पुणे – शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या पर्वती चषक फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संदीपभाऊ लांडगे युवामंच क्रिकेट क्लबने पटकावला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पुणे शहर काँग्रेस कमितीचे अध्यक्ष रमेश बागवे , सुनील केसरी उपायुक्त पुणे मनपा व नितिन खानीवाले माजी रणजी खेळाडू महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय कुलकर्णी रोटरी क्लब, चंद्रशेखर पिंगले रोटरी क्लब,विनय जोशी, सतीश पवार ब्लॉक अध्यक्ष पर्वती, स्पर्धेचे संयोजक पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल , पर्वती कॉंग्रेसचे प्रकाश आरणे , नंदकुमार बानगुडे ,विक्रांत खन्ना , सागर आरोळे,महेश ढवळे ,धनंजय कांबळे ,अभिजीत निकलजे ,इम्तियाज़ ताम्बोलि,सागर बागुल ,अभिषेक बागुल ,तेजस बागुल, सुरेश कांबले ,राकेश नामेकर,विनय ढेरे सुयोग धाडवे,अशोक शिंदे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संदीपभाऊ लांडगे क्रिकेट क्लबला ५५ हजार ५५५ रुपयांचे रोख बक्षीस आणि करंडक प्रदान करण्यात आले तर द्वितीय क्रमांकाचे ३३हजार ३३३ रुपयांचे रोख पारितोषिक आणि करंडक राहुल माने प्रतिष्ठान क्रिकेट क्लबने तसेच तृतीय क्रमांकाचे २२हजार २२२ रुपयांचे रोख बक्षीस व करंडक जय गणेश क्रिकेट क्लबने पटकावला.चतुर्थ क्रमांकचे ११ हजार १११ रुपयांचे रोख बक्षीस कृष्णराज इलेवन क्रिकेट क्लबने पटकावला. विजेत्या संघाचे आणि सहभागी संघाचे मा. उपमहापौर आबा बागुल यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी संयोजक अमित बागुल म्हणाले , आधुनिक युगात तरुण पिढी मोबाइल मधे जास्त गुंतली आहे मैदानी खेळा कडे ओढ कमी झाली आहे त्यामुळे त्यांना खेळाकडे आकर्षित करण्याचा आमचा या स्पर्धेद्वारे हा प्रयत्न आहे.

