पुणे-वानवडी गावामधील आदेश्वर दादा जैन टेम्पल ट्रस्टचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला . या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये मंदिरात सकाळी अठरा अभिषेक , देवाचे नवीन पाच ध्वज मंदिराच्या कळसावर चढवून ध्वजारोहण करण्यात आले . त्यानंतर जांभुळकर गार्डनमध्ये स्वामी वात्सल्य म्हणजेच महाप्रसादाचा कार्यक्रम झाला .
यावेळी रशमीन शहा यांनी सांगितले कि , आदेश्वर भगवानजी स्थापना खूप वर्षांपासूनची आहे . या देवळातील देवाची मूर्ती जैन समाजातील संप्रती महाराज यांच्याहस्ते करण्यात आली आहे . त्यांनी अनेक ठिकाणी देवळांची उभारणी केली आहे . मंदिराच्या ठिकाणी पूर्वी वाण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात होती . या भागाला वाण्यांची बोळ म्हणत . त्यामुळे या वाण्यांच्या बोळपासून या भागाला वानवडी असे म्हणू लागले . या मंदिराचे देखरेख गोडीजी पार्श्वनाथ टेम्पल ट्रस्टच्या माध्यमातून होते .
या कार्यक्रमांमध्ये अनिल गांधी , रमेश मणिलाल शहा , रशमीन शहा , जयेश शहा , हेमंत शहा , पंकज शहा , भूपेंद्र शहा व शशिकांत मणियार आदी मान्यवर आणि जैन श्वेतांबर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .