिच्‍या अत्‍यंत कमी कार्यसंचालन खर्चांसह सर्व प्रमुख शहरांमधील परिवहनामध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणेल.आम्‍ही आमच्‍या ग्राहकांना आत्‍मविश्‍वास व मन:शांती मिळण्‍याच्‍या खात्रीसाठी अद्वितीय सर्विस सोल्‍यूशन्‍स देत आहोत. वेईकल्स ३ वर्षे/ १ लाख किलोमीटर ”सुपर वॉरण्‍टी”सह येतात. याव्‍यतिरिक्‍त आम्‍ही आमच्‍या सर्व ग्राहकांना सुरूवातीची ऑफर म्‍हणून ३ वर्षे फ्री मेन्‍टेनन्‍स पॅकेज देत आहोत. पियाजिओ आय-कनेक्‍ट टेलिमॅटिक्‍स सोल्‍यूशन आमच्‍या ग्राहकांसाठी, तसेच पीव्‍हीपीएल सर्विस उपक्रमांसाठी रिअल टाइम वेईकल डेटा ट्रॅकिंग सेवा देते.”पियाजिओ वेईकल्‍सच्‍या विपणन, उत्‍पादन विपणन, माध्‍यम व व्‍यवसाय विकासाचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष श्री. मालिंद कपूर म्‍हणाले, ”पियाजिओ आपे इलेक्ट्रिक एफएक्‍स श्रेणीचे सादरीकरण ग्राहकांना विशिष्‍ट उपयोजनांवर आधारित निवडण्‍यासाठी अद्वितीय सोल्‍यूशन्‍स व व्‍यापक श्रेणी देण्‍याच्‍या आमच्‍या धोरणात्‍मक उपक्रमाचा भाग आहे.आम्‍ही सानुकूल उपयोजनांसाठी ६ फूट लांब कार्गो डेक व डिलिव्‍हरी व्‍हॅन पर्याय असलेली आपे ई-एक्‍स्‍ट्रा सादर करत आहोत. शून्‍य उत्‍सर्जन, कमी एनव्‍हीएच, उच्‍च दर्जाचे ड्राइव्‍ह व राइड कम्‍फर्ट अशी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये या वेईकलला वाहतुकीमुळे वाढलेल्‍या प्रदूषणाचा सामना करत असलेल्‍या आधुनिक भारतीय शहरे व नगरांच्‍या शेवटच्‍या अंतरापर्यंतच्‍या परिवहनासाठी योग्‍य निवड बनवतात. आपे इलेक्ट्रिक एफएक्‍स श्रेणीच्‍या सादरीकरणासह आम्‍ही डिझेल, सीएनजी, एलपीजी, पेट्रोल व इलेक्ट्रिकमधील वाहने देणारी भारतातील फ्यूएल अॅग्‍नोस्टिक कंपनी म्‍हणून स्‍वत:ला स्थित केले आहे. आम्‍ही भारतभरात नवीन आपे इलेक्ट्रिक एक्‍स्‍पेरिअन्‍स केंद्रे सादर करत वैविध्‍यपूर्ण खरेदी अनुभव देण्‍याशी कटिबद्ध आहोत.”

फेम २ सबसिडी, किंमत व बुकिंग:

आपे इलेक्ट्रिक एफएक्‍स श्रेणी फेम २ सबसिडी आणि नोंदणी प्रक्रियेशी संबंधित इतर विविध लाभांसाठी पात्र आहे. फेम २ सबसिडीचा लाभ मिळाल्‍यानंतर आपे ई-एक्‍स्‍ट्रा एफएक्‍स सुरूवातीची एक्‍स–शोरूम किंमत रूपये 3,12,137 सह येते आणि आपे ई-सिटी एफएक्‍स सुरूवातीची एक्‍स-शोरूम किंमत रूपये 2,83,878 सह येते.

आपे इलेक्ट्रिक एफएक्‍स वेईकल्‍स www.buyape.in या वेबसाइटवर ऑनलाइन किंवा टोल फ्री क्रमांक 1800-120-7520 वर संपर्क साधन बुक करता येऊ शकतात. मोठ्या ऑर्डर्सच्‍या विनंती ape.Electric@piaggio.co.in येथे करता येऊ शकतात.डिलरशिप चौकशीसाठी +91-9823790876  येथे संपर्क साधा किंवा cbd@piaggio.co.in येथे मेल पाठवा.

आपणास याबाबतची माहिती मायमराठी डॉट नेट वर मिळाल्याचे आवर्जून सांगा …

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...