पुणे- दिवसेंदिवस प्रत्येक कागदपत्रांच्या वाढत चाललेल्या सक्ती , नव्याने उभा राहिलेला ‘आधार ‘चा राक्षस .. यामुळे जनतेत प्रचंड संताप आहे .पण सत्ता ज्याच्या हाती त्याला हा संताप नाही दिसत … त्याला आपण काही तरी फार चांगले काम करतो आहे, जनतेला शिस्त लावतो आहे अशा बढाया मारण्याची सवय असते . इथे खायला नाही दाणा,आणि म्हणे आधार कार्ड आणा…लोकांना जीवन जगण्यासाठी रोटी कपडा मकान साठी आयुष्यभर लढाई करावी लागते आहे . आता सरकार त्यात अशा नव्या आधारसाठीच्या सक्तीची भर टाकून लोकांना सतावत असल्याची भावना व्यक्त होते आहे .मृत्यू प्रमाणपत्रासाठी ला आधार च्या सक्तीच्या बातमीने आता अंत्यसंस्कारासाठी पास मिळेल काय ?अशासारख्या अन्य प्रश्नांचा ही मारा होतो आहे