पुणे- दरवर्षी प्रमाणे पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे ख्रिसमस संध्या या कार्यक्रमाचे आयोजन बागुल उद्यान शिवदर्शन येथे करण्यात आले.यंदा उपक्रमाचे 19 वे वर्ष असून आज या उपक्रमाचे उद्घाटन सनदी अधिकारी सुशील खोडवेकर तसेच दत्तवाडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटिल, अध्यक्ष आबा बागुल, सौ जयश्री बागुल, नंदकुमार बानगुडे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी रंगेबिरंगी फुगे व एकतेचा संदेश देणारा फलक झळकावून हे उद्घाटना करण्यात आले.
ख्रिसमस निमित्त सर्वधर्म समभाव हा संदेश देणारा व लहान मुलांसाठी विशेष आकर्षण असणाऱ्या या ख्रिसमस संध्या या आनंद मेळाव्यात लहान मुलांना विनामूल्य बग्गी राईड,उंट सवारी , जंपिंग बलून, मिक्की माऊस, मिमिक्री शो फायर शो, जादूचे प्रयोग या बरोबरच रंगबिरंगी गॅस चे फुगे आणि खाऊचे वाटप देखील करण्यात आले. या कार्यक्रमाला 10 हजाराहुन अधिक मुले आणि काही पालक ही उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना आबा बागुल म्हणाले की, मी गेली 19 वर्ष या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. जगामधे खुप वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ति आहेत. या कार्यक्रमांद्वारे मी व माझे सहकारी त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा व त्यांच्यामधे एकतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न दरवर्षी करत असतो. यावेळी त्यांनी सर्व नागरिकांना नातळाच्या व नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी वसंतराव बागुल उद्यान सजविण्यात आले होते. सगळीकडे विद्युत रोषणाई तसेच रंगबिरंगी माळा व पताका लावून हा परिसर सुशोभित केला गेला होता. या ख्रिसमस संध्या कार्यक्रमाचे संयोजन अमित बागुल व सहकाऱ्यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अभिषेक बागुल, महेश ढवळे सागर बागुल पप्पु देवकर , धनंजय कांबळे, इम्तियाज़ ताम्बोळी, राम रणपिसे , संतोष पवार , सुयोग धाडवे ,अमर ससाने, गणेश खांडरे ,राहुल शिंदे , विक्रांत गायकवाड ,आदींनी परिश्रम घेतले.अमित बागुल यांनी सूत्र संचालन केले व सागर बागुल यांनी आभार मानले

