शौचालय, फुटपाथ, भिंती रंगवणे म्हणजे स्मार्ट सिटी का ? आबा बागुल यांचा प्रश्न

Date:

स्मार्ट सिटीच्या मानांकनात न अडकता पुणे शहर कसे स्मार्ट करता येईल याकडे लक्ष द्या, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी स्मार्ट सिटीच्या सीईओ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

.

पुणे:- गेल्या काही वर्षांत स्मार्ट सिटीचा कारभार बघता पुणेकरांचा या योजनेवरील विश्वास उडालेला आहे. स्मार्ट म्हणजे काय हेच पुणेकरांना समजण्यास तयार नाही. शहरात मोठे फुटपाथ तयार करणे, झाडे लावणे, रस्ते बनवणे, शौचालयांना रंगरंगोटी करणे म्हणजेच स्मार्ट शहर करणे की काय? असा समज आता नागरिकांचा होऊ लागला आहे. ही कामे तर महानगरपालिकेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे सभासद आपल्या भागात करत आहेत.

मग स्मार्ट सिटी म्हणून कोणती विशेष कामे स्मार्ट सिटीने केली आहेत? असा सवालही बागूल यांनी उपस्थित केला आहे.

स्मार्टची संकल्पना अशी होती की, शहरावर त्याचा प्रभाव पडेल आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या जीवाला, आरोग्याला व इतर कोणत्याही गोष्टीला धोका नसेल, हा खरा स्मार्टनेस पाहिजे. शहरामध्ये वाहतुकीचा आराखडा करणे, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे व नागरिकांचा त्याकडे कल वाढवणे म्हणजे स्मार्टनेस.

सर्व इ गव्हर्नन्स आणणे त्याचे मार्गदर्शन करणे म्हणजे स्मार्टनेस, पर्यावरणाचा समतोल राखणे म्हणजे स्मार्टनेस, 900 हेक्टर बीडीपी झोनवर कसे वृक्षारोपण करणे, बीडीपीचे कसे संरक्षण व संवर्धन करता येईल म्हणजे स्मार्टनेस, पाण्याचा पुनर्वापर करणे म्हणजे स्मार्टनेस, महानगरपालिकेचा शिक्षणाचा दर्जा खालावत असताना दर्जेदार शिक्षण देणे म्हणजे स्मार्टनेस, शहरातील कचऱ्यासाठी उपाय योजना करणे म्हणजे स्मार्टनेस.

अशा उपाययोजना स्मार्ट शहर करत असताना माझ्या व पुणेकरांच्या मनात कल्पना होत्या. परंतु, सर्व आशा फोल ठरल्या. अशाप्रकारे स्मार्ट सिटीने काम केल्यास मानांकनासाठी आपण जी धावपळ करतोय. ती करावी लागणार नाही व मानांकनामध्ये आपले शहर कायमचे एक नंबरला राहिल.

इतर 99 शहरे आपला आदर्श घेऊन कामे करतील यासाठी आपण शहराच्या शाश्वत विकासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे. शहरासाठी महत्वाचे असलेल्या कामांना प्राधान्य देऊन शहर कसे स्मार्ट करता येईल, याकडे लक्ष द्यावे, असेही बागूल यांनी पत्रात म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बौद्ध धम्म हा मनःशांती ते विश्वशांती चा प्रतीक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बुद्धगया : भगवान गौतम बुद्धांनी आखिल मानवजातीच्या कल्याणासाठी...

नेपाळमध्ये बस महामार्गावरून नदीत कोसळली, 18 ठार:25 जखमी

काठमांडू:नेपाळमधील धादिंग जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एक बस महामार्गावरून...

हवामान विभागाचा 7 जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’,विदर्भात पावसाचा धुमाकूळ, तर कोकणात आंबा धोक्यात

मुंबई:रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत विजांच्या...

पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे तीन सदस्य काश्मीर मध्ये ठार मारले..

दहशतवादी एका टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या मातीच्या घरात लपलेले आढळले...