पुणे – केवळ एक दिवस नाहीतर प्रत्येक दिवस हा स्वातंत्र्याचा, सन्मानाचा, सुरक्षिततेचा ,समानतेचा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असावा असा गजर करीत हजारो महिलांनी स्त्रीशक्तीचा जागर करीत प्रत्येक दिवशी ‘मी सक्षम ‘ राहणारच असा विश्वास व्यक्त केला.
निमित्त होते, माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आयोजित केलेल्या ‘मी’ सक्षम अंतर्गत व्यवसायाभिमुख रोजगार प्रशिक्षण शिबीर शुभारंभ,मोफत आरोग्य तपासणी शिबीर , स्मार्ट फॅमिली कार्ड वितरण आणि स्नेहमेळाव्याचे.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी माजी उपमहापौर आबा बागुल,माजी आमदार उल्हास पवार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल,पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल, ऍड चंद्रशेखर पिंगळे, प्रकाश आरणे, डॉ. कल्पेश पाटील, दीपा बागुल, निशा गायकवाड, डॉ. मधुबाला लोढा, ज्योती अरविंद, शुभांगी चव्हाण, प्रियांका गणपुले ,, सीमा लाड, दीपाली सिन्नरकर, डॉ. मनीषा निंबाळकर, शकुंतला रांजणे, हेमन मिरजकर, रजिया बल्लारी, गोरख मरळ आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त तेजश्री नाईक, डॉ. मधुबाला लोढा, प्राजक्ता कोळपकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.तसेच तसेच राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलमधील शिक्षिकांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, महिला सक्षमीकरण होत आहे मात्र आर्थिकदृष्टया प्रत्येक महिला सक्षम होणे ही काळाची गरज आहे. महिलांप्रती समाजामध्ये सकारात्मक दृष्टिकोनाची व्याप्ती वाढणेही आवश्यक आहे, आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. बचतगटाच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र उत्पादित मालाला बाजारपेठ नाही हे वास्तव आहे त्यामुळे अन्नपूर्णा असलेल्या महिलांसाठी महापालिकेच्या माध्यमातून फिरते उपहारगृह लवकरच सुरु केले जाईल. इतकेच नाही तर आरोग्य विमा असो किंवा अन्य विविध कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा करून त्या मार्गी लावल्या जातील आणि महिला खऱ्या अर्थाने सक्षम कशा होतील यासाठीच कटिबद्ध आहे अशी ग्वाहीही आबा बागुल यांनी यावेळी दिली.
पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, महिलांचे प्रयत्न पूर्णपणे सोडविणे ही काळाची गरज आहे. आबा बागुल यांचे कार्य हे समाजाला ,शहराला दिशादर्शक आहे. ते जे संकल्प करतात तो पूर्णही करतात यामुळेच ते लोकप्रिय आहेत. आता महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी फिरते उपाहारगृहे , विविध योजना ते नक्कीच मार्गी लावतील यात शंका नाही मात्र आबा बागुल यांच्यासारखी व्यक्तिमत्वे राज्याच्या राजकारणात समाजकारणासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन अमित बागुल मित्र परिवाराने केले.

